Homeएनसर्कलघोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर...

घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ प्रमाणीकरण गरजेचे!

घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणाचे सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी समर्थन केलं.

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे मुंबईत आयोजित लेखापरीक्षण सप्ताहाच्या समारोप समारंभात त्या लेखापरीक्षकांना संबोधित करत होत्या. या वर्षी देशभरातील भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग कार्यालयांकडून दुसऱ्या लेखापरीक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेत त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली. आपण सादर करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे खरे आणि निष्पक्ष चित्र सुनिश्चित करण्याचा त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणावर सेबीकडून दिला जाणारा भर यामागे बाजारात जे काही सादर केले जाते त्याचे खरे आणि निष्पक्ष चित्र सुनिश्चित करण्याची वचनबद्धता आहे, असे सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या.

देशात 20पेक्षा जास्त संकेतस्थळे आहेत ज्यांचा वापर लेखापरीक्षण होत असलेल्या कंपनीचा  दावा प्रमाणित करण्यासाठी लेखापरीक्षक वापरू शकतात. घोटाळे करणाऱ्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर एक साधन म्हणून होत असताना, आपण घोटाळे टाळण्यासाठी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरण करण्यासाठी लेखापरीक्षक GSTN पोर्टल, बँक वेबसाइट्स इत्यादी साधनांचा वापर करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

‘प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भूमिका’ या विषयावर बोलताना सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या की, जर बाजारात पारदर्शकता असेल, तर बाजारातील घटक स्वत: कार्यक्षमतेने कार्य करतात आणि आणि बाजारात काहीही चुकीचे होणार नाही याकडे लक्ष देतात. एक नियामक म्हणून संपूर्ण बाजाराचे खरे आणि निष्पक्ष चित्र सादर करण्यासाठी सेबी जबाबदार आहे, म्हणूनच आम्ही पारदर्शकतेबाबत आग्रही आहोत. माहितीमध्ये कोणतीही विसंगती नसणे हा कार्यक्षम बाजारपेठेचा पाया आहे.

लेखा परीक्षकांच्या कामाचे  कौतुक करताना त्या म्हणाल्या की, आघाडीचा एक उद्योजक म्हणून किंवा संस्थेचा नेता म्हणून, ओमिशन आणि कमिशनच्या चुका नाहीत हे सुनिश्चित करणे हे आपले दायित्व आहे. लेखापाल आपल्याला हे साध्य करण्यात मदत करतात. आपली मानसिक शांती सुनिश्चित करतात.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लेखापरीक्षकांना प्रोत्साहन देताना त्या म्हणाल्या की, त्यांनी लेखापरीक्षकांना मुक्त  सल्लागार मानतात. कोणत्याही प्रकटीकरण दस्तावेजात, त्रुटी, माहिती वगळणे, संदर्भांना विस्कळीत करणे, नाकारणे, कमी दाखवण्याचा प्रयत्न, अतिशयोक्ती, बनावटपणा यासारखे घटक तपासणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे तपशील सामायिक करताना, भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे महासंचालक गुलझारी लाल म्हणाले की, या देशातील तरुणांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करताना आम्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. प्रमुख संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून हजाराहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या वर्षाच्या निबंधाची संकल्पना भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 2047मध्ये कॅगची भूमिका यावर आधारित असून हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी काय करता येईल यावर केंद्रित आहे.

1860मध्ये पहिल्या महालेखा परीक्षकांनी या कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला त्या दिवसाची आठवण म्हणून लेखापरीक्षण दिन साजरा केला जातो.

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content