Details
“पवार, गुगली आणि काँग्रेस!”
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
वादग्रस्त विधाने राजकीय नेते नेहमीच करत असतात. त्याची करणे अनेक असतात. कधी स्वतःकडे माध्यमांचे व पर्यायाने मतदारांचे लक्ष अधिकाधिक खेचून घेण्याचा हेतू असू शकतो अथवा एखाद्या संकल्पनेवर जनमानसात तसेच राजकीय वर्तुळात काय काय प्रतिक्रिया येतात याचा अभ्यास कऱण्याच्या हेतूनेही राजकीय नेते वादग्रस्त ठरणारी विधाने करून टाकतात. प्रज्ञासिंह ठाकूर यांचे करकरेंच्या हौतात्म्याविषयी अनादर व्यक्त करणारे संतापजनक विधान हे पहिल्या प्रकाराचे उदाहरण असेल तर शरदरावांचे राहुल व पंतप्रधानपदाबाबतचे विधान हे दुसऱ्या प्रकाराचे उदाहरण असू शकते. पंतप्रधानपदाची संधी राहुल गांधी यांच्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असणाऱ्या विरोधी बाजूच्या अन्य काही नेत्यांना अधिक असू शकते असे पवारसाहेबांनी सुचवले आहे. अत्यंत महत्त्वाच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू होण्याच्या टप्प्यावरच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील काँग्रेसप्रणित महाआघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी हा एक नवा गुगली टाकला आहे.
राहुल गांधी यांच्याऐवजी विरोधकांच्या बाजूने आजी वा माजी मुख्यमंत्र्यांचे नाव पवार का सुचवत आहेत या प्रश्नामुळे काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत आणि महाआघाडीचे नेतेही चकित झाले आहेत. अर्थात ते विधान शनिवारी केल्यानंतर सोमवारी पवारसाहेबांनी खुलासा असा केला आहे की, राहुलऐवजी कोणाला पंतप्रधान करता येईल अशा अर्थाचा प्रश्न मुलाखतकर्त्यांनी मला विचारला त्यावर मी उत्तर देत होतो. मात्र त्याचा अर्थ राहुल गांधींना पंतप्रधान होता येणार नही अशा प्रकरचा अर्थ कुणी लावत असतील तर ते योग्य होणारे नाही असे पवारांचे सोमवारचे म्हणणे आहे. जर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केंद्रात सरकार स्थापन करण्याची संधी आली नाही तर, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू अथवा मायावती यांच्यापैकी एक नेता त्या पदासाठी सुयोग्य ठरेल असे विधान शरद पवारांनी माध्यमांना मुलाखत देताना करून टाकले. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाला शरद पवारांचा पाठींबा नाही का अशी शंका त्यातून व्यक्त होतेच होते. त्यामुळेच या विधानाचा नेमका अर्थ काय असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
महाआघाडीच्या गोटात त्याने निकालाआधीच मोठीच खळबळ उडालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी पंधरा वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण होती व म्हणून ते उत्तम पंतप्रधान बनले असे भाजपाचे नेते सांगत असतानाच पवारांनी विरोधी गोटातील तीन आजी-माजी मुख्यमंत्र्यांची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे. राहुल गांधी यांना प्रशासनाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे ते देशाचे नेतृत्त्व करू शकतील किंवा नाही याविषयी अनेकांच्या मनात असणारी शंकाच पवारांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. मात्र राहुल या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत असे आपले म्हणणे नाही असेही शरदरावांनी लगेचच सांगितले आहे. ते म्हणतात की, स्वतः राहुल यांनीच पंततप्रधान होण्यात रस नाही हे अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे प्रसासनाचा अनुभव असणाऱ्या ममता, मायावती व नायडूंना संधी द्यावी लागेल. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सांवत यांनी या गोष्टीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील वातावरण सध्या काँग्रेससाठीच अनुकूल आहे. काँग्रेसचेच खासदार सर्वाधिक संख्येने निवडून येणार आहेत. त्यामुळे राहुलजींनीच पंतप्रधान बनावे अशी सहाजिकच काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण मोदींनी वारंवार सांगिल्यानुसार काँग्रेसच्या एकशे तीस-पस्तीस वर्षांच्या इतिहासात २०१४ ची निवडणूक अशी होती की काँग्रेसची खासदारांची संख्या इतिहासात सर्वात कमी राहिली तर २०१९ च्या निवढणुकीचे वैशिष्ट्य असे आहे की काँग्रेसने त्यांच्या आजवरच्या इतिहासातील लोकसभेच्या सर्वात कमी जागा लढवल्या आहेत. याउलट भारतीय जनता पक्षाने तब्बल ४३७ जागी आपले कमळ चिन्ह लढवले आहे. पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या हिंदीभाषिक भूमीत भाजपाला मागील निवडणुकीइतके यश मिळणार नाही. यावरच काँग्रेसची सारी गणिते अवलंबून आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे की, २०१४ पेक्षा काँग्रेस यावेळी तिप्पट जागा जिंकणार आहे. म्हणजेच जास्तीतजास्त १३२ खासदार निवडून येतील असे पक्षाला वाटते आहे. हा अर्थातच अधिकाकडे झुकणारा आशावाद आहे. प्रत्यक्षात काँग्रेस शंभरी पार करेल का याची शंका व्यक्त होत आहे. काँग्रेस हाच सतराव्या लोकसभेतील मोठा विरोधी पक्ष राहील आणि आपोआपच विरोधी फळीचे नेतृत्त्व राहुल गांधींकडे येईल. काँग्रेसने शंभरी पार करणे याचाच अर्थ भाजपाचा आकडा २०० च्या खाली येणे असा राहील. कारण भाजपाने मावळत्या लोकसभेत ज्या २८२ जागा जिंकल्या होत्या त्यातील १२६ जागांवर काँग्रेसच क्रमांक दोनचा पक्ष होता. त्या क्रमांक दोनच्या जागा काँग्रेस यावेळी जिंकेल असा त्या पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे. पण या साऱ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
शरद पवारांनी केलेल्या त्या विधानाला आणखीही संदर्भ आहे. तो स्वतः मोदींच्या एक गाजलेल्या मुलाखतीचा. विख्यात अभिनेते अक्षय कुमार यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदींनी सांगितले होते की देशात आजवर केवळ दोन मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली. मोदी स्वतः आणि जनता दलाचे देवेगौडा. देवेगौडा मुख्यमंत्रीपदावर फार काळ नव्हते. मोदी जवळजवळ पंधरा वर्षे राज्याचे प्रशासन चांलवत होते. मोदी म्हणतात की, मुख्यमंत्र्यांना बारीक बारीक शेकडो गोष्टींमध्ये दररोज निर्णय करावे लागतात, कामे करवून घ्यावी लागताता. तो अनुभव देश चालवताना उपयुक्त ठरतो. ममता, मायावती व चंद्राबाबूंपेक्षा स्वतः शरद पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव मोठा आहे. दांडगा आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या व विकासात गती असणाऱ्या राज्याचे शरदराव चार वेळा मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्र्यांनाच पंतप्रधानपदाची संधी द्यायची असेल तर स्वतः शरदरावांचे नाव सर्वात आघाडीवर ठेवावे लागेल अशी मिष्किल प्रतिक्रिया एका जुन्या काँग्रेस नेत्याने दिली. ती बोलकी आहे. पण शरदरावांनी याच मुलाखतीत असेही स्पष्ट केले आहे की त्यांचा पक्ष या निवडणुकीत राज्यात फक्त 22 जागा लढवत आहे. ते सर्व जरी निवडून आले तरीही ती संख्या देशावर राज्य करण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे ते स्वतः या शर्यतीत नाहीत.
पण जे शरदरावांना ओळखतात त्यांना हे माहित आहे की जर रालोआचे सरकार बनणार नसेल व विरोधकांमध्येही पुरेसे संख्याबळ नसेल तर जोड-तोड करून सरकार स्थापन करण्याची शक्ती व क्षमता केवळ पवारांमध्येच आहे. शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यासंदर्भात सोमवारी पवार म्हणाले आहेत की, राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव मी घेतले. माझ्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. अजुनी निकालापर्यंत तीन आठवड्यांचा अवधी आहे. आणखी बरीच उलटसुलट विधाने येणारच आहेत.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी