Homeचिट चॅट‘पेट फेड इंडिया’...

‘पेट फेड इंडिया’ २१ व २२ जानेवारीला मुंबईत!

पेट फेड इंडिया, हा देशातील पाळीव प्राणी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित केला जाणारा सर्वांत मोठा पेट महोत्सव आहे. या दोन दिवसांचा महोत्सव २१ व २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोमध्ये होणार आहे.

कॅरी माय पेट, ही कंपनी पेट फेड इंडियाची ट्रॅव्हल पार्टनर तर आहेच, शिवाय या कंपनीने पाळीव प्राण्यांच्या स्थलांतर प्रक्रियेबद्दल पालकांना शिक्षित करण्यासाठी अनेकविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. पाळीव प्राण्यांच्या स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल यात माहिती दिली जाणार आहे. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. पाळीव प्राण्यांच्या पालकांना कंपनी देत असलेल्या सेवेची कल्पना यावी म्हणून ठेवलेले मिनिएचर विमान त्यांच्या स्टॉलवरील प्रमुख आकर्षण असेल.

नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या पेट फेड बेंगळुरूमध्ये व डिसेंबर महिन्यात झालेल्या पेट फेड दिल्लीमध्ये कॅरी माय पेटचा सहभाग यशस्वी ठरला होता. दोन्ही शहरांमध्ये कॅरी माय पेटच्या स्टॉलला ७०००हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली. पेट फेड मुंबईसाठीही कंपनीने त्याच प्रकारच्या मॉडेलचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रवासाच्या प्रक्रियेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रात्यक्षिक दाखवले जाते. सहभागी अभ्यागतांना मॉक बोर्डिंग पास देणे, पाळीव प्राण्यांना लुटुपुटूचे ‘फिट-टू-फ्लाय’ प्रमाणपत्र देणे आदींच्या माध्यमातून ही प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली जाते आणि अखेरीस पाळीव प्राण्यासोबत विमानात जाण्यातून त्यांना पाळीव प्राण्याच्या स्थलांतराचा खराखुरा अनुभव दिला जातो.

कॅरी माय पेट, या दिल्लीस्थित पाळीव प्राणी वाहतूक ब्रॅण्डने ६०००हून पेट रिलोकेशन्स पूर्ण केली आहेत. यामध्ये ७२०० पाळीव प्राण्यांचे देशांतर्गत तसेच ३०हून अधिक देशांत जागतिक स्थलांतर करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content