Homeचिट चॅटचित्रपट निर्माते कॅप्टन...

चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक

नुकत्याच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’, या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले.

गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतल्या कांदिवली येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ डिसेंबरला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथेच त्यांना तीव्र ‘ब्रेन स्ट्रोक’चा झटका आल्याने निधन झाले.

उच्च-तंत्रविद्याविभूषित असलेल्या रविंद्र हरिभाऊ मगर यांनी नुकतेच वयाच्या ७०व्या वर्षात पदार्पण केले होते. इंजिनीअरिंग क्षेत्रात व्यावसायिक म्हणून त्यांनी भरीव कार्य केले असून अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ दिले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र कॅप्टन कल्पेश मास्टर मरिनर असून त्यांनी नुकताच विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट निर्माण केला आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र भूषण व्यवसायाने वकील असून बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात सक्रिय आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content