Homeचिट चॅटयेत्या हंगामासाठी खोबऱ्याची...

येत्या हंगामासाठी खोबऱ्याची किमान आधारभूत किमत निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या झालेल्या बैठकीत 2023च्‍या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना मान्यता देण्‍यात आली. कृषी खर्च आणि किंमती आयोगाने केलेल्या शिफारसी तसेच नारळ उत्पादक प्रमुख राज्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित ही मान्यता देण्यात आली.

सरासरी चांगल्या गुणवत्तेच्या सत्त्व काढण्यासाठीच्या खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत 10860/- रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. गोटा खोबऱ्यासाठी 2023च्या हंगामासाठी 11750/- रूपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. यंदा सत्‍व काढण्यासाठीच्या नारळाच्या दरामध्‍ये 270/- प्रति क्विंटल वाढ केली आहे. तर मागील हंगामापेक्षा गोटा खोबऱ्याच्या दरामध्‍ये 750/- प्रति क्विंटल वाढ केली आहे.

हे अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा सत्‍व काढण्‍याच्‍या खोबऱ्यासाठी 51.82 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 64.26 टक्के नफा सुनिश्चित करेल. 2023च्या हंगामासाठी खोबऱ्याचे घोषित किमान आधारभूत मूल्य हे सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.

नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवा आणि त्यांच्या उत्‍पन्नामध्‍ये भरीव सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे. नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत खोबरे आणि शेंड्या काढून सोललेल्‍या नारळाच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी (सीएनएएस) म्हणून काम करीत आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content