Homeकल्चर +निसर्गसंपन्न कोकणातले ‘थ्री...

निसर्गसंपन्न कोकणातले ‘थ्री ऑफ अस’!

“थ्री ऑफ अस” ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित नाट्यमय नातेसंबंधांची कथा आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यात शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि कलाकार-संगीतकार स्वानंद किरकिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

गोव्यात सुरू असलेल्या 53व्या इफ्फीमध्ये ‘टेबल टॉक्स’ सत्रात बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण म्हणाले की, मी माझ्या बालपणीची तीन-चार वर्षे कोकणात होतो. निसर्गाशी माझी पहिली ओळख कोकणच्या भूमीतच झाली. माझ्या चित्रपटातून मी नेहमीच माझ्यातलं मूल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः या चित्रपटातही मी तसा प्रयत्न केला आहे. या भागाविषयी मला माझ्या बालपणापासून आकर्षण आहे. याआधी, मी मराठी चित्रपट ‘किल्ला’ बनवला होता. त्यानंतर आठ वर्षांनी मी हा चित्रपट बनवला आहे.

यावेळी, चित्रपटातील कलाकार, जयदीप अहलावत म्हणाले की, या चित्रपटात अभिव्यक्त करण्यात आलेल्या भावना, शब्दांत मांडणं अशक्य आहे. अविनाश आणि मी फिल्म स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि याआधी आम्ही ‘पाताल लोक’मध्ये एकत्र कामही केले आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांची कार्यशैली दीर्घकाळापासून माहीत आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास, मी इथे त्याबद्दल सगळं काही सांगू शकत नाही. हा चित्रपट पडद्यावर अनुभवण्याचा विषय आहे.

जलसा, ह्यूमन, डार्लिंग्स किंवा दिल्ली क्राइम-2मधील आपल्या अप्रतिम बॅक टू बॅक परफॉर्मन्सने वर्षभर चित्रपटप्रेमींना गुंतवून ठेवणारी अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली की, हा चित्रपट जितका विवाहाविषयी आहे, तितकाच तो जीवनावरही आहे. मला पटकथा मुळात वन लाइनर म्हणून सांगण्यात आली होती. आतापर्यंत मी अतिशय सशक्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यावेळी बदल म्हणून मी एका असुरक्षित आणि दुर्बळ स्त्रीचे पात्र रंगवले आहे. खरं तर हेच त्या पात्राचे सौंदर्य आहे. पण, मी समर्थ आहे. याचा अर्थ मी असुरक्षित पात्र साकारू शकत नाही, असा नाही. दोन्ही व्यक्तिरेखा सुंदर असतात. दोघांपैकी एकाची निवड का करावी? सामर्थ्य आणि असुरक्षितता अशा दोन्ही भावना आपल्या प्रत्येकामध्ये असतात.

चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शक आणि छायादिग्दर्शक म्हणून अप्रतिम काम केले आहे. हा चित्रपट आपल्याला एखाद्या पेंटिगसारखा दिसेल. निसर्गसंपन्न कोकणाच्या पर्यटनाची एक उत्तम जाहिरात या चित्रपटातून होईल, असेही शेफाली शाह म्हणाल्या.

या चित्रपटात, शेफालीची अत्यंत दुर्बल अशी व्यक्तिरेखा आहे. जयदीपने एका हसऱ्या आनंदी व्यक्तिची भूमिका केली आहे, तर मी गीतकार, ज्याला गाता येत नाही, अशा व्यक्तीचा अभिनय केला आहे. आम्ही जसे नाही, तसे या सिनेमात दिसणार आहोत. प्रत्येकाला अशी भूमिका मिळावी असे स्वप्न असते. ते आमचे स्वप्न या सिनेमामुळे साकार झाले, असे अभिनेता-गीतकार स्वानंद किरकिरे यांनी यावेळी सांगितले.

भारतीय पॅनोरामा विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.  

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content