HomeArchiveमर्जीविरूद्ध वागली! बापाने...

मर्जीविरूद्ध वागली! बापाने कायमची संपवली!!

Details
मर्जीविरूद्ध वागली! बापाने कायमची संपवली!!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
समाज पुढे चालला आहे, प्रथा-परंपरा बदलल्या आहेत, काळाबरोबर माणूस चालतो आहे, असे आपण कितीही म्हणत असलो तरी आजही समाजामध्ये पूर्वापार प्रथा-परंपरा सुरूच असल्याचे आणि त्यातून माणसे अद्याप बाहेर पडलेली नसल्याचे दिसून येत आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक लोक आपल्याच पोटच्या गोळ्यांना नाहीसे करीत आहेत. घाटकोपरमध्येही नुकतीच अशीच एक ऑनर किलिंगची घटना घडली. बापानेच आपल्या पोटच्या पोरीला मर्जीविरूद्ध वागली म्हणून कायमची संपवून टाकण्याची घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आहे.

राजकुमार चौरसिया नावाच्या त्या बापाला वाटत होते की, आपल्या समाजात पूर्वीपासून ज्या प्रथा-परंपरा सुरू आहेत, त्याच आपल्या पुढच्या पिढीनेही पाळल्या पाहिजेत. तसेच वागले पाहिजे. आपल्या मुलीने आपल्याच सांगण्यानुसार वागावे, आपण सांगू त्याच मुलाशी विवाह करावा, बापाची प्रतिष्ठा जपावी, वगैरे वगैरे.. कारण बापाने पूर्वीच्या काळी याचप्रमाणे केले होते. पूर्वीच्या काळी आई-वडीलच मुलांची लग्ने जमवत असत आणि लावून देत असत. आजही ही प्रथा देशातील अनेक भागांमध्ये सुरू आहे. मात्र मुंबईसारख्या शहरात राहत असताना सुधारणेचे वारे पुढील पिढीला लागले आणि ही आपली पुढील पिढी आपल्या विचाराने वागू लागली, तर तेही आपण स्वीकारले पाहिजे, त्यातून काहीतरी चांगले घडावे, अशी अपेक्षा केली, तर काहीच चुकीचे नाही. मात्र घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेने हे सारेच संकेत धुडकावून लावले. राजकुमार चौरसिया या निष्ठूर आणि क्रूर बापाने आपली मुलगी आपण सांगितलेले ऐकत नाही म्हणून, तिने आपल्या मर्जीने प्रेमविवाह केला म्हणून जे पाऊल उचलले, ते खरोखरच बाप नावाच्या व्यक्तीच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, हेच दाखवणारे आहे.

आरोपी राजकुमार चौरसिया याची मुलगी मीनाक्षी (20) ही गावातीलच एका तरूणाच्या प्रेमात पडली होती. राजकुमार चौरसिया याच्या कानावर ही बाब आली होती. त्याला आपल्या मुलीने प्रेम करणे पसंद पडले नव्हते. त्यामुळे त्याने तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती काही ऐकायला तयार नव्हती. तरीही बापाने आपले कर्तव्य म्हणून मीनाक्षीचे लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली. त्याने तिचे लग्न जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिला पाहण्यासाठी स्थळे आणण्यासाठी नात्यातल्याच लोकांशी तो बोलू लागला. काही तरूणांचे प्रस्ताव तिच्यासाठी आणलेही. असेच दोन तरूणांचे प्रस्ताव त्याला चांगले वाटले होते. त्याने त्यांच्याशी मीनाक्षीचे लग्न जमवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र मीनाक्षीने त्या दोन्ही प्रस्तावांना धुडकावून लावले. त्याचा राग बापाच्या मनात होता. अशातच मीनाक्षीने आपल्या प्रियकराबरोबर रंग उधळण्यास सुरूवातही केली होती. तिला त्याच्यापासून दिवसही गेले. लग्न झालेले नसतानाही दिवस गेल्याने बापाच्या डोक्यात आणखीनच तिडीक गेली. गेल्या मार्च महिन्यात गर्भवती असल्याचे मीनाक्षीच्या लक्षात आले. तिने आपल्या प्रियकराला ही बाब सांगितली. अखेर त्या प्रियकराने तिच्याशी एप्रिल महिन्यात विवाह केला.

अशा रीतीने मीनाक्षीने बापाच्या नाकावर टिच्चून स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला. ती प्रियकराशी लग्न करून त्याच्या घरी जाऊन राहू लागली. मात्र बाप राजकुमारला काही ही बाब पचनी पडली नव्हती. हे सर्व संपवून टाकले पाहिजे. आपली मुलगी आपल्या मर्जीविरूद्ध वागली म्हणजे आपल्या समाजात आता आपल्याला काहीच किंमत राहणार नाही, लोक आपल्याला टोचून बोलणार, वगैरे.. त्यामुळे त्याच्या मनात आणि डोक्यात एकच भुंगा सारखा सारखा फिरत होता. आता काय करायचे? आपण आपली प्रतिष्ठा जपली पाहिजे. त्यासाठी मुलगी या जगातून नाहीशी झाली तरी चालेल, अशा टोकाच्या निर्णयापर्यंत तो आला होता. मात्र त्याला तशी काही संधी मिळत नव्हती. तो गेले काही दिवस अशाच संधीची वाट पाहत होता.

.. आणि त्याला एक संधी चालून आल्याचे निदर्शनास आले. मीनाक्षीने ज्याच्याशी प्रेमविवाह केला होता, तो पानाची टपरी चालवणारा एक साधा तरूण होता. त्याची आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मीनाक्षीला पैशांची गरज आहे, हे त्याला समजले. त्याने लगेचच याच गोष्टीचा फायदा उठवायचे ठरवून मीनाक्षीला फोन केला. आपल्या निर्णयाने दुखावलेला आपला बाप एवढ्या दिवसांनंतर आपल्याला फोन करतो आहे हे म्हटल्यानंतर त्या मुलीची काय स्थिती झाली असेल? त्यातच आपला बाप झाले गेले सर्व विसरून आपल्याला मदत करायला तयार झाला आहे, हे पाहून ती आणखीनच हरखून गेली. बाप राजकुमारने तिला पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तीही बापाच्या ओढीने आणि पैशांच्या अपेक्षेने बापाने बोलावलेल्या जागी आली. मोठ्या अपेक्षेने ती आली होती. आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याची साधी पुसटशी कल्पनाही तिला आली नव्हती. घाटकोपर पश्चिमेकडील मधुबन टोयाटो शोरूमसमोरील पदपथावर भेटण्याचे ठरले होते. बापाने बोलावलेले म्हणून मीनाक्षी आली होती. मात्र तिला तिच्या बापाने नव्हे तर काळानेच बोलावले होते हे तिला ठाऊकच नव्हते. पैसे देण्याच्या बहाण्याने बापाने तिला बोलावले होते. त्याने तिच्याकडे पैसे पुढे केले. मात्र त्याचवेळी त्यातील काही नोटा मुद्दामहून खाली पाडल्या. त्या नोटा उचलण्यासाठी मीनाक्षी खाली वाकली आणि क्रूर, कपटी बापाने तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवून टाकले.
या घटनेने परिसरातील लोकांमध्ये खळबळ माजली. मीनाक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

घाटकोपर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मीनाक्षीला राजावाडी रूग्णालयात नेले. मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मीनाक्षीला मृत घोषित केले. मुंबईत गजबजलेल्या ठिकाणी एका विवाहित तरूणीच्या हत्त्येची गंभीर दखल घाटकोपर पोलिसांनी घेतली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दातीर, सहायक निरीक्षक दीप बने, उपनिरीक्षक खंदारे, भोसले यांची पथके तयार करण्यात आली. मीनाक्षी घाटकोपर पश्चिमेकडील शिवपुरी चाळीत राहत होती. तिने ब्रिजेश चौरसिया या तरूणाशी प्रेमविवाह केला होता आणि फेब्रुवारी महिन्यात ती उत्तर प्रदेश येथून मुंबईत आली होती. ही घटना घडली त्याठिकाणी त्यावेळी कुणीही नव्हते. ही घटना घडताना कुणीही पाहिले नव्हते. त्यामुळे या तरूणीची हत्या नेमकी कुणी केली हे आधी कुणालाच माहित नव्हते. त्यामुळे पोलिसांचा पहिला संशय तिच्या पतीवर जात असल्याने पोलिसांनी ब्रिजेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, प्राथमिक चौकशीत त्याचा सहभाग उघड होत नव्हता.

मीनाक्षी हिची ज्याठिकाणी हत्त्या करण्यात आली, तो परिसर पोलिसांनी पिंजून काढला. त्याठिकाणी केलेल्या चौकशीतूनही काहीच हाती लागत नसल्याने पोलिसांनी अखेर मीनाक्षीचे वडील राजकुमार, भाऊ तसेच इतर काही नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीत राजकुमार मुलीला शनिवारी रात्री भेटल्याचे पुढे आले. सुरूवातीला टाळाटाळ करणाऱ्या राजकुमार याच्यावर पोलिसांनी उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती सुरू करताच त्याची फाफलली. खोटे बोलून बोलून तुम्ही किती खोटे बोलणार? अखेरीस खोटेपणा उघडा पडतोच. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत त्याने अखेर मुलीची हत्त्या केल्याचे मान्य केले.

त्यानेच खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या मुलीलाच या जगातून नाहीसे केले होते. अखेर मीनाक्षी ब्रिजेश चौरासिया या तरूणीच्या हत्त्येप्रकरणी राजकुमार चौरसिया याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांनी जमविलेली दोन लग्न मोडीत काढत मीनाक्षी हिने मर्जीविरोधात गावातील तरूणाशी विवाह केला, याच रागातून राजकुमारने आपल्या मुलीची हत्त्या केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला ही मंडळी आणखी किती काळ कुरवाळत बसणार आहेत कुणास ठाऊक?”
 
“जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content