Homeहेल्थ इज वेल्थसध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या...

सध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांपासून मुक्त!

कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आतंरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची थर्मल चाचणी केली जाणार आहे.

सहव्याधी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक घेऊन करोनाविषयक केंद्र सरकारचे निर्देश आणि सद्यस्थिती यांचा आढावा घेतला. 

बीएफ.७ या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या प्रकाराचे देशात केवळ चार रुग्ण असून दोन गुजरात तर दोन रुग्ण ओरिसात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात त्याचा एकही रुग्ण नाही. तरीही पूर्वकाळजी म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक विशेषतः सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करण्याचे आवाहन करत आहोत. कारण तसे करणे सार्वजनिक हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना

यानंतरच्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. महाराष्ट्राच्या जनतेने काळजी न करता कोरोनाबद्दल सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. मागील आठवड्यात राज्यातली कोविड रुग्णसंख्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण सध्या .29 इतके आहे. संसर्ग होऊन रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात फक्त 16 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. 22 डिसेंबरच्या म्हणजेच आजच्या अहवालानुसार राज्यात एकूण 134 क्रियाशील रुग्ण आहेत. मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशात उफाळून आलेला कोरोना लक्षात घेता सावधानता बाळगण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत असे ते म्हणाले.

भीती नको पण काळजी घ्या, मास्कसक्ती नाही पण वरिष्ठ नागरिक आणि अति जोखमीचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोविडअनुरूप वर्तणूक या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रयोगशाळेत चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा. आयटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात यावा. शंभर टक्के जनुकीय क्रम निर्धारण तपासणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोस यावर भर देण्यात यावा. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी. मनुष्यबळ प्रशिक्षण तसेच क्षमता तयार करावी. आंतरराष्ट्रीय प्रवासांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. राज्य टास्क फोर्स स्थापन करावा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content