Homeएनसर्कलसरकारी निवृत्तीवेतनधारकांचे जीवन...

सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणारे ‘जीवन प्रमाण ॲप’!

भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत येणारा  निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर शाखा येथे  निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

अंबरनाथमध्येही अशाच प्रकारचे एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जीवन प्रमाणपत्रे डिजिटल सादर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जीवन प्रमाण ॲपची निवृत्तीवेतनधारकांना ओळख करून देणे हा या शिबिरांचा उद्देश होता.

हे शिबीर म्हणजे, केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र  प्रचारासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा भाग आहे. 1 ऑक्टोबर 2022पासून 61,00,000हून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर 2021मध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला होता.

शिबिरात, एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्वयंसेवकांनी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून जीवन प्रमाण ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

पूर्वी, वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना प्रत्यक्ष स्वरूपात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकांबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागे. आता, ते त्यांच्या घरून आरामात एका बटणाच्या क्लिकवर त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात. ‘जीवन प्रमाण’ ही निवृत्तीवेतनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे निवृत्तीवेतनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

ॲप डाउनलोड करण्यासाठी:

Jeevan Pramaan :: Life Certificate for Pensioners ** DeitY ** Government of India

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content