Details
हिंदुस्थानात फक्त शिव्या आणि मारच खायचा काय?
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
बॅ. विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र दामोदरदास मोदी या तीन व्यक्ती या हिंदुस्थानात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. सावरकर यांचे हिंदुत्व, ठाकरे यांचे हिंदुत्व आणि मोदी यांचे हिंदुत्व आणि त्यांची परिभाषा सारखीच आहे. कारण हा हिंदुस्थान आहे आणि त्याचा हिंदुस्थान हा नामोच्चार सर्रास करण्यात येतो. अगदी शरद पवार असोत की असदुद्दीन ओवेसी. या देशाला हिंदुस्थान म्हणूनच संबोधतात. बॅ. मोहम्मद अली जीना 1937 च्या सुमारास सावरकर यांच्या विचारांना सलाम करीत असत. पण 10 वर्षांत इतकी परिस्थिती बदलली आणि इंग्रजांच्या `फोडा आणि झोडा’ या नीतीमुळे 1947 साली या हिंदुस्थानाची फाळणी करावी लागली. 1937 चे जीना यांनी 1947 मध्ये म. गांधी यांच्यासमोर देशाच्या फाळणीचा प्रस्ताव ठेवला आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान तसेच हिंदुंसाठी हिंदुस्थान अशी 14 आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी एक राष्ट्रातून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली आणि या हिंदुस्थानचे दोन तुकडे करुन इंग्रज आपल्या देशातून परागंदा झाले.
आजही पाकिस्तानच्या राजधानीत सचिवालयावर ‘इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तान’ अशी ठळक अक्षरे अभिमानाने मिरवताहेत पण हे भाग्य ‘हिंदुंचा हिंदुस्थान’ असं वाचण्याचे आपल्या नशिबी नाही. `हिंदुराष्ट्र’ हा शब्दसुध्दा आपण उच्चारू शकत नाही. या देशात चीन आणि रशियाचा कम्युनिस्ट पक्ष आहे. त्या कम्युनिस्टांना या देशाशी काही देणं नाही की घेणं नाही. माओवाद आणि मार्क्सवाद इतका फोफावलाय की तो हिंदुंना गिळंकृत करतोय की काय अशी शंका यावी. या देशात आक्रमक मोघलांनी आपल्या देवीदेवतांची विटंबना केली. हिंदुंची मंदिरे जमीनदोस्त करून मशिदी बांधल्या. मग 1992 ला 6 डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडण्यात आल्यानंतर हिंदुंना तर `रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग’ अशा अवस्थेत जगावं लागतंय.
मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. महाराष्ट्रात मराठीला मानाचं पान मिळवून देण्यासाठी मोठे धाडसी पाऊल उचलले आणि फाटक्या वस्त्रांनिशी मायमराठी मंत्रालयाच्या पायथ्याशी सोनेरी मुकूट घेऊन उभी असल्याचं कवी कुसुमाग्रज यांनी नमूद केले होते आणि कुसुमाग्रजांची ही इच्छा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1 मे 1995 रोजी पूर्ण केली. तेलगू अस्मितेसाठी एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम स्थापन करून अवघ्या नवव्या महिन्यात सत्ता हस्तगत केली. पण मराठी माणसासाठी संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊनही शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी ३५ वर्षे लागली. भारतीय जनता पार्टी आणि 45 अपक्ष आमदारांच्या मदतीने ही सत्ता शिवसेनेला मिळाली पण केवळ मराठी, मराठी करून आपण पाकिस्तानशी मुकाबला करू शकणार नाही, अशी भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे, पर्यायाने शिवसेनेने हिंदुत्व अंगिकारले आणि या हिंदुत्वाच्या धाग्याने शिवसेना-भाजपा युती म्हणून एकत्र आले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी पडली तेव्हा `जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे’ असे उद्गार ठाकरे यांनी काढले होते आणि हे उद्गार संपूर्ण हिंदुस्थानात गाजले. शिवसेनेचे तेव्हाचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी बाळासाहेबांचे हे उद्गार आणि बाबरी पाडतानाचे प्रसिध्द छायाचित्रकार मोहन बने यांनी काढलेले छायाचित्र याची एक दिनदर्शिका बनविली. पण तीही जप्त करण्यात आली.
आक्रमकांनी हिंदुस्थानात येऊन हिंदुंची हजारो मंदिरे धराशायी करून त्यावर मशिदी बांधल्या आणि हिंदुस्थनातील हिंदुंची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा काढला याचे छायाचित्र किवा त्याचा देखावा आपण आपल्या हिंदुस्थानात लावू शकत नाही? काश्मिरी पंडित काश्मीरमधून बाहेर काढला जातो, प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला. आज तिथे रामलल्लाची मूर्ती आहे. पण तिथे भव्य राममंदिर होऊ शकत नाही? घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना घटनेचा मसुदा सुपूर्द केला. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. आपला देश धर्मनिरपेक्ष झाला. तेव्हापासून आता तर हिंदुंना शिव्या घातल्या की तो झाला धर्मनिरपेक्ष. तो झाला सेक्युलर. या देशात प्रत्येकाला त्याला धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे ना? मग हिंदुंना अन्याय का सहन करावा लागतो?
स्वा. सावरकर यांना ब्रिटीशांच्या विरोधात लढण्याची शिक्षा म्हणून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो त्यांचा काळ किती संघर्षमय आणि यातना सहन करण्यात गेला. पण त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना सजा कशा करत नाहीत? इंदिरा गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांनी बखले यांना पाठविलेल्या पत्राची प्रत मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना स्वा. सावरकर यांचे चित्रकर्ती चंद्रकला कदम यांनी चितारलेले तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले. त्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी एक छोटेखानी पुस्तिका छापली. हे पत्र निदान सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींपासून समस्त काँग्रेस कार्यकर्ते वाचण्याचे कष्ट घेतील काय?
महाराष्ट्राचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी विश्लेषण करताना भारताचा पंतप्रधान आतापर्यंत प्रकांडपंडित कसा असायचा हे सोदाहरण पटवून दिले होते. पी. व्ही. नरसिंहराव 14 भाषा ज्ञात असलेले प्रकांडपंडित होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बाबरी पडली. कोणताही कट्टर मुसलमान हा अतिक्रमणाने बांधलेल्या मशिदीत नमाज पढत नाही, असे सांगण्यात येते. मग बाबरीचा हट्ट का, असे मुसलमान बांधव म्हणतात. पण केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लोकांची माथी भडकविण्याचा उद्योग करताहेत. या मातीवर प्रेम असणारे या देशात सुरक्षित राहू शकतात असे असताना विद्वेष पसरविण्याची गरज काय? पण घरात पोथ्या वाचणारे तथाकथित नेते बाहेर सेक्युलरवादाचा बुरखा परिधान करून हिंदुंना शिव्या देण्यात धन्यता मानतात. आपला हिंदुस्थान स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली. पण स्वा. सावरकरांना भारतरत्न मिळू शकत नाही? एका घरात तीन-तीन भारतरत्न दिले जातात, पण या देशासाठी प्राणांचे बलिदान करणारे वंचित राहतात. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब द्यावा म्हणून मागणी करावी लागते. सावरकर, बाळासाहेब अशा महान विभूतींना भारतरत्न देणे हा आपलाच बहुमान ठरेल. वास्तविक सावरकर, अटल बिहारी, बाळासाहेब, बाबासाहेब ही खरेतर विश्वरत्नं आहेत. पण तत्कालीन ढोंगी राजकीय नेत्यांनी या देशाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचे चरित्र प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता जर वाचू लागला तर त्याचे मतपरिवर्तन होऊन मनपरिवर्तन निश्चित होऊ शकेल. पण डोळ्यास लावलेल्या झापडांप्रमाणे जर कुणी वागणार असेल तर त्याला कोण काय करणार?
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची, `महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे’ ही सुस्पष्ट परिभाषा मांडली आणि 1990 साली त्यांनी जाहीर सभेत मांडलेल्या या व्याख्येची मी मुंबई उच्च न्यायालयात मनोहर जोशी यांच्या खटल्यात न्या. सॅम वरियावा यांच्या कोर्टात साक्षीदार म्हणून नोंद केली. त्या आधारावर 11 डिसेंबर 1995 रोजी सर्वोच्च न्यायालायत न्या. जे. एस. वर्मा यांनी जोशी यांना दोषमुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाचा प्रचार हा धर्माच्या आधारावरचा नसल्याचे स्पष्ट केले. तरी शिवसेना आणि भाजपा यांना जातीयवादी, धर्मांध अशा शब्दांत संबोधण्यात तथाकथित सेक्युलर स्वतःला धन्य मानतात. गोध्रा हत्त्याकांड झाले, रेल्वेचा एक अख्खा डब्बा जाळून कारसेवकांचा कोळसा झाला. हे घडविणारे गोध्राचे नगराध्यक्ष नगरसेवक हाजी बिलाल होते, हे त्याचवेळी समोर आले. पण 2002 ला नरेंद्र मोदी हे हिंदुंचे मसीहा म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्यावर कोणकोणते आरोप करून झोड उठवण्यात आली. हा एंक हिंदुहृदयसम्राट गुजरातमध्ये मोदींच्या रूपाने पाहयला मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना पदावरून हटविण्याचा विचार केला तेव्हा लालकृष्ण अडवाणींना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, `मोदी को हटाओ मत, मोदी गया तो समझो गुजरातसे भाजपा गया’ आणि बाळासाहेबांचे मोदींना अभय मिळाले. पण मोदी यांनी केवळ धर्माचा विचार न करता 5 कोटी गुजरातींसाठी विकासाची भूमिका घेतली आणि 26 मे 2014 रोजी 130 कोटींच्या हिंदुस्थानचे पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी `सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला.
हिंदुस्थानचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर त्यांनी भारत स्वच्छता अभियानापासून अनेक योजना यशस्वी करताना या देशात कोट्यवधी शौचालये बांधून मायभगिनींच्या अब्रुचे संरक्षण केले. त्यामुळे उत्तर भारतात मुसलमान समाजही मोदीसमर्थक झाला असल्याचे आपल्याला पाहयला मिळाले आहे. ईशान्य भारतात बांगलादेशी घुसखोरांची समस्या मोठी असून तिथल्या स्थानिकांना ती भेडसावत आहे. म्हणून आसाम असो वा बंगाल इथे स्थानिकांनी मतदानावर लक्ष केंद्रित करून काँग्रेस आणि तृणमूलला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी मुंबईत राहणाऱ्या आसामी बंगालींना 40/40, 50-50 हजार रूपये खर्च करून विमानाने जाऊन मतदान केल्याची उदाहरणे पाहयला यावेळच्या निवडणुकीत मिळाली. ब्रि. हेमंत महाजन यांनी एका व्याख्यानमालेत, `दहशतवाद आपणही रोखू शकतो’ या विषयावर जे विचार मांडले ते खरे तर संपूर्ण हिंदुस्थानात पसरविण्याची गरज आहे. त्यात मग माओवादी, नक्षलवादी बांग्लादेशी घुसखोर यांना आपल्याच देशातल्या तथाकथित राजकारण्यांची साथ कशी मिळते, हे समजून येईल. भीमा कोरेगाव प्रकरण असो की नक्षलवाद्यांनी केलेली हत्त्या, हे सारे आपल्या देशात सुरक्षितता, सार्वभौमता आणि एकतेवर घाला घालणारे ठरत आहे. पण त्याबद्दल बोलण्याऐवजी तथाकथित स्टंटमॅन हिंदुत्ववाद्यांना झोडण्यात धन्यता मानत आहेत.
सहिष्णू समाज हा हिंदू समाज असल्यामुळे तो काहीही सहन करू शकतो, असा त्यांचा समज आहे. मालेगाव बॉम्बस्फोट झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीची वृत्तपत्रे काढून पाहिली तर तो बॉम्बस्फोट लष्कर-ए-तोयबाने घडविल्याचे दिसून येते. पण भगवा आतंकवाद आणि हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करून तत्कालीन राज्यकर्त्यांनी हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आणि त्यामुळे निर्दोष लोकांना नऊ-नऊ वर्षे शारीरिक, मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. या देशातल्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे न्यायदेवता जो निर्णय देईल तो निष्पक्षच असेल. पण निकालापूर्वीच कुणाला झोडपून काढायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत. मुसलमान समाज हा हिंदुस्थानात जेवढा सुरक्षित आहे तेवढा तो पाकिस्तानात नाही. पाकिस्तानातल्या मशिदींचे भोंगे परवेझ मुशर्रफ असताना काढण्यात आले, पण हिंदुस्थानात लोकांची सकाळ मशिदीतल्या भोंग्यावरून होणाऱ्या बांगेने होते, हे तर सत्यच आहे. हिंदू, मुस्लीम एकतेची अनेक उदाहरणे देण्यात येतात. पण माथी भडकवणारे नतद्रष्ट कमी नाहीत. साध्वी प्रज्ञाने नथुराम गोडसेंचे गोडवे गायिले. त्याकरिता त्यांना झोडण्याचे काम सुरू झाले. पण साध्वींची प्रतिक्रिया ही कमल हसनच्या वादग्रस्त विधानावर होती. त्या कमल हसनचे काय? या देशाला काही जण हे स्वतःला हुतात्मा बनवून घेण्यासाठी धडपडताहेत आणि त्यातून वादग्रस्त विधाने करून प्रसिध्दी मिळवताहेत.
नथुराम गोडसे यांच्यावरचे `मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे प्रदीप दळवी आणि उदय धुरत यांचे नाटक पाहा. आचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याच्या नुसत्या गप्पा मारू नका तर खरेच आचार आणि विचारस्वातंत्र्य मानत असाल तर हे नाटक शांत डोक्याने पाहा आणि आपले पूर्वग्रहदूषित डोके बाजूला ठेवा. निश्चितच त्या डोक्यात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पण केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सावरकरांना, गोडसेला शिव्या घालणे, हिंदुंना शिव्या देणे या गोष्टी सर्रास तथाकथित राजकारणी नेत्यांकडून चालताहेत. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी गत सत्तेवरून दूर गेलेल्यांची झाली असल्याने हे प्रकार चालले आहेत. मग त्यात मार्गदर्शक म्हणून ज्यांनी वावरावे अशी अपेक्षा असते तेही जर चिथावणी देत असतील तर त्याला कोण काय करणार? एका बाजूला गांभीर्याने शपथ घ्यायची आणि मग सिध्दिविनायकापासून पांडुरंगापर्यंत पाया पडायचे. हिंदुंना शिव्या घालताना आम्ही कसे शिवभक्त आहोत याचा डांगोरा पिटायचा, हे सध्या सुरू आहे. केणत्याही धर्माने नफरत, दुःस्वास, द्वेष शिकविला नाही. एकमेकांचा आदर करण्याची, बंधुभाव, सौहार्द, सौजन्य, सहिष्णुतेची शिकवण दिली आहे. पण तोंडाने प्रेमशब्द बोलायचे आणि भाषणे मात्र शिव्यांची लाखोली भरलेली द्यायची. हेच तुमचे जर प्रेम असेल तर मग नफरत ती कोणती? अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून बाबराच्या वंशजाने एक पत्र दिले असून त्याने त्या पत्रात माफी मागितली आहे आणि हिंदू-मुस्लीम सौहार्दासाठी राममंदिर निर्माण कार्याला मदत म्हणून सोन्याची वीट देण्याचा इरादा दाखवला आहे. नरेंद्र मोदींचा `सबका साथ सबका विकास’ या घोषणेत फक्त हिंदू नव्हे तर 130 कोटी देशवासियांचा, सर्वधर्मियांचा समावेश होतो, हे जरा समजून घ्या. बहुसंख्य हिंदू असलेल्या या हिंदुस्थानात सारेजण एकोप्याने, गुण्यागोविंदाने रहात असताना या देशाच्या विकासासाठी झटत असताना त्यांना साथ देण्याऐवजी समाजात दुही माजवू नका. सर्वांना गुण्यागोविंदाने राहू द्या, सर्वांचा आदर करा. फक्त या हिंदुस्थानात हिंदुंनी आणि महाराष्ट्रात मराठी माणसाने केवळ शिव्या आणि मारच खायचा, हे कुठपर्यंत चालणार? याचा जरा समाजधुरिणांनी शांत डोक्याने विचार करावा, अन्यथा तुमच्या भांडणात सामान्य मणूस भरडला जाईल हे ध्यानात ठेवा.”
“योगेश वसंत त्रिवेदी