HomeArchiveबेताल बडबडीला लगाम!

बेताल बडबडीला लगाम!

Details
बेताल बडबडीला लगाम!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
हातात माईक आला आणि समोर उत्सुक श्रोते दिसले की साऱ्याच राजकीय नेत्यांना चेव येतो आणि ते बोलायला लागतात. पण बोलता बोलताच जीभ घसरते. शब्दाचा तोल जातो आणि मग वाद उभा राहतो. अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये निवडणुकीच्या हंगामात ऐकायला मिळतच असतात. पण त्यातील काहींवरच कारवाई होऊ शकते. अशा कारवायादेखील उदाहरणादाखल केलेल्या असतात. एका नेत्यावर झालेली कारवाई पाहून अन्य नेते बोलताना तोल सांभाळतील, भान ठेवतील अशी अपेक्षा असते. पण तसे होत मात्र नाही! नेते बोलतच असतात. समोरच्याला शब्दांनी घायाळ करता येते, शब्दांच्या फटकाऱ्यांनी रक्तबंबाळही करता येते हे माहिती असल्याने ते वाहावतच जातात. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा अशा सुविचारावर त्यांची फारशी श्रद्दा नसतेच! त्यापेक्षा काय बोलण्याने मला व माझ्या पक्षाला अधिकाधिक मते मिळतील तेच मला बोलावे लागेल अशीच त्यांची भूमिका असते.

मोठमोठे नेते अशाप्रकारे जाणीवपूर्वक ज्याला ज्वालाग्राही म्हणता येईल अथवा स्फोटक म्हणता येईल अशी वक्तव्ये करत असतात. मते द्या नाही तर तुम्हाला बघून घेऊ ही भाषा तर चौकसभात, गल्लीसभात हमखास केली जाते. मात्र काही बोलांमुळे समाजात तणाव वाढू शकतो, शांतता सुव्यवस्थाही धोक्यात येऊ शकते, अशा बोलण्याविरोधात मग कारवाई केली जाते. तशीच कारवाई काल निवडणूक आयोगाने केली आहे. भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तसेच केंद्र सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री मनेका गांधी यांना निवडणूक आयोगाने मंगळवार सकाळपासूनच प्रचारात भाग घेण्यापासून रोखले आहे. ही शिक्षा त्यांना त्यांच्या बेताल बडबडीसाठी झालेली आहे. त्याचप्रमाणे बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा बहन मायावती आणि समाजवादी पार्टीचे वाचाळ नेते आझम खान या दोघांवरही बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. आझम खान व योगी यांच्या विरोधात तीन दिवसांच्या बंदीची कारवाई झाली आहे तर मनेका व मायावती यांना दोन दिवस प्रचारासाठी तोंड उघडता येणार नाही, अशी शिक्षा झालेली आहे.

या साऱ्यांनी सभ्यतेच्या मर्यादांचा भंग तर केलाच पण मायावती, मनेकाबाई आणि योगी यांनी हिंदू विरूद्ध मुस्लीम या परंपरागत संघर्षालाच सुरूवात करणारी वक्तव्ये केली. आझम खान यांचे बोलणे तर स्त्रीच्या मर्यादांना पायदळी तुडवणारे, अतिशय संतापजनक असेच होते. विख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तर ट्विटरवरून संताप व्यक्त करताना आझम खान यांना निवडणूक लढवण्यासाठीच अपात्र घोषित करावे अशी मागणी केली. विख्यात अभिनेत्री जया प्रदा गेल्या वर्षभरापर्यंत आझम खान यांच्याच पक्षाच्या राज्यसभा सदस्य राहिलेल्या आहेत. तिथे असतानाही आझम खान हे नेहमीच जया प्रदांविषयी अपशब्दच वापरत असत. कारण त्या मुलायम यांचे मित्र अमर सिंह यांच्याबरोबर वावरत असत. जया प्रदा या आता भारतीय जनता पक्षात दाखल झाल्या असून आझम खान यांच्याच विरोधात रामपूरमधून निवडणुकीत उतरल्या आहेत. जया प्रदा यांना उद्द्येशून आझम खान म्हणाले की, त्या माझ्याचबरोबर समाजवादी पार्टीत आल्या होत्या. पण आता कळले की त्यांनी खाकी पँट घातली आहे. आपण जे बोललो तो मोठा विनोद केला असे कदाचित आझम खान यांना वाटले असेल, पण आता आयोगाने त्यांच्या तोंडावर पट्टी मारली आहे. खरेतर आझम खान यांच्यासारख्याला तीन दिवस न बोलणे, रोड शो आदी न करणे व मुलाखतीदेखील न देणे अशी पूर्णतः लोकसभा प्रचारापासून अलिप्त राहण्याची दिलेली शिक्षा पुरेशी नाहीच. तीन दिवसांनी ते पुन्हा जया प्रदा यांच्याविषयी अधिक वाईट बोलायला मोकळेच असतील आणि ते तसे नक्कीच बोलतील. त्यांना रेणुका शहाणे म्हणतात तशी निवडणुकीतून बाद करण्याचीच शिक्षा दिली तर थोडा उपयोग होईल!

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते की काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे! निवडणुकीत बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे त्यांना माहित आहे म्हणून काँग्रेस, सपा आणि बसपा अल्पसंख्याकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत अली अली असे ओरडत आहेत. या उद्गारांसाठी निवडणूक आयोगाने योगींना नोटीस बजावलीच होती. पण कालच सर्वोच्च न्यायलयात राजकीय नेत्यांच्या बेताल बडबडीविषयी चिंता व्यक्त झाली. सर्वोच्च न्यायालयाने बजावले की अशा बेताल बडबडणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. तुम्ही काय कारवाई करत आहात ते सांगा अन्यथा आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांनाच इथे बोलवावे लागले असेही न्यायालयाने ठणकावले होते. तेव्हा आयोगाने तत्काळ शिक्षेची कावाई केली. मायावतींचे बोलणेही असेच हिंदू-मुस्लीम वादाविषयीचे होते. सहारनपूर देवबंद येथे सपा आणि बसपाच्या संयुक्त सभेत बोलताना मायावती यांच्या भाषणाचा जो स्वर होता, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो असे निवडणूक आयोगाचे मत झाले. मायावतींनी मुसलमानांना म्हटले होते की तुम्ही एकगठ्ठा मते सपा-बसपा उमेदवारांना दिली पाहिजेत, जर तुम्ही काँग्रेसला मतदान केले तर ते योग्य होणार नाही. या बोलण्यासाठी मंगळवारपासून पुढचे ४८ तास मायावतींवर सभा, रोड शो आणि मुलाखती देण्यावर बंदी घालण्यात आली. ज्या भाषेसाठी मायावतींवर कारवाई झाली, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आक्षेपार्ह भाषा मनेका गांधींनी वापरली होती. जे मुसलमान मला मते देणार नाहीत त्यांची कामे मी कशी करणार असा सवाल करत त्यांनी समाजाला दुखावले होते.

या साऱ्या नेत्यांच्या बेताल बडबडीला सध्या आयोगाने आळा घातला असला तरी राजकीय नेत्यांची बेताल बडबडीची पंरपरा मात्र जुनीच आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अशाच प्रकारे चिथावणीखोर बोलल्याबद्दल भाजपाचे सध्याचे अध्यक्ष व तेव्हाचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शाह यांच्यावर दीर्घ बंदी आयोगाने घातली होती. नंतर त्यांनी असे परत असे बोलणार नाही असे लिहून दिले म्हणून ती बंदी आयोगाने उठवली होती. त्याच निवडणुकीत याच आझम खान यांच्यावरही वाह्यात बोलण्यासाठी कारवाई झाली होती. महाराष्ट्रात तर अशा बोलण्याची परंपरा दीर्घ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असतील वा दिवंगत नेते आर. आर. पाटील असतील यांनीही वादग्रस्त वक्तव्ये केलीच होती. त्याबद्द्ल त्यांना जाहीर क्षमायाचनाही करावी लागली होती. विधान परिषदेचे भाजपाचे एक सहयोगी सदस्य व सुधाकर परिचारकांचे पुत्रवत पुतणे प्रशांत परिचारक यांच्यावर परिषदेत निलंबनाची कारवाई होऊन आता जवळपास तीन वर्षे झाली. पण ती निलंबनाची कारवाई अद्यापी मागे घेता येत नाही. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा अपमान त्यांनी एका निवडणूक भाषणातच केला होता. तेव्हा त्याच्या विरोधात भाजपासह सर्वच पक्षांनी परिषदेचे सदस्यत्व निलंबित करण्याची कारवाई केली. विशेषतः शिवसेना अतिशय संतप्त झाली होती. दुसरे भाजपा नेते अहमदनगरचे नगरसेवक छिंदम आणि आमदार राम कदम हेही अशचा वादग्रस्त वक्तव्यांसाठी कारवाईस पात्र ठरले होते. कदम यांच्यावर पक्षाने कारवाई केली. त्यांना प्रसारमाध्यमांपुढे न जाण्याची शिक्षा दिली होती. पण त्यांच्या त्या वक्तव्याचा ताप आजही भाजपाला होतोच आहे. कारण कदमांसारखे एक पात्र काँग्रेसच्या जाहिरातीत झळकते आणि कुठे फेडाल हे पाप असा बोचरा सवाल भाजपाला करते.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content