Homeएनसर्कल‘अदाणी विल्मर’मधल्या गुंतवणुकीपूर्वी...

‘अदाणी विल्मर’मधल्या गुंतवणुकीपूर्वी येथे द्या लक्ष!

२०२१मधील आयपीओच्या महापुराने भारतीय गुंतवणूकदारांना प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांच्या (आयपीओ) व्यवहारांत खूपच गुंतवून ठेवले. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टेसेसच्या मसुद्याकडे (डीआरएचपी) नजर टाकल्यास २०२२मधील पहिली तिमाही काही वेगळी नाही हेही लक्षात येईल. कारण, २४ कंपन्या या काळात त्यांचा आयपीओ बाजारात आणत आहेत. आयपीओ जाहीर करणाऱ्या कंपन्यांमध्ये ओराव्हेल स्टेज (ओयो), अदाणी विल्मर, एमक्युअर फार्मा, डेल्हिवरी आदींचा समावेश आहे.

अदाणी विल्मर या अलीकडेच सूचित झालेल्या कंपनीचा ३,६०० कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) येत आहे. फॉर्च्युन या ब्रॅण्डखाली स्वयंपाकाचे तेल विकणारी ही एफएमसीजी कंपनी म्हणजे गौतम अदाणी यांचा अदाणी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुप यांचा ५०-५० भागीदारीचा जॉइंट व्हेंचर आहे. २७ जानेवारी खुल्या होणाऱ्या तीन दिवसांच्या सार्वजनिक प्रस्तावासाठी दरश्रेणी प्रति समभाग २१८-२३० रुपये निश्चित करण्यात आला आहे. लॉट आकारमान अर्थात गुंतवणूकदाराला अर्ज करण्यासाठी आवश्यक समभागांची किमान संख्या ६५ इक्विटी समभाग एवढी आहे. या इश्यूनंतर कंपनीचे बाजार भांडवल २९,९०० कोटी रुपये होईल आणि हे समभाग ८ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारांवर सूचित होतील, अशी शक्यता आहे.

जर तुम्ही अदाणी विल्मरमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे याबद्दल सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, अमरजीत मौर्य.

१. कंपनीचा आढावा: १९९९मध्ये समाविष्ट झालेली ही एफएमसीजी कंपनी भारतीय ग्राहकांसाठी स्वयंपाकाचे जिन्नस देऊ करते. यामध्ये खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांचा समावेश होतो. कंपनी उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक अत्यावश्यक वस्तूही पुरवते. यामध्ये ओलिओकेमिकल्स, कॅस्टर ऑइल आणि त्यापासून निर्माण झालेले घटक तसेच डी-ऑइल्ड केक्सचा समावेश होतो. कंपनी विविध ब्रॅण्ड्सच्या खाली तसेच व्यापक दरश्रेणीतील उत्पादने देऊ करते आणि त्यायोगे वेगवेगळ्या ग्राहकसमूहांच्या मागण्या पूर्ण करते.

कंपनीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ तीन वर्गांत विभागला जातो. (i) खाद्यतेल, (ii) पॅकेज्ड अन्नपदार्थ व एफएमसीजी, आणि (iii) उद्योगक्षेत्रातील अत्यावश्यक घटक. फॉर्च्युन हा कंपनीचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड म्हणजे भारतातील सर्वाधिक विक्री होणारा खाद्यतेलाचा ब्रॅण्ड आहे. कंपनीने खाद्यतेल उत्पादने, राइस ब्रान हेल्थ ऑइल, फॉर्टिफाइड फूड्स, रेडी-टू-कूक सोया चंक्स, खिचडी आदी मूल्यवर्धित उत्पादनांवरील भर कंपनीने वाढवला आहे.

२. कंपनीचे कार्यक्षेत्र: कंपनीचे १० भारतीय राज्यांमध्ये एकूण २२ कारखाने आहेत. त्यात १० क्रशिंग युनिट्स व १९ शुद्धीकरण कारखान्यांचा समावेश आहे. मुद्रा येथील कंपनीचा शुद्धीकरण कारखाना हा भारतातील सर्वात मोठा एका स्थळावरील शुद्धीकरण कारखाना आहे. त्याची क्षमता प्रतिदिवस ५,००० मेट्रिक टन आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, अदाणी विल्मरने अतिरिक्त उत्पादन क्षमतेसाठी ३६ टोलिंग युनिट्स भाडेतत्त्वावर घेतली आहेत.

३० सप्टेंबर, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीचे २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५,५९० वितरक आहेत. ते १.६ दशलक्षांहून अधिक रिटेल आउटलेट्सची मागणी पूर्ण करतात. याशिवाय, कंपनीचे भारतात ८८ डेपो आहेत. सुमारे १.८ दशलक्ष चौरस फुटांच्या एकत्रित जागेत हे डेपो पसरलेले आहेत.

३. आयपीओमागील उद्दिष्ट: आयपीओद्वारे उभा राहाणारा पैसा भांडवल खर्चासाठी वापरून सध्याच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्याची तसेच नवीन उत्पादन कारखाने विकसित करण्याची कंपनीची इच्छा आहे. हा निधी कर्जांच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्व परतफेडीसाठीही वापरला जाईल. त्याचप्रमाणे धोरणात्मक अधिग्रहणे आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी त्याचा वापर केला जाईल.

४. वित्तीय बाबी: कंपनीच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष १९-२१ या काळात १३ टक्के सीएजीआरवर वाढ झाली आहे. नफ्याच्या आघाडीवर, कंपनीने याच काळात निव्वळ नफ्यात ३९ टक्के सीएजीआरवर वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २२च्या पहिल्या सहामाहीमध्ये कंपनीने वरील तसेच निम्न दोन्ही स्तरांवर दमदार वाढ साध्य केली आहे. मात्र, कंपनीचे ईबीआयटीडीए मार्जिन कमीजास्त होते. एकंदर वित्तीय आकडेवारी चांगली आहे.

५. प्रतिस्पर्ध्यांशी तुलना: कंपनीच्या सूचित प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये मॅरिको इंडिया आणि एचयूएल यांचा समावेश होतो. मूल्यांकनाच्या निकषावर, इश्यूनंतरचा टीटीएम पीई ३७.६ पट आहे (इश्यूच्या दरश्रेणीच्या वरील टोकावर).

६. स्पर्धा: अदाणी विल्मर बाजारपेठेत आघाडीच्या स्थानी आहे. यामुळे कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आघाडीच्या जागतिक पुरवठादारांकडून कच्चा माल खरेदी करणे सुलभ होते. कंपनीकडे अॅग्रीबिझनेस उद्योगातील ४० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असलेली वरिष्ठ व्यवस्थापन टीम आहे. अदाणी ग्रुपच्या पाठिंब्यामुळे आणखी काही लाभ कंपनीला मिळतात.

दुसऱ्या बाजूला, विल्मर समूह हा आशियातील आघाडीच्या अॅग्रीबिझनेस समूहांपैकी एक आहे. सप्टेंबर २०२१मध्ये बाजार भांडवलाच्या निकषावर ही सिंगापूर एक्स्चेंजवरील सातव्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी होती. अदाणी विल्मरचा सामना जेमिनी एडिबल्स या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या पाम ऑइल प्लाण्टेशन कंपनीशी आहे. ही कंपनीही सुमारे २५ अब्ज रुपयांचा आयपीओ बाजारात आणण्याचे नियोजन करत आहे.

७. वाढीचे धोरण: कंपनी खाद्यतेल विभागातील आपला बाजारातील वाटा वाढवणार आहे आणि अन्नपदार्थ व्यवसायाचा विस्तार करणार आहे. घनफळाच्या (व्हॉल्युम) निकषावर, खाद्यतेल विभागाचे कंपनीच्या एकूण व्यवसायात ६५ टक्के योगदान आहे. उर्वरित व्यवसाय अन्नपदार्थ आणि औद्योगिक आवश्यक घटकांच्या विभागांतून येतो. कंपनी भारतातील आघाडीची पॅकेज्ड फूड आणि एफएमसीजी कंपनी होण्यावर भर देणार आहे. यासाठी आपले वितरण जाळे कंपनी सर्व मार्गांचा वापर करून वाढवणार आहे. तसेच ब्रॅण्डबाबत जागरूकता वाढवणे, नवीन उत्पादने आणणे तसेच ग्राहकवर्गात वाढ करणे आदींसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

८. लीड व्यवस्थापक: कंपनीसाठी बूक रनिंग लीड व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक, बीएनबी परिबास, कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन, बोफा सिक्युरिटीज आणि क्रेडिट सुईस काम करत आहेत. लिंक इंटाइम इंडिया हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

९. समभागधारक कोटा: कंपनीने आपल्या नेट इश्यूपैकी सुमारे ५० टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखून ठेवला आहे. ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला आहे. उर्वरित १५ टक्के भाग असंस्थात्मक ग्राहकांमध्ये वितरित केला जाईल. कंपनीने १०७ कोटी रुपयांचे इक्विटी समभाग आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले आहेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content