Details
मास्टर ब्लास्टर नितीन गडकरी!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुप्रसिद्ध आहे. त्याला `मास्टर ब्लास्टर’ ही प्रेमाची उपाधी का बहाल करण्यात आली हेदेखील सर्वश्रुत आहे. जगभरातील भल्याभल्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना सचिन तेंडुलकरने अक्षरश: फोडून काढले. पुढे येऊन फटके मारत त्यांना चौकार आणि षटकार लगावले. कधी बॅकफूटवर जात स्क्वेअर कट अथवा पुलचे फटकेदेखील सचिनने मारले. यातील काही फटके हे पूर्ण ताकदीनिशी मारलेले होते. पण बरेचसे फटके व्यवस्थित टायमिंग साधून त्याने लगावले होते. फलंदाजी करताना टायमिंग महत्त्वाचे असते. कोणताही निष्णात फलंदाज फटके लगावताना जितके अचूक टायमिंग साधतो, तितकाच तो यशस्वी होतो. भारताचे सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ हेदेखील टायमिंग साधण्यात तरबेज होते. म्हणूनच ते यशस्वी झाले.
क्रिकेटप्रमाणे राजकारणातदेखील टायमिंग महत्त्वाचे असते. कधी काय बोलावे आणि कधी मौन साधावे हे ज्यांना कळते ते राजकारणात यशस्वी होतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे परखड बोलण्यात पण टायमिंग साधून टोलेबाजी करण्यात वाकबगार आहेत. ते बोलताना हातचे राखून बोलत नाहीत. पत्रकारांशी संवाद साधण्यास कचरत नाहीत. कोणत्याही प्रश्नाची सहजासहजी आणि सडेतोड उत्तरे देतात. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी अनेक पत्रकार परिषदा संबोधित केल्या. काही महिन्यांपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालाप कार्यक्रमातदेखील त्यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला. पण भुवया उंचवाव्यात असे कोणतेही विधान त्यांनी केलेले नाही. तथापि, काही महिन्यांपूर्वी पाच राज्यांत भारतीय जनता पार्टीचा दारूण पराभव झाला. त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्ये काँग्रेसने भाजपाकडून हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची उलटी गिनती सुरू झाली. त्यावेळी गडकरी यांनी अचूक टायमिंग साधत पहिला षटकार मारला. ते म्हणाले, `राजकारणात अपयशाची जबाबदारी घेणारे नेतृत्त्व हवे. अपयशाची जबाबदारी पक्षाच्या अध्यक्षाचीच असते.’
गडकरी यांचा दुसरा षटकार पाहा. मोदी यांचे नाव न घेता ते म्हणाले होते, `आत्मविश्वास आणि अहंकार यातला फरक ओळखा. आत्मविश्वास नक्कीच हवा, पण अहंकाराला दूर ठेवा.’ मोदी आणि शाह यांचा वाचाळपणा सर्वांना ठाऊक झाला आहे. पण भाजपामध्ये त्याविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नाही. मात्र मास्टर ब्लास्टर नितीन गडकरी बोलून गेले. काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, `आमच्या नेत्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याची गरज आहे.’ आपल्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाला साजेसे गडकरींचे आणखी एक विधान तर मोदींना उघडे पाडणारे आहे. गडकरी म्हणाले होते, `सत्तेवर कदापि येणार नाही, असा आमचा समज पक्का होता. त्यामुळे वारेमाप आश्वासने देण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला होता. तेच आम्ही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केले. लोक आता अनेक आश्वासनांची आठवण पदोपदी करून देतात. पण आम्ही फक्त हसतो आणि पुढे निघून जातो.’ इतके दिलखुलास आणि सत्य विधान गडकरीच करू शकतात.
गडकरी यांची वरील सर्व विधाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली आहेत. या त्यांच्या फटकेबाजीत रविवारी आणखी एका षटकाराची भर पडली. गडकरी म्हणाले, `मोठमोठी स्वप्ने दाखविणारे नेते जनतेला सुरुवातीला चांगले वाटतात. पण ती स्वप्ने खरी करून दाखवता आली नाहीत तर लोक झोडपून काढतात’. गडकरी यांनी हा उत्तुंग टोला `अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविणाऱ्या `सपनो का सौदागर’ला लगावला होता, हे उघड आहे. पाच राज्यांत भाजपाचा पराभव झाल्यापासून गडकरी यांनी चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे. एखादा फलंदाज चांगला स्थिरावतो आणि सामन्याच्या अखेरच्या सत्रात जिंकण्यासाठी फटकेबाजी करू लागतो तशी गडकरी यांची ही फटकेबाजी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असताना महाराष्ट्राचा हा `मराठी बाणा’ देशभर तळपू लागला आहे. नितीन गडकरी यांची करावी तितकी स्तुती थोडीच आहे!”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर