HomeArchiveप्रचारात देशासमोरील प्रश्नांवर...

प्रचारात देशासमोरील प्रश्नांवर बोला!

Details
प्रचारात देशासमोरील प्रश्नांवर बोला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]

निवडणुका जाहीर झाल्यावर प्रचाराचा जो गलका सुरू होतो त्यातील गलबला, गहजब, गदारोळ अनेकदा लोकांना नकोसा वाटायला लागतो. लोकांच्या, देशासमोरील प्रश्नांविषयी बोलण्याऐवजी अनेकदा समोरच्या उमेदवाराची, प्रतिस्पर्धी पक्षाची, विरोधी पक्षनेत्याची उणीदुणी काढली जातात, खासगी आयुष्यावर शेरेबाजी होते. निवडणुकांचे मुद्दे, आपली कामगिरी, समोरच्या उमेदवाराने वा लोकप्रतिनिधीने केलेले अपेक्षाभंग, सत्ताधारी पक्षाने केलेले आश्वासनभंग, नवी आश्वासने, निवडून आलो तर काय करणार याची उजळणी, जाहीरनामा या मुद्द्यांभोवती खरे तर प्रचार फिरायला हवा. पण कधी कधी नव्हे बहुतेक वेळा हे मुद्दे प्रचारात आग्रहाने येतच नाहीत. बोलण्याची पातळी सोडून निर्लज्ज, निरर्थक शेरेबाजी, हीन वक्तव्ये यांचीच भरमार दोन्ही बाजूंकडून सुरू होते. लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण बांधील आहोत, तीच आश्वासने देऊन निवडून आलो आहोत, निवडून द्या असे म्हणत निवडणुकीला उभे आहोत या साऱ्या साऱ्याचा विसर पडून यथेच्छ चिखल तुडवला जातो. परस्पर बदनामीचे, भलतेसलते बोलून चिखल उडवण्याचे, लोकांना बहकवण्याचे तंत्र अवलंबले जाते.

या निवडणुकीतही प्रचाराला सुरूवातच अशा चिखलफेकीने झाली आहे. ज्या गोष्टींचा निवडणुकीशी संबंध नाही अशा गोष्टी लोकांच्या गळ्यात मारल्या जात आहेत, त्यांची माथी भडकवली जात आहेत. मूळ प्रश्नांपासून त्यांना जेवढे दूर नेता येईल, नानाविध बहकाव्यांमध्ये अडकवता येईल तेवढे बरे असा एककलमी कार्यक्रम जणू काही राजकीय पक्षांनी, नेत्यांनी अंमलात आणायचे ठरवले आहे. दुर्दैवाने यासाठी पुढाकार भाजपाच्या नेत्यांनी, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रचारसभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरातील कुरबुरींचा उल्लेख केला आहे. अजित पवार यांनी धरणांसंदर्भात केलेल्या हीन शेरेबाजीचा उल्लेख केला. प्रचाराच्या काळात विरोधी पक्षांवर तुटून पडायचेच असते. पण मोदींनी पवार यांना लक्ष्य केल्यामुळे भाजपाला राज्यात राष्ट्रवादी किती खुपते आहे ते जनतेसमोर आले आहे. पवार यांच्या घरातील भांडणांमुळे त्यांची पक्षावरील पकडही सुटत चालली आहे, अजित पवारच त्यांना हिट विकेट करणार आहेत, या मोदी यांच्या शेरेबाजीला अजित पवार, सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनीही उत्तर दिले आहे. ज्यांना कुटुंबच नाही त्यांनी पवार कुटुंबाची काळजी करू नये, ज्यांनी पक्षातील ज्येष्ठांनाही अडगळीत टाकले आहे त्यांनी इतर पक्षांबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर मोदी यांना मिळाले असले तरी ही नळावरची भांडणे इतक्यात संपणारी नाहीत.

मुळात पाच वर्षे सरकार चालवणाऱ्या मोदी यांनी सरकारच्या कामगिरीवर, आश्वासनपूर्तीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, बेरोजगारीबद्दल प्रचारात बोलणे अपेक्षित आहे. पण वर्धा येथील सभेत त्यांनी समोर जमलेल्या जेमतेम जमावाची तशी निराशाच केली. ते पवारांबद्दल बोलले, अजित पवारांबद्दल बोलले पण सरकारच्या कामगिरीबद्दल बोलले नाहीत, विकासाबद्दल बोलले नाहीत. त्यांनी हिंदुत्वाचे जाळे जमावावर फेकले. हिंदू दहशतवाद म्हणत काँग्रेसने जगभरात हिंदूंची नाचक्की केली, हिंदूंचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा, अशी भूमिका मोदींनी घ्यावी हे तसे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. कारण भाजपाकडे वा त्यांच्याकडे सरकारच्या कामगिरीबद्दल भरभरून बोलावे, आत्मविश्वासाने बोलावे असा एकही ठोस मुद्दा नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबद्दल बोलता येणार नाही, कामगारांच्या शोषणाबद्दल, बेरोजगारीबद्दल बोलता येणार नाही. आरक्षणाबाबतही सरकारची बोलती सध्या बंदच आहे. गोरगरीबांची उपासमार, नोटबंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, देशोधडीला लागलेले छोटे व्यावसायिक यातील कशाबद्दलही तोंड उघडण्याचा भाजपाच्या नेत्यांना अधिकार नाही. यामुळेच हिंदूचा आत्मसन्मान, मुस्लिम दहशतवाद, पाकिस्तानला करारा जबाब, सैन्य म्हणजे भाजपाची प्रायव्हेट आर्मी असल्यागत फुशारक्या आदींचे तुणतुणे वाजवणे तुलनेने मोदी, आदित्यनाथ व इतर भाजपा नेत्यांना सोपे आहे. आदित्यनाथ यांनी लष्कर हे मोदी सेनाच आहे, अशी बढाई मारून निवडणूक आयोगाच्या आदेशांचा भंग केला आहेच. पण ऐन प्रचाराच्या काळात मोदींवरील चित्रपटात काहीही वावगे नाही असे प्रमाणपत्र देणाऱा आयोगही सरकारच्या दावणीला बांधला गेल्यात जमा आहे.

मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशासमोरील प्रश्नांवर बोलावे, हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मारलेला टोला भाजपाच्या जिव्हारी लागला असावा. कदाचित राष्ट्रवादीला नामोहरम करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी मोदींसारख्या कसलेल्या राजकारण्याने हेतूत: पवारांवर व्यक्तीगत टीका केली असावी. पण यापुढे तरी मोदी यांनी प्रचारसभांमध्ये त्यांच्या सरकारने केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल, नव्या योजनांबद्दल बोलावे, जनतेच्या रोजच्या जगण्याशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक करण्याविषयी त्यांच्याकडील उपाययोजनांची मांडणी करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे. देशाचे नेते असलेल्या मोदींकडूनच नव्हे तर उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांनी हीच अपेक्षा बाळगण्यात काही गैरही नाही.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content