HomeArchiveदोन निवडणुका!

दोन निवडणुका!

Details
दोन निवडणुका!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाआधी दोन राज्यांतील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या. हरियाणा आणि राजस्थान येथील पोटनिवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसने 99 जागा जिंकून विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रामगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या साफीया झुबेर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे राजस्थानात काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला लाभलेला हा शुभशकून आहे. हरियाणाच्या जिन्द मतदारसंघात काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते. तरीही काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली. सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून विधानसभेवर यापूर्वीच निवडून गेले आहेत. तरीही त्यांना पोटनिवडणुकीत उभे करून काँग्रेसने काय साधले, हे एकट्या राहुल गांधी यांनाच ठाऊक! सुरजेवाला तरुण आहेत. ते उत्तम बोलतात. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ते चांगले चमकतात. सारांश, त्यांचे विमान नेहमी प्रसिद्धीच्या उंच आकाशात झेप घेत असते. कदाचित, हे `विमान’ खाली उतरविण्यासाठीच सुरजेवाला यांना जिन्द मतदारसंघातून उभे केले गेले असावे. कारण सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊन दारूणरित्या पराभूत झाले. भारतीय जनता पार्टीचे किशन मिध्धा यांनी 12 हजार मतांनी विजय मिळविला.

दोन पोटनिवडणुकांत काँग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा `सामना’ अनिर्णीत ठेवला, असे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जिन्द हा भाजपाचा बालेकिल्लाच होता. काँग्रेसने तो गमावला यात विशेष काही नाही. पण राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाची आणखी एक जागा हिसकावून घेऊन आपले विधानसभेतील जागांचे शतक पूर्ण केले. भाजपाला अशाप्रकारे सणसणीत चपराक लगावली. भाजपा नेतृत्त्वाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. आता घोडामैदान दूर नाही. एकीकडे विरोधक सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकवटले आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण गेल्या दोन दशकात या राज्यांत काँग्रेसचे अस्तित्त्व पणाला लागले आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. पोटनिवडणुकांवरून सदैव लोकांचा ट्रेंड कळत असतो. या निवडणुकीतदेखील तो उघड झाला आहे. राजस्थानने काँग्रेसच्या झोळीत जनतेने आणखी एक जागा टाकून काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. भाजपाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content