Details
नवीन वर्ष राजकीय उलथापालथीचे!
01-Jul-2019
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
[email protected] gmail.com
2019 हे वर्ष देशाच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या वर्षात विधानसभेच्या निवडणुकादेखील काही राज्यांत होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाची खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात तर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप युती न झाल्यास लोकसभेचे उमेदवार निश्चित असतील. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकीत चित्र वेगळे असेल आणि याचा परिणाम शहराच्या राजकारणावर निश्चित होईल.
यावेळेची ही निवडणूक सर्वच पक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यात भाजपाला काँग्रेसने धोबीपछाड दिल्यानंतर भाजपादेखील जमिनीवर आलेला आहे. शिवाय मोदींच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवायच्या की नाहीत, हे दोन मतप्रवाह भाजपामध्ये असून पक्षाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी चार वर्षांनतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण तीन राज्यांतील त्याचबरोबर अन्य दोन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसल्यामुळे आता मोदी लाट राहिली नाही हे भाजपलादेखील समजले असून पक्षामधील अनेकांनी उघड-उघड बोलणे सुरू केले असल्यामुळे मोदी व शाह यांनादेखील आता अडचणीचे झाल्यामुळे भाजपामध्ये पक्षसंघटनेमधील बदलाचे वारे सुरू झाले. आणि म्हणूनच मोदी यांनी नमती भूमिका घेतली. पक्षांतर्गत हा वाद असतानाच महाराष्ट्रात शिवसेनेने थेट भाजपालाच लक्ष्य केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या दोन पक्षाची युती होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उतरविण्याची चर्चा सुरू केली आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. कारण, मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची मोठी पंचाईत होणार आहे. कारण, शिवसेना भाजपाची युती झाली तर उमेदवार बारणे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना मैदानात उतरविले तर बारणे यांची मोठी अडचण होणार आहे. कारण आमदार जगताप आणि खासदार बारणे यांचे राजकीय हाडवैर असल्यामुळे जगताप कितपत त्यांचे काम करतील, याबाबत साशंकता आहे. शिवाय बारणे आणि शरद पवार, अजितदादा यांचे असणारे संबंध हादेखील कळीचा मुद्दा असल्यामुळे ऐनवेळी राजकारणात काहीही होऊ शकते.
एकंदरीत भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध शेवटच्या टोकाला गेले असल्यामुळे त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले असून सध्या शिवसेनेने भाजपाला पूर्ण टार्गेट केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हते.
मात्र, सोमवारी त्यांनी यासंदर्भात शिवसेनेच्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देऊच, असे स्पष्ट केल्यामुळे संबंध दुरावले आहेत, हे स्पष्ट होते. शिवाय अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा असताना भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेमध्ये भाजपाबद्दल मोठा संताप व्यक्त केला जात आहे. कारण, 2014 मध्ये ज्यावेळी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपा होता. त्यामुळे राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलविले. ज्यावेळेस बहुमत सिध्द करताना सभागृहात शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली आणि राष्ट्रवादीनेदेखील तटस्थ भूमिका घेतली. काँग्रेसने विरोधी मतदान केले. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपाला मदत केल्यामुळे राज्यात भाजपाची सत्ता आली.
कालांतराने शिवसेनादेखील सत्तेत सहभागी झाली आणि या दोन्ही पक्षाचा संसार सुरू झाला. हा संसार सुरू असताना शिवसेनेने वारंवार भाजपाला लक्ष्य केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तारेवरची कसरत करत सव्वाचार वर्षे सरकार व्यवस्थित चालविले.
पाच राज्यातल्या निवडणुकीमध्ये भाजपा ‘बॅकफूट’ला गेल्यामुळे शिवसेनेने याचा पुरेपूर फायदा उठवित भाजपाला लक्ष केले. त्याचबरोबर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपाला अडचणीत आणले. ही राजकीय खेळी शिवसेनेची यशस्वी झाली असता अहमदनगर महापालिका निवडणुकीत मात्र शिवसेनेला मिळालेला राजकीय दणका त्यांच्या जिव्हारी लागला आणि या दोन पक्षांमधील वाद हा पराकोटीला गेला. मात्र, पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शाह यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना सबुरीचा सल्ला देत शिवसेनेबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती होणार असे वारंवार सांगत गेले. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे व अन्य नेते भाजपाला लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता युती होईल की नाही याची मात्र शाश्वती नाही.
पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असून विधानसभा, लोकसभा आणि महापालिका या निवडणुकात राष्ट्रवादीला पूर्णपणे हद्दपार केल्यामुळे हा पराभव खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. आमदार जगताप आणि आमदार महेश लांडगे या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीला हद्दपार केल्यामुळे या दोन्ही नेत्यांचे वर्चस्व भाजपामध्ये वाढले. विशेष म्हणजे सर्वाधिक श्रेय आमदार जगताप यांना जाते. कारण, लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांना पक्षात आणण्यामागे जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचे खंदे समर्थक आझम पानसरे यांनादेखील पक्षात आणण्यामध्ये जगताप यांचाच वाटा आहे. त्यामुळे शहरात भाजपाची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. याशिवाय पानसरे यांना भाजपामध्ये न्याय मिळत नाही अशी चर्चा सुरू असतानाच समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. जगताप यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी वारंवार चर्चा करून पानसरे यांना मोठे पद देण्याबद्दल निर्णय केला व लवकरच त्यांची नियुक्ती होणार आहे. यासंदर्भातील नियुक्तीचा आदेशही तयार असून जानेवारीअखेर नियुक्ती केली जाईल, असे भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजपामध्ये असणारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला असून सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊन जुना-नवा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाअंतर्गत वाद उफाळता कामा नये याची दक्षता पक्षाने घेतली आहे.
जगताप भाजपा सोडणार अशा बातम्या पसरवून भाजपामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न असून वास्तविकता जगताप आता भाजपातून बाहेर पडणार नाहीत. उलट शिवसेना, भाजपा जर वेगळे लढले तर जगताप हेच मावळ लोकसभेचे उमेदवार असतील आणि या दोन पक्षात युती झाली नाही तर राष्ट्रवादीचे नेते पार्थला उभे करण्याचा धोका पत्करणार नाहीत. कारण, राजकीय समीकरणे बदलतील. याचा अभ्यास खुद्द पवारसाहेब आणि अजितदादा यांना आहे. मात्र, पार्थ उभे राहणार या चर्चेने मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर या नेत्यांची पंचाईत झाली आहे. कारण लोकसभेला युती झाली तर पुन्हा जगतापच आमदारकीला उमेदवार असतील. त्यामुळे आपल्या राजकीय आकांक्षा फोल ठरतील. याची भीती असल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या अस्वस्था वाढली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडी महत्त्वाच्या आहेत. कारण, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपाचा शिरकाव झाल्यामुळे पवारांना मोठा राजकीय धक्का लागल्यामुळे राज्याच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवडला महत्त्व आले आहे. म्हणूनच भाजपाने पिंपरी-चिंचवडवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस बऱ्याच वेळा येऊन गेले. बालेवाडीत पंतप्रधान मोदी येऊन गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबीर, भाजपाची बैठक झाल्यामुळे निश्चितच पिंपरी-चिंचवडवर भाजपा नेत्यांचे लक्ष असून लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा भाजपाकडे घ्यावा, असा आग्रहदेखील भाजपाचा राहणार आहे. त्यामुळे युतीतील तणाव हा या-ना त्या मार्गाने वाढणार. मात्र, पिंपरी-चिंचवडचे नाव राजकीयदृष्ट्या राज्यात आग्रेसर राहील हे निश्चित. मतदार राजा हा यावेळेस भाजपाबरोबर जाईल की नाही, याची मात्र, शाश्वती नाही हे निश्चित!”
“विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी