Homeटॉप स्टोरीसोमैयांना नोटीस धाडणाऱ्या...

सोमैयांना नोटीस धाडणाऱ्या बोलवित्या धन्यावरच कारवाई करा!

किरीट सोमैयांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी काल मंत्रालयाच्या नगरविकास विभागात जाऊन काही फाईलींचे निरीक्षण केले. यासाठी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सौमैया यांना बसायला खुर्चीही दिली. खुर्चीवर बसलेल्या सोमैया यांचे छायाचित्र कालच व्हायरल झाले. ते झाल्याबरोबर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आज सोमैया यांना याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दोन दिवसांत यावर उत्तर देण्याचे फर्मान सरकारने सोडले. हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे हे सारे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिल्याचे बोलले जाते. सोमैया यांना बसायला खुर्ची देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा घाटही घातला जात आहे. याची जबाबदारी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यावर सोपविण्यात आल्याचेही कळते.

किरीट सोमैया यांनी मात्र सरकारच्या या कृतीवर जोरदार पलटवार केला. आपण नगरविकास विभागात नेमके काय तपासत होतो हे जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फाईल पाहत होतो की, त्यांचे भागिदार रवींद्र वायकर? की काँग्रेसचे अशोक चव्हाण याचा शोध लावण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारने याप्रकरणी कोणाकडूनही तपास करावा. सीआयडी चौकशी नेमावी. एसआयटी नेमावी. आपण घाबरणार नाही. या घोटाळेबाज सरकारचे घोटाळे आपण उघडकीस आणणारच, अशी प्रतिक्रिया सोमैया यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केली.

सोमैयांच्या प्रतिक्रियेमुळे वातावरण तापले असतानाच फडणवीस यांनी ट्विट करत सोमैया यांना नोटीस धाडणाऱ्या बोलवित्या धन्यावरच कारवाई करा, अशी मागणी केली.

सोमैया

या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांनासुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार?, असा सवाल त्यांनी केला आहे.

शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई महापालिका स्वबळावर

दरम्यान, आजच देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची जवळजवळ चार तास बैठक झाली. या बैठकीत, येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सध्या तरी यात काय तथ्य नसल्याचे आज स्पष्ट झाले. आरपीआयसारख्या जुन्या मित्रपक्षांना सोबत घ्यावे. मात्र, त्यांच्या उमेदवारांनाही भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढायला सांगून मुंबई महापालिका आपल्या ताब्यात खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड आदी नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content