HomeArchiveयुतीचे घोडे निघाले...

युतीचे घोडे निघाले जोरात.. पण?

Details
युतीचे घोडे निघाले जोरात.. पण?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची जी युती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडवली गेली ती पुढेही टिकणार आहे याची ग्वाही देण्याची धडपड शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सतत करावी लागते आहे. याचे कारण मागच्या वेळेचा, लोकसभा निवडणुकीनंतर युती तुटल्याचा कटू अनुभव सेनेच्या गाठीशी आहे. 2014 ची निवडणूक अशीच पहिल्या मोदी लाटेत युतीने जिंकली होती. 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 41 मिळाल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टमध्ये शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली. जागावाटपाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळेस शिवसेना नेते आणि शिवसैनिक हादरले असणारच. त्याच धक्क्यातून सेना अद्यापी पुरतेपणाने सावरली नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे राज्यातील कोणत्याही शहरात गेले तरी, “पुढे काय होणार? युतीचा कारभार कसा सुरू राहणार?” याची चर्चा कार्यकर्ते, नेते ठाकरेंशी करतात. त्याच विषयावरील प्रश्न गावोगावचे माध्यम प्रतिनिधीही त्यामुळेच विचारतात. आजवरच्या राजकीय इतिहासात कधीही नव्हती अशी दणकट स्थिती भारतीय जनता पक्षाची सध्या झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक स्तरावरचे नेते सातत्याने आपल्या राज्य व देशस्तरीय नेत्यांना सुचवत असतात की “युती नको, आपण स्वतंत्र लढू! आणि विधानसभेत स्वबळावरच बुहमत मिळवू!” शत-प्रतिशत भाजपा हा मंत्र सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे, असे या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे तिथे युती तोडाचा जयघोष अधुनमधून ऐकू येतो..

त्यामुळेच युती टिकणार की नाही अथवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की नाही हे प्रश्न अद्यापी अधांतरीच आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी वॉकओव्हर आहे अशीच स्थिती दिसते. 220 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा सेनेने दोन्ही काँग्रेस पक्षांना व अन्य विरोधकांना मागे टाकले आहे. त्यामुळे उत्साहात आलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले नाही तरच नवल ठरेल. त्याचवेळी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बसावा ही अमित शाह व मोदींची इच्छा असणार हेही स्पष्ट आहे. ठाकरे व फडणवीस दोघांनीही मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणतेही भाष्य थेट केलेले नाही. लोकसभेच्या जागावाटपावेळी विधानसभेत दोन्ही पक्ष समान जागांवर लढतील व मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षाचा क्रमशः हक्क असणार असे ठरल्याचे सेनेतर्फे सांगितले जात होते. लोकसभा निकालानंतर दिल्लीच्या एका इंग्रजी प्रतिष्ठित पत्राशी बोलताना फडणवीस यांनी त्याबाबतीत काहीही अद्यापी ठरलेले नाही असे स्पष्ट केले आहे. तो प्रश्न योग्य वेळी सोडवला जाईल अशी भाषा त्यांनी केली आहे.

या वातावरणात भाजपा सेनेमध्ये, विधानसभेमध्ये किती जागा कुणी लढायच्या व कुठून लढायच्या, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महत्त्वाची व कळीची ठरते आहे. ते एकाचवेळी दिल्ली आणि मुंबईत समन्वय ठेवण्याचे काम करतात. त्याचवेळी कोल्हापूरचे सारे छत्रपती नीट सांभाळतात अशी त्यांची ख्याती आहे. वर्षा आणि मातोश्री या महाराष्ट्रातील दोन शक्तीस्थळांमध्येही दुवा म्हणून चंद्रकांत दादांची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. अशा या दादांनी जागावाटपाचे एक सूत्र सध्या महाराष्ट्राला सादर केले आहे. त्यावर शिवसेनेकडूनही तातडीने व तीव्रतेने प्रतिक्रिया उमटलेली आहे. दादांनी जे जाहीर केले असे कोणतेही सूत्र ठरलेलेच नाही असे संजय राऊतांनी जाहीर केले आहे. चंद्रकांत दादा जे बोलतात त्याला दिल्लीचेही पाठबळ असते ही बाब इथे लक्षात ठेवावी लागते. दादांनी दहा एक दिवसांपूर्वी, म्हणजे राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याच्या आधी, हे विधान केले आहे. ते म्हणाले की, राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप व शिवसेनेची युती कायम राहणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ जागांवर लढणार आहे. तर, महायुतीतील घटक पक्षांना उर्वरित, म्हणजे १८ जागा देण्यात येणार आहेत. या उद्गारांमध्येत कुठेही, “पाहू, जर-तर, बघू” असली भाषा नाही. माहिती देताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे ठाम व स्पष्ट भाषा वापरत आहेत हे महत्वा ्चे आहे.

मराठवाडा विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते औरंगाबादेत गेले होते. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी जागावाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती दिली. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण असे एक भांडण सुरू असते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची धडपडही त्यामागे असते. जागावाटपात ज्या पक्षाला कमी जागा लढण्यासाठी मिळणार तो आपोआपच लहान भाऊ ठरतो व दुसरा होतो मोठा भाऊ! लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपचे अधिक खासदार निवडून आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची तळमळ मोठा भाऊ बनण्याची असेल, असे माध्यमांचे अंदाज आहेतच. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेच्या जागावाटपाबाबत पत्रकारांनी पाटील यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व भाजप दोघेही समसमान जागांचे सूत्र ठरवेल, तर महायुतीतील घटक पक्षांना १८ जागा देण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्या औरंगाबादेत दादा ही चर्चा करत होते तिथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. सैनिकांसाठी तो मोठाच धक्का होता. त्यातच भाजपाचे प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई खैरेंच्या विरोधात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन लढले. रायभान जाधवांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव खैरेंच्या पराभवाचे कारण बनले. आपल्या पराभवास भाजपचे पदाधिकारीच कारणीभूत असल्याचा खैरेंचा आरोप आहे. त्या संदर्भातही चंद्रकांत दादांना प्रश्न विचारले गेले. पण त्यांनी मार्मिक उत्तर दिले. त म्हणाले की खैरेंचा पराभव एका माजी शिवसैनिकानेच केला आहे!

काँग्रेसचे माजी आमदार रायभान यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव मनसेकडून 2009 मध्ये विधानसभेत पोहोचले होते. 2014 च्या निवडणुकीत ते मनसे सोडून सेनेत आले होते व तिथून आमदारही झाले होते. त्यांचे कोणत्याच पक्षात फारसे पटू शकत नाही. त्यामुळे हर्षवर्धन जाधव आमदारकी व शिवसेना, दोन्ही सोडून बाहेर पडले. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय लाभ घेण्याचा चंग बांधला होता व तो विषय घेऊन ते लोकसभा लढले. त्यांनी पावणे तीन लाखांवर मते घेतल्याने खैरे अडचणीत आले व तिथे वंचित बहुजन आघाडीचे व एमआयएमचे संयुक्त उमेदवार इम्तिआज जलील यांना पावणे चार लाख मते मिळाली. सेनेच्या खैरेंना त्यांच्यापेक्षा फक्त साडेचार हजार मते मिळाली. म्हणजेच खैरेंचा पराभव निसटता झाला आहे. या साऱ्या तपशिलाकडे बोट दाखवताना चंद्रकांतदादांनी सुनावले की खैरे यांचा पराभव शिवसेनेच्याच माजी आमदाराने केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांमुळे त्यांचा पराभव झाला नाही, असे उत्तर त्यांनी दिले ते योग्यच आहे. पण जाधव हे जसे सेनेचे माजी आमदार आहेत तसचे ते रावसाहेब दानवे यांचे सख्खे जावईसुद्धा आहेत. ही बाब खैरे कशी काय विसरणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना उलटत असताना सेना भाजपातील ही मराठवाड्याच्या स्तरावरची छोटी कुरबूर वगळली तर इतरत्र सेना भाजपा युती लोकसभेच्या निकालानंतर अधिक घट्ट झालेली दिसते आहे. तसे तर खैरेंसारखेच माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांचा पारभव अमरावतीमध्ये झाला तर पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघात सेनेचे जुने खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला. विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव रायगडमध्ये झाला. हे अपवाद वगळता शिवसेनेचे अठरा खासदार महाराष्ट्रातून विजयी झाले ही मोठी गोष्ट आहे. कारण निवडणूकपूर्व अनुमानात अनेक लोक छातीठोकपणाने सांगत होते की शिवसेनेला अत्यंत कमी जागा मिळणार! पण ते खोटे ठरवताना शिवसेनेने अठरा जागांची कमाई केली आणि रालोआमध्ये भजापानंतरच्या सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हे बिरूदही मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या मंत्रिमंडळात तेलगू देसम पक्ष सहभागी होता. त्यांना क्रमांक दोनचे स्थान होते. त्यावेळी त्यांना संसदेतील भाजपाच्या शेजारचे दालन मिळाले होते. आता त्या दालनावर शिवसेनेचा हक्क असणार आहे, हे विशेष.

शिवसेनेचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व असे वाढत असतानाच आणखी साडेतीन चार महिन्यांनी महाराष्ट्रात जे नवे राजकीय चित्र तयार होईल त्यात सेना कुठे दिसेल? शिवेसनेचा मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर बसला पहिजे आणि त्याने मातोश्रीच्या प्रेरणेने राज्य केले पाहिजे ही शिवसैनिकांची व ठाकरे कुटुंबियांची तीव्र इच्छा आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याचा अघोषित निर्णय जाहीर करून ठाकरेंच्या घरातील पहिला निवडणूक पुरूष ठरण्याचा मान घेतला आहे. जुन्या प्रथा परंपरांना तीलांजली देत सेना पुढे जात असताना त्यांनी आणखी एक नवा प्रघातही निर्माण केला आहे. त्यांनी शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले. दुसऱ्या एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता सेनेच्या या व्यासपीठावर येणे हा सेनेच्या दृष्टीने संस्कृतिक धक्काच होता. तो धक्का मारून ठाकरेंनी शिवसेनेच्या नव्या स्वरूपाची नांदी केलेली आहे. हा बदल चांगला की वाईट हे येणारा काळच ठरवणार आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content