Details
भगवान धन्वंतरींच्या बाळांचे दर्शन घडविले!
04-Sep-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार
yogeshtrivedi55@gmail.com
महेश मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास दिलीप ठाकूर निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की, महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणला आणि त्यात त्यांनी साक्षात छत्रपती शिवराय साकारले. इतकेच नव्हे तर ताकदीचा अभिनेता सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसलेंची भूमिका वठवलीय. त्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात किंबहुना देशातील शिवप्रेमी जनतेला, पर्यायाने समस्त समाजासमोर एक चांगला धडा घालून दिला आहे. आपल्याला या चित्रपटाचे समीक्षण किंवा रसग्रहण करायचे नाही तर यातील शेवटच्या भागात सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसले यांच्या मुखातून जे वास्तव समोर मांडले आहे, त्याद्वारे झणझणीत अंजन घातले, असेच म्हणावे लागेल.
विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा साधा विचार दिनकरराव भोसलेंनी बोलून दाखवला काय दिनकरराव भोसल्यांच्या अंगावर लोकं धावून काय येतात आणि दगड काय मारतात. याचवेळी दिनकरराव म्हणतात, “”निवडून आलेले लोक दोषी नाहीत तर त्यांना निवडून देणारे आपणच दोषी आहोत. आपण जर ठरविले तर या देशाचा अर्थमंत्री अर्थतज्ज्ञ होऊ शकतो, एखादा डॉक्टर आरोग्यमंत्री होऊ शकतो आणि शिक्षणतज्ज्ञ शिक्षणमंत्री होऊ शकतो.”” या दिनकरराव भोसलेंची म्हणजेच सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांची आज प्रकर्षाने आठवण यासाठी आली की, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला योग्य त्या कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळाल्या आहेत. अर्थात देशाचे नेतृत्त्वसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या खंबीर अशा हातात आले असून आता भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
महाराष्ट्रात गेल्या चाळीस वर्षांत पडला नसेल एवढा पाऊस यंदा पडला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्जन्यमानाने सर्व विक्रम मोडून जनतेला त्राहीत्राही करून सोडले. महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टीने थैमान घातले. बोट उलटून १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर लाखोंना स्थलांतरित करावे लागले. पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. महापूर ओसरू लागला तसा पुनर्वसन आणि समस्त विस्थापित नागरिकांचे संसार पुनश्च उभे करून देण्याचे आव्हान उभे ठाकले. या सर्व धामधुमीत आशेचा किरण दिसला तो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या रूपाने. शरद पवार टीकेचे प्रहार करीत करीत पूरग्रस्त भागात जाऊन पोहोचले खरे, त्यांनी दिलासा देण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात ठिय्या देऊन काम केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यसकट सुव्यवस्था सांभाळताना सगळीकडे लक्ष द्यावे लागत आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी ६ हजार ८०० कोटी रूपयांची केंद्राकडे मागणी करतानाच तेवढ्याच रकमेचे पॅकेज तयार केले आहे. नीती आयोगांतर्गत कृषीक्षेत्राच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली देशातील मुख्यमंत्र्यांची उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीला विजय रूपाणी, कमलनाथ, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्त भागात ठिय्या देऊन काम करणाऱ्यांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा पुरेपूर लाभ पूरग्रस्तांना मिळवून दिला. आरोग्य शिबिरात हजारोंच्या संख्येने पूरग्रस्तांना स्वतः हातात स्टेथस्कोप घेऊन तपासून योग्य ते औषधोपचार केले. डॉ. बालाजी किणीकर हे हाडाचे कार्यकर्ते. अंबरनाथ येथील झोपडपट्टीमधून तळागाळातून काम करणाऱ्या या उच्च विद्याविभूषित कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेरले आणि विधानसभेत पाठविले. असे असले तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किणीकर यांनी वैद्यकीय तपासणी, उपचार यापासून पाठ न फिरविता आपल्या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग केला.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरोग्यसेवेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली. ज्येष्ठ पत्रकार मंगेश चिवटे यांच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा उत्कृष्ठ काम करीत आहे. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी अनुराधा जुवेकर, या पती घनश्याम, सुपूत्र बिल्वेश, सुकन्या अवनी यांच्यासमवेत कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करीताना एका स्वीफ्ट मोटारीने जुवेकरांच्या मोटारीला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात जुवेकर परिवाराची कधीही भरून न येणारी अपरिमित हानी झाली. यावेळी महाड आणि ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चिवटे यांच्या यंत्रणेने अतिशय वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली. हे तर एक माझ्या परिचयातले उदाहरण आहे. परंतु दररोजच्या अशा असंख्य वैद्यकीय सहकार्याच्या घटना आपल्याला पाहयला मिळतील.
डॉ. विजयकुमार गावित १९९५ पासून प्रकाशात आलेले आणखी एक राजकीय नेतृत्त्व. आदिवासी समाजाचे हे नेते नंदुरबार येथून पहिल्यांदा १९९५ साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. डॉ. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री झाले. डॉ. मनोहर जोशी हे हाडाचे शिक्षक. त्यांनी मुख्यमंत्री असताना १९९५ ते १९९९ या कालावधीत वर्षा, या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी प्रौढसाक्षरतेचे वर्ग चालविले होते. ते शिक्षकाच्या भूमिकेत वावरत होते. त्यांना ‘सर’ म्हणून सारे निकटवर्तीय संबोधतात. डॉ. विजयकुमार गावित हे एम.बी.बी.एस. आहेत. तशी त्यांची कन्या हीना हीसुद्धा डॉक्टर आहे. २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या हीना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते, तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी हीना मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत होत्या. डॉ. विजयकुमार गावित महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि अशीच एक नैसर्गिक आपत्ती आली असताना डॉ. गावित यांनी मुंबईतील एका इस्पितळाला भेट दिली. मंत्र्यांना काय कळतंय या आविर्भावात त्या इस्पितळातले डॉक्टर वावरत होते. विजयकुमार गावित यांनी थेट स्टेथस्कोप कानाला लावला आणि तेथील रूग्णांना तपासून प्रिस्क्रिप्शन पाहिले. त्यात त्यांना आक्षेपार्ह वाटले आणि त्यांनी त्या इस्पितळातल्या डॉक्टराला फैलावर घेतले. औषधे बदलून दिली.
डॉ. रणजित पाटील अमरावती येथील विधान परिषद सदस्य. ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही डॉक्टर असून घराबाहेर पडण्यापूर्वी एक तरी शस्त्रक्रिया पूर्ण करायचीच, हा त्यांचा दंडक/ दिनक्रम. आज त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यशस्वी नगरविकास राज्यमंत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हेही स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेतल्याचा लाभ आपल्या विभागाला मिळवून दिला. या सर्व गोष्टी लक्षात घेता आज महाराष्ट्रात महापूर परिस्थितीमध्ये राज्य सरकारने महापुरानंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुनर्वसनाचे शिवधनुष्य लीलया पेलले असेच म्हणावे लागेल. आपण घेतलेल्या शिक्षणाचा आणि आपल्याला आलेल्या अनुभवांची शिदोरी आपण पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिली, हेच माणुसकीचे कर्तव्य पार पाडल्याचे सार्थक म्हणता येईल. विरोधासाठी विरोध न करता या शिक्षण आणि अनुभवाचा सदुपयोग करून देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे म्हणूनच कौतुक करणे आवश्यक आहे.
अशावेळीच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र महत्त्वाचे ठरते. एका बाजूला सर्वांनी खांद्याला खांदा लावून नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची भाषा करतानाच घटिया राजकारण करून आपली पोळी ‘राजकीय तव्यावर’ भाजून घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणाऱ्या महाभागांना ईश्वर सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना आपण करू शकतो. यानिमित्ताने एक बाब प्रकर्षाने समोर आली की भगवान धन्वंतरींच्या बाळांचे दर्शन या महापुराने समाजाला घडविले! ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांची ही उपमा समर्पक आहे.
”
“योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार”
yogeshtrivedi55@gmail.com
“महेश मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास दिलीप ठाकूर निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की, महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणला आणि त्यात त्यांनी साक्षात छत्रपती शिवराय साकारले. इतकेच नव्हे तर ताकदीचा अभिनेता सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसलेंची भूमिका वठवलीय. त्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात किंबहुना देशातील शिवप्रेमी जनतेला, पर्यायाने समस्त समाजासमोर एक चांगला धडा घालून दिला आहे. आपल्याला या चित्रपटाचे समीक्षण किंवा रसग्रहण करायचे नाही तर यातील शेवटच्या भागात सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसले यांच्या मुखातून जे वास्तव समोर मांडले आहे, त्याद्वारे झणझणीत अंजन घातले, असेच म्हणावे लागेल.”
“विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा साधा विचार दिनकरराव भोसलेंनी बोलून दाखवला काय दिनकरराव भोसल्यांच्या अंगावर लोकं धावून काय येतात आणि दगड काय मारतात. याचवेळी दिनकरराव म्हणतात, “”निवडून आलेले लोक दोषी नाहीत तर त्यांना निवडून देणारे आपणच दोषी आहोत. आपण जर ठरविले तर या देशाचा अर्थमंत्री अर्थतज्ज्ञ होऊ शकतो, एखादा डॉक्टर आरोग्यमंत्री होऊ शकतो आणि शिक्षणतज्ज्ञ शिक्षणमंत्री होऊ शकतो.”” या दिनकरराव भोसलेंची म्हणजेच सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांची आज प्रकर्षाने आठवण यासाठी आली की, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला योग्य त्या कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळाल्या आहेत. अर्थात देशाचे नेतृत्त्वसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या खंबीर अशा हातात आले असून आता भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.”
“महाराष्ट्रात गेल्या चाळीस वर्षांत पडला नसेल एवढा पाऊस यंदा पडला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्जन्यमानाने सर्व विक्रम मोडून जनतेला त्राहीत्राही करून सोडले. महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टीने थैमान घातले. बोट उलटून १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर लाखोंना स्थलांतरित करावे लागले. पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. महापूर ओसरू लागला तसा पुनर्वसन आणि समस्त विस्थापित नागरिकांचे संसार पुनश्च उभे करून देण्याचे आव्हान उभे ठाकले. या सर्व धामधुमीत आशेचा किरण दिसला तो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या रूपाने. शरद पवार टीकेचे प्रहार करीत करीत पूरग्रस्त भागात जाऊन पोहोचले खरे, त्यांनी दिलासा देण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात ठिय्या देऊन काम केले.”
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यसकट सुव्यवस्था सांभाळताना सगळीकडे लक्ष द्यावे लागत आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी ६ हजार ८०० कोटी रूपयांची केंद्राकडे मागणी करतानाच तेवढ्याच रकमेचे पॅकेज तयार केले आहे. नीती आयोगांतर्गत कृषीक्षेत्राच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली देशातील मुख्यमंत्र्यांची उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीला विजय रूपाणी, कमलनाथ, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्त भागात ठिय्या देऊन काम करणाऱ्यांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा पुरेपूर लाभ पूरग्रस्तांना मिळवून दिला. आरोग्य शिबिरात हजारोंच्या संख्येने पूरग्रस्तांना स्वतः हातात स्टेथस्कोप घेऊन तपासून योग्य ते औषधोपचार केले. डॉ. बालाजी किणीकर हे हाडाचे कार्यकर्ते. अंबरनाथ येथील झोपडपट्टीमधून तळागाळातून काम करणाऱ्या या उच्च विद्याविभूषित कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेरले आणि विधानसभेत पाठविले. असे असले तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किणीकर यांनी वैद्यकीय तपासणी, उपचार यापासून पाठ न फिरविता आपल्या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग केला.”
“एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरोग्यसेवेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली. ज्येष्ठ पत्रकार मंगेश चिवटे यांच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा उत्कृष्ठ काम करीत आहे. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी अनुराधा जुवेकर, या पती घनश्याम, सुपूत्र बिल्वेश, सुकन्या अवनी यांच्यासमवेत कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करीताना एका स्वीफ्ट मोटारीने जुवेकरांच्या मोटारीला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात जुवेकर परिवाराची कधीही भरून न येणारी अपरिमित हानी झाली. यावेळी महाड आणि ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चिवटे यांच्या यंत्रणेने अतिशय वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली. हे तर एक माझ्या परिचयातले उदाहरण आहे. परंतु दररोजच्या अशा असंख्य वैद्यकीय सहकार्याच्या घटना आपल्याला पाहयला मिळतील.”
“डॉ. विजयकुमार गावित १९९५ पासून प्रकाशात आलेले आणखी एक राजकीय नेतृत्त्व. आदिवासी समाजाचे हे नेते नंदुरबार येथून पहिल्यांदा १९९५ साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. डॉ. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री झाले. डॉ. मनोहर जोशी हे हाडाचे शिक्षक. त्यांनी मुख्यमंत्री असताना १९९५ ते १९९९ या कालावधीत वर्षा, या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी प्रौढसाक्षरतेचे वर्ग चालविले होते. ते शिक्षकाच्या भूमिकेत वावरत होते. त्यांना ‘सर’ म्हणून सारे निकटवर्तीय संबोधतात. डॉ. विजयकुमार गावित हे एम.बी.बी.एस. आहेत. तशी त्यांची कन्या हीना हीसुद्धा डॉक्टर आहे. २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या हीना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते, तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी हीना मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत होत्या. डॉ. विजयकुमार गावित महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि अशीच एक नैसर्गिक आपत्ती आली असताना डॉ. गावित यांनी मुंबईतील एका इस्पितळाला भेट दिली. मंत्र्यांना काय कळतंय या आविर्भावात त्या इस्पितळातले डॉक्टर वावरत होते. विजयकुमार गावित यांनी थेट स्टेथस्कोप कानाला लावला आणि तेथील रूग्णांना तपासून प्रिस्क्रिप्शन पाहिले. त्यात त्यांना आक्षेपार्ह वाटले आणि त्यांनी त्या इस्पितळातल्या डॉक्टराला फैलावर घेतले. औषधे बदलून दिली.”
“डॉ. रणजित पाटील अमरावती येथील विधान परिषद सदस्य. ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही डॉक्टर असून घराबाहेर पडण्यापूर्वी एक तरी शस्त्रक्रिया पूर्ण करायचीच, हा त्यांचा दंडक/ दिनक्रम. आज त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यशस्वी नगरविकास राज्यमंत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हेही स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेतल्याचा लाभ आपल्या विभागाला मिळवून दिला. या सर्व गोष्टी लक्षात घेता आज महाराष्ट्रात महापूर परिस्थितीमध्ये राज्य सरकारने महापुरानंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुनर्वसनाचे शिवधनुष्य लीलया पेलले असेच म्हणावे लागेल. आपण घेतलेल्या शिक्षणाचा आणि आपल्याला आलेल्या अनुभवांची शिदोरी आपण पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिली, हेच माणुसकीचे कर्तव्य पार पाडल्याचे सार्थक म्हणता येईल. विरोधासाठी विरोध न करता या शिक्षण आणि अनुभवाचा सदुपयोग करून देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे म्हणूनच कौतुक करणे आवश्यक आहे.”
“अशावेळीच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र महत्त्वाचे ठरते. एका बाजूला सर्वांनी खांद्याला खांदा लावून नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची भाषा करतानाच घटिया राजकारण करून आपली पोळी ‘राजकीय तव्यावर’ भाजून घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणाऱ्या महाभागांना ईश्वर सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना आपण करू शकतो. यानिमित्ताने एक बाब प्रकर्षाने समोर आली की भगवान धन्वंतरींच्या बाळांचे दर्शन या महापुराने समाजाला घडविले! ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांची ही उपमा समर्पक आहे.”

