HomeArchiveभावूक दादांचा फटका...

भावूक दादांचा फटका कोणाला?

Details
भावूक दादांचा फटका कोणाला?

    30-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com 
 
 
सरत्या सप्ताहातील शुक्रवारची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात मोठ्या ठळकपणाने करावी लागेल. खरेतर दोन नोंदी असतील त्या. एक असेल सुवर्णाक्षरांनी लिहिलेली. दुसरीसाठी कोणत्या रंगाची शाई वापरावी याविषयी राष्ट्रवादीच्या समर्थक इतिहासकारांमध्येच वादंग आहे! काहींच्या मते दुसरी घटनाही सुवर्णाक्षरांतच लिहावी लागेल. काहींना त्या घटनेचा अन्वयार्थ राष्ट्रवादीसाठी लाल रंगाचा ठरतो आहे तर अन्य काहींच्या मते काळ्याकुट्ट अशा अक्षरातच दुसऱ्या घटनेची नोंद करावी लागेल. पण कोणत्याही पक्षाचे भवितव्य एकाच दिवसात इतके वरखाली होण्याचीही ही पहिलीच वेळ असावी. शेअर बाजाराचा निर्देशांक जितक्या झटपट खालीवर होत नाही त्यापेक्षाही अधिक वेगाने राष्ट्रवादीचा लोकप्रियतेचा व उत्साहाचा चढता आलेख सायंकाळी अचानक खाली कोसळला. शेअरबाजाराचा निर्देशांक कोसळतो तेव्हा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या लाखो कोटींच्या रकमा एका फटक्यात नाहीशा होतात. राष्ट्रवादीच्या बाबतीत असेच काहीसे झाले. आधीच्या दोन दिवसांतील व विशेषतः शुक्रवारच्या सकाळच्या घटनांमुळे दुपारपर्यंत लाखो नवीन मतदारांची मते कदाचित पक्षाच्या झोळीत जमा झाली होती ती सायंकाळी अचानक नाहीशी झाली की काय असे वाटण्याजोगी स्थिती तयार झाली होती. शनिवारच्या घटनांनी यावरही कडी करून टाकली. अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आपण भावनेच्या भरात राजीनामा देऊन टाकला. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल दादांनी दिलगिरीही व्यक्त केली. शिवाय पवारसाहेबांना ईडी प्रकरणात नाहक मनस्ताप झाला हे सांगताना दादा भावूकही झालेले टीव्हीच्या पडद्यावरून साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. आता प्रश्न असा तयार झाला की शुक्रवारच्या घटना खऱ्या मानायच्या की नंतर पश्चात्ताप झाल्यावर पक्षात पुन्हा समाविष्ट होण्याची दादांची शनिवारची कृती खरी मानायची? 
 
 
शरद पवारांची ईडीच्या कार्यलयावरील चाल ही पक्षाला उर्जितावस्था देणारी पहिली घटना होती तर पक्ष कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अजितदादांचा अचानक कोसळलेला राजीनामा ही पक्षाच्या चढत्या उत्साहाच्या फुग्याला टाचणी मारणारी भीषण घटना होती. पहिल्या घटनेमागेही अजितदादांचेच कार्यकर्तृत्त्व होते असेही म्हणता येईल. दादा ज्या बँकेचे संचालक व अध्यक्ष होते त्या राज्य सहकारी बँकेतील कथित अनियमिततेसाठी दादांसह आजी-माजी ७० संचालक व अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. पण त्याची चौकशी ईडीने सुरू करताना त्यात शरद पवारांचेही नाव अचानक गोवले गेले होते. राज्य शिखर बँकेतील अनियमितता व घोटाळ्यांचे प्रकरण किमान २० वर्षांपूर्वींचे आहे. २००१पासून या बँकेने ज्या साखर कारखान्यांना व सूत गिरण्यांना कर्जे दिली व ती कर्जे बुडाली. त्यात अनियमितता, घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत. नाबार्डच्या २०१०मधील लेखा परीक्षण अहवालातील ताशेऱ्यांनंतर या प्रकरणाला धुमारे फुटू लागले.
 
 
राजकीय व समाजिक क्षेत्रात बँकेच्या कारभाराविषयीची कुजबूज आधी सुरूच होती. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व स्वतः शरद पवारांच्या राजकीय वर्चस्वाखाली असणाऱ्या या बँकेची चौकशी सहकार कायद्याखाली केली. त्यातही विविध कार्यकाळातील संचालकांवर ठपका आला. त्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून अण्णा हजारे न्यायालयात गेले. तिथे तीन सुनावण्या झाल्या. गुन्हा नोंद करण्याचे आदेश आले. त्याची कारवाई यंदा सुरू झाली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंद करताच आपोआपच केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाचा अर्थात ईडीचा संदर्भ आपोआपच आला. कारण प्रकरण १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे होते. जेव्हा एखाद्या प्रकरणात ईडीची चौकशी सुरू होते तेव्हा आधी बोलावणे येते. कागदपत्रे तपासली जातात. सात-आठ वा वीस-तीस तासांची चौकशी केली जाते. प्रश्नोत्तराचा मारा होतो व शेवटी संबंधितांना अटक होते.
 
तोच प्रयोग अजितदादांसह बँकेच्या आजी-माजी सत्तर अधिकारी व संचालकांवर होणार यात शंका नाही. पण ईडीच्या रडारवर अचानक शरद पवारांचेही नाव आले व प्रकरण अधिक राजकीय बनले. अधिक गंभीर बनले. शरद पवारांविरोधात यापूर्वी एकच गुन्हा महाराष्ट्रात नोंद झाला होता व तो होता चळवळीतील सहभागाचा. ते १९८०च्या दशकात विरोधी पक्षनेता होते तेव्हा त्यांनी काढलेल्या कापूस दिंडीचे मोर्चासंबंधी ते प्रकरण होते. आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप जरी पवारांवर ५० वर्षांच्या संसदीय कार्यकाळात अनेकदा झाले असले तरी त्यांच्या विरोधात एकही गुन्हा नोंद झालेला नाही वा त्यांना कोणत्याही प्रकरणात कोणा यंत्रणेने कधी चौकशीसाठीही बोलावले नाही. आता थेट ईडीच्या चौकशीची वेळ आली आणि तीही नेमक्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांची वेळ समोर आलेली असताना. यातील राजकीय धोका पवार साहेबांनी लगेचच जाणला.
 
 
सिद्ध काही होणार नाही. ठपका मात्र राजकीय नुकसान करून जाणार हे त्यांनी हेरले. अंगावर आलेल्या ईडीला शिंगावर घेण्याचा त्यांचा निर्णय किती योग्य होता हे गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात जे वादळ उठवण्यात पवारांना यश मिळाले त्यावरूनच दिसून येते. “मी स्वतःहून ईडीच्या कार्यलयात जाणार व त्यांना माझा काही पाहुणचार करायचा असेल तरी तो मी घेणार!” असे उद्गार त्यांचे नाव ईडीने घेतले तेव्हा लगेचच पवार साहेबांनी काढले आणि शुक्रवारी ते ईडीसमोर स्वतःहून जाणार हेही जाहीर केले. या आव्हानाने व त्याचे काय काय राजकीय परिणाम होतील या कल्पनेने सत्ताधारी चांगलेच हादरले. ईडीच्या या कथित गुन्हा नोंदीवरून राष्ट्रवादीचे सारे नेते, कार्यकर्ते पेटून उठले. मुंबईत चला अशी हाकच गावोगावच्या कार्यकर्त्यांना पोहोचली. एक मोठा राजकीय स्टंट साकारू लागला. ईडीच्या निमित्ताने पवारांना फायदेशीर असा एक मोठा इव्हेंट होणार हेही दिसू लागले. कार्यकर्त्यांचे जत्थे मुंबईकडे लोटू लागले. पोलिसांनी जमावबंदीची कलमे मुंबईतील डझनभर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लागू केली. मुंबईच्या सर्व सीमा बंद करून टाकल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, आमदार, खासदारांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच ठाणे, नवी मुंबई, दहिसर सर्वच बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली. गाड्या अडल्या तरी शेकडो कार्यकर्ते लोकलमधून व्हीटी, बेलॉर्ड इस्टेट परिसरात पोहोचले. ईडीचे मुंबई कार्यालय आहे तिथेच मागच्या बाजूच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सध्या आहे. तिथेही हजारो कार्यकर्ते सकाळपासूनच जमा झाले. एकूणच मुंबईत अभूतपूर्व स्थिती तयार झाली. त्याआधी दोन दिवस बारामतीपासून परळीपर्यंत आणि ठाण्यापासून नाशिकपर्यंत अनेक शहरांतून मोर्चांचे पेव फुटले होते. राष्ट्रवादीमध्ये रणराग संचारला होता व ते चित्र सत्ताधारी भाजपाला अस्वस्थ करणारे होते. पवारांवर या प्रकरणात अन्याय होत आहे असे सर्वसामान्य जनतेलाही वाटत होते. कोणताही थेट संबंध बँकेशी नसताना पवारांचे नाव का येते? शिवसेनेनेही पवारांवर अन्याय होत आहे असा सूर लावल्यामुळे तर भाजपाची अधिकच पंचाईत झाली. 
 
 

 
 
पोलिसांनी बरीच धडपड केली. निरोप दिले. संपर्क साधले. शेवटी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे स्वतः साहेबांच्या घरी गेले. ईडीनेही आदल्या दिवशीच स्पष्ट केले होते की, सध्या या गुन्ह्यात शरद पवारांना कोणतेही प्रश्न विचारण्याचे कारण दिसत नाही. त्यांना बोलावलेलेही नाही. त्यामुळे त्यांनी इथे येऊ नये. जरी ते आले तरी त्यांना वरिष्ठ अधिकारी भेटू शकणार नाहीत. पवारांना द्यायचे असल्यास एखादे पत्र खालच्या अधिकाऱ्यांकडे देता येईल, असा मेल शरद पवारांकडे पाठवण्यात आला होता. तसेच मुंबई पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेवर ताण येतो हे साहेबांच्या ध्यानी आणून दिले. या विनंतीला मान देऊन ईडीच्या कार्यलयात जाणे स्थगित करण्याचा निर्णय पवारांनी घेतला व आंदोलनाच्या परजलेल्या तलवारी म्यान करून टाकल्या आणि ते मुंबई सोडून पुण्याकडे रवाना झाले. जणु शरद पवारांची पाठ वळण्याचीच वाट त्यांचे पुतणे पाहत होते. राष्ट्रवादीमधील महाराष्ट्रासंदर्भातील सर्वोच्च नेते, विधिमंडळातील पक्षाचे नेते, अजित पवार यांनी पक्षावर बाँब टाकला.
 
 
पाच वाजण्याच्या सुमारास शरदरावांनी पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला तेव्हा दक्षिण मुंबईच्या विधान भवनात नवे नाटक सुरू झाले. अजित पवारांनी स्वहस्ताक्षरात आमदारकीचा राजीनामा दिला. तो अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी ईमेलवरून पाहिला व स्वीकारल्याचे कळवून टाकले. दोन दिवस आधीच म्हणे बागडेंचे व अजितदादांचे बोलणे झाले होते. दादांनी स्वतःच भावूक पत्रकार परिषदेत सांगितले की, मी तीन दिवसांपूर्वी बागडे साहेबांना फोन केला होता व म्हटले होते की, ‘मला कुणाला तरी तुमच्याकडे घेऊन यायचे आहे, तुम्ही मुंबईत कधी असाल.’ तेव्हाच माझ्या डोक्यात राजीनामा घोळत होता. पण, मी बागडेंना माझ्या स्वतःसाठीच भेटायचे आहे हे काही बोललो नाही. नाहीतर तेव्हाच बातम्या सुरु झाल्या असत्या. हा राजीनामा का झाला, त्याचे काय परिणाम होणार, हा वार नेमका कुणावर आहे, याचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा येणाऱ्या काही दिवसांत होणारच आहे. राजीनामा देऊन अजितदादा निघून गेले ते वीस तासांपर्यंत कुणालाच भेटले नाहीत. त्यांनी मुलगा पार्थला म्हणे सांगितले की, तू राजकारणात येऊ नकोस. इथली पातळी घसरलेली आहे. तू शेती कर, वा उद्योग-व्यवसाय कर. याचा अर्थ ते राजकारण सोडू शकतात. किमान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतून ते स्वतःला बाजूला ठेवू इच्छितात असा अर्थ जर कोणी लावला असेल तर तो अजितदादंनीच चूक ठरवला! शरद पवारांसह कुटुंबातील मंडळींबरोबर सिल्वर ओक बंगल्यावर अजितदादांनी सविस्तर चर्चा केली. नंतर यशवंतराव चव्हाण केंद्रात पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले. पण, तरीही त्यांच्या या कृतीचे दूरगामी परिणाम जाणवणारच आहेत. अजित पवार हे तडकफडक व कडक नसून अत्यंत भावनाशील व्यक्तिमत्व आहे असा एक नवाच पैलू यानिमित्ताने पुढे आला आहे. दुसरे, ते कुणालाच काही न सांगता एखादी महत्त्वाची कृती करत असतील तर त्यांच्यावर काहीही जबाबदारी सोपवताना पक्षालाही भविष्यात विचारच करावा लागणार आहे.
 
 
अजितदादा काका शरद पवारांवर अनेकदा चिडलेले आहेत. काकांना न विचारता त्यांनी याहीआधी अनेकदा मोठे राजकीय निर्णय केले आहेत. मागे एकदा शरद पवारांवरील पुस्तकाचे प्रकाशन दादांनी केले. सुनील तटकरे त्या पुस्तकाचे लेखक होते. दोघे सत्तेत होते. तेव्हा अजितदादांनी जाहीर सांगितले होते की सुनीलजी आता सर्व गोष्टी पक्षातील वरिष्ठांना विचारून करण्याची गरज नाही. आपणही आता वरिष्ठच आहोत. आपण करायचे व नंतर सांगायचे असा या त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. पृथ्वीराज चव्हाणांनी बँक बरखास्त केल्यानंतर काही दिवसांतच पाटबंधारे खात्याची चौकशीदेखील सुरू केली तेव्हा दादांनी असाच तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला होता. तो परत घेण्याचा व पुन्हा मंत्री होण्याचाही निर्णय त्यांनी पवारांचा सल्ला न घेता स्वतःच घेतला व नंतर त्यांना कळवले होते. शरद पवारांनी दादांच्या अचानक कृतीविषयी बोलताना म्हटले होते की, मी दादांना समजावीन. कुटूंबप्रमुख म्हणून व पक्षप्रमुख म्हणूनही सांगेन व ते माझे म्हणणे टाळणार नाहीत याची मला खात्री आहे. पवार कुटुंबामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही पळ काढणारे लोक नाही. एकदा लढाईला उतरलो की जिंकणारच. शुक्रवारी रात्री पवारसाहेबांनी पुण्यात घेतलेली पत्रकार परिषद व शनिवारी त्याला दादांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील पत्रकार परिषदेत दिलेला दुजोरा हाही महाराष्ट्राला बरेच काही शिकवून जाणारा आहे. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. जरी वाद असले तरी पवारसाहेब जो निर्णय देतात तो सारेच मान्य करतात हेही स्पष्ट झाले.
 
 
शरद पवारांनी आणखी असेही सांगितले की, “काकांचे नाव ईडीमध्ये आले. माझ्याशी संबंधित बँकेतील असणाऱ्या नसणाऱ्या घोटाळ्यात काकांची पन्नास वर्षांची संसदीय कारकीर्द मलीन होते म्हणून दादा अस्वस्थ झाले व म्हणून ते राजीनामा देऊन निघून गेले..” दादांनी त्यालाही पूर्ण दुजोरा दिला आणि राजीनाम्याचे कारण तेच असल्याचे स्पष्ट केले हेही बरेच झाले. पण त्याचबरोबर कुटूंबात कलह नसला तरी वाद नक्कीच आहेत हेही सर्वांना जाणवलेच. शरदराव बोलण्याची चलाखी करून पवार कुटंबातील टोकाचे वाद लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजीनामा नाट्याला उदात्त स्तरावर नेण्याचाही हा प्रयत्न दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दादांनी दिलेली अनेक उमेदवारांची नावे सीनिअर पवारांनी नाकारली व म्हणून दादा व्यथित झाले. पार्थची उमेदवारी बारामतीला द्यावी की नाही आणि पार्थ आमदार, खासदार नसेल होत, तर काकांचा दुसरा नातू रोहित पवारांचा प्रवेश भावी नेते म्हणून पक्षात व्हावा की होऊ नये याच वादाची ठिणगी पडलेली असावी. त्याचाच भडका शुक्रवारी सायंकाळी उडाला असावा, असे मानण्यास जागा आहे. अजितदादा स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्धच आहेत. ते निर्णयही पटकन करतात व घेतला निर्णय की मागे हटत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. दादाही जिंकण्यासाठीच लढत आहेत. फक्त या लढाईत पराभव कुणाचा होणार?”

 

 
 
 
अनिकेत जोशी..
“संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com ”
 
 
“सरत्या सप्ताहातील शुक्रवारची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात मोठ्या ठळकपणाने करावी लागेल. खरेतर दोन नोंदी असतील त्या. एक असेल सुवर्णाक्षरांनी लिहिलेली. दुसरीसाठी कोणत्या रंगाची शाई वापरावी याविषयी राष्ट्रवादीच्या समर्थक इतिहासकारांमध्येच वादंग आहे! काहींच्या मते दुसरी घटनाही सुवर्णाक्षरांतच लिहावी लागेल. काहींना त्या घटनेचा अन्वयार्थ राष्ट्रवादीसाठी लाल रंगाचा ठरतो आहे तर अन्य काहींच्या मते काळ्याकुट्ट अशा अक्षरातच दुसऱ्या घटनेची नोंद करावी लागेल. पण कोणत्याही पक्षाचे भवितव्य एकाच दिवसात इतके वरखाली होण्याचीही ही पहिलीच वेळ असावी. शेअर बाजाराचा निर्देशांक जितक्या झटपट खालीवर होत नाही त्यापेक्षाही अधिक वेगाने राष्ट्रवादीचा लोकप्रियतेचा व उत्साहाचा चढता आलेख सायंकाळी अचानक खाली कोसळला. शेअरबाजाराचा निर्देशांक कोसळतो तेव्हा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या लाखो कोटींच्या रकमा एका फटक्यात नाहीशा होतात. राष्ट्रवादीच्या बाबतीत असेच काहीसे झाले. आधीच्या दोन दिवसांतील व विशेषतः शुक्रवारच्या सकाळच्या घटनांमुळे दुपारपर्यंत लाखो नवीन मतदारांची मते कदाचित पक्षाच्या झोळीत जमा झाली होती ती सायंकाळी अचानक नाहीशी झाली की काय असे वाटण्याजोगी स्थिती तयार झाली होती. शनिवारच्या घटनांनी यावरही कडी करून टाकली. अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आपण भावनेच्या भरात राजीनामा देऊन टाकला. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल दादांनी दिलगिरीही व्यक्त केली. शिवाय पवारसाहेबांना ईडी प्रकरणात नाहक मनस्ताप झाला हे सांगताना दादा भावूकही झालेले टीव्हीच्या पडद्यावरून साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. आता प्रश्न असा तयार झाला की शुक्रवारच्या घटना खऱ्या मानायच्या की नंतर पश्चात्ताप झाल्यावर पक्षात पुन्हा समाविष्ट होण्याची दादांची शनिवारची कृती खरी मानायची? ”
 
 
“शरद पवारांची ईडीच्या कार्यलयावरील चाल ही पक्षाला उर्जितावस्था देणारी पहिली घटना होती तर पक्ष कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अजितदादांचा अचानक कोसळलेला राजीनामा ही पक्षाच्या चढत्या उत्साहाच्या फुग्याला टाचणी मारणारी भीषण घटना होती. पहिल्या घटनेमागेही अजितदादांचेच कार्यकर्तृत्त्व होते असेही म्हणता येईल. दादा ज्या बँकेचे संचालक व अध्यक्ष होते त्या राज्य सहकारी बँकेतील कथित अनियमिततेसाठी दादांसह आजी-माजी ७० संचालक व अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. पण त्याची चौकशी ईडीने सुरू करताना त्यात शरद पवारांचेही नाव अचानक गोवले गेले होते. राज्य शिखर बँकेतील अनियमितता व घोटाळ्यांचे प्रकरण किमान २० वर्षांपूर्वींचे आहे. २००१पासून या बँकेने ज्या साखर कारखान्यांना व सूत गिरण्यांना कर्जे दिली व ती कर्जे बुडाली. त्यात अनियमितता, घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत. नाबार्डच्या २०१०मधील लेखा परीक्षण अहवालातील ताशेऱ्यांनंतर या प्रकरणाला धुमारे फुटू लागले.”
 
 
राजकीय व समाजिक क्षेत्रात बँकेच्या कारभाराविषयीची कुजबूज आधी सुरूच होती. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व स्वतः शरद पवारांच्या राजकीय वर्चस्वाखाली असणाऱ्या या बँकेची चौकशी सहकार कायद्याखाली केली. त्यातही विविध कार्यकाळातील संचालकांवर ठपका आला. त्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून अण्णा हजारे न्यायालयात गेले. तिथे तीन सुनावण्या झाल्या. गुन्हा नोंद करण्याचे आदेश आले. त्याची कारवाई यंदा सुरू झाली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंद करताच आपोआपच केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाचा अर्थात ईडीचा संदर्भ आपोआपच आला. कारण प्रकरण १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे होते. जेव्हा एखाद्या प्रकरणात ईडीची चौकशी सुरू होते तेव्हा आधी बोलावणे येते. कागदपत्रे तपासली जातात. सात-आठ वा वीस-तीस तासांची चौकशी केली जाते. प्रश्नोत्तराचा मारा होतो व शेवटी संबंधितांना अटक होते.
 

तोच प्रयोग अजितदादांसह बँकेच्या आजी-माजी सत्तर अधिकारी व संचालकांवर होणार यात शंका नाही. पण ईडीच्या रडारवर अचानक शरद पवारांचेही नाव आले व प्रकरण अधिक राजकीय बनले. अधिक गंभीर बनले. शरद पवारांविरोधात यापूर्वी एकच गुन्हा महाराष्ट्रात नोंद झाला होता व तो होता चळवळीतील सहभागाचा. ते १९८०च्या दशकात विरोधी पक्षनेता होते तेव्हा त्यांनी काढलेल्या कापूस दिंडीचे मोर्चासंबंधी ते प्रकरण होते. आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप जरी पवारांवर ५० वर्षांच्या संसदीय कार्यकाळात अनेकदा झाले असले तरी त्यांच्या विरोधात एकही गुन्हा नोंद झालेला नाही वा त्यांना कोणत्याही प्रकरणात कोणा यंत्रणेने कधी चौकशीसाठीही बोलावले नाही. आता थेट ईडीच्या चौकशीची वेळ आली आणि तीही नेमक्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांची वेळ समोर आलेली असताना. यातील राजकीय धोका पवार साहेबांनी लगेचच जाणला.
 
 
“सिद्ध काही होणार नाही. ठपका मात्र राजकीय नुकसान करून जाणार हे त्यांनी हेरले. अंगावर आलेल्या ईडीला शिंगावर घेण्याचा त्यांचा निर्णय किती योग्य होता हे गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात जे वादळ उठवण्यात पवारांना यश मिळाले त्यावरूनच दिसून येते. “मी स्वतःहून ईडीच्या कार्यलयात जाणार व त्यांना माझा काही पाहुणचार करायचा असेल तरी तो मी घेणार!” असे उद्गार त्यांचे नाव ईडीने घेतले तेव्हा लगेचच पवार साहेबांनी काढले आणि शुक्रवारी ते ईडीसमोर स्वतःहून जाणार हेही जाहीर केले. या आव्हानाने व त्याचे काय काय राजकीय परिणाम होतील या कल्पनेने सत्ताधारी चांगलेच हादरले. ईडीच्या या कथित गुन्हा नोंदीवरून राष्ट्रवादीचे सारे नेते, कार्यकर्ते पेटून उठले. मुंबईत चला अशी हाकच गावोगावच्या कार्यकर्त्यांना पोहोचली. एक मोठा राजकीय स्टंट साकारू लागला. ईडीच्या निमित्ताने पवारांना फायदेशीर असा एक मोठा इव्हेंट होणार हेही दिसू लागले. कार्यकर्त्यांचे जत्थे मुंबईकडे लोटू लागले. पोलिसांनी जमावबंदीची कलमे मुंबईतील डझनभर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लागू केली. मुंबईच्या सर्व सीमा बंद करून टाकल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, आमदार, खासदारांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच ठाणे, नवी मुंबई, दहिसर सर्वच बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली. गाड्या अडल्या तरी शेकडो कार्यकर्ते लोकलमधून व्हीटी, बेलॉर्ड इस्टेट परिसरात पोहोचले. ईडीचे मुंबई कार्यालय आहे तिथेच मागच्या बाजूच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सध्या आहे. तिथेही हजारो कार्यकर्ते सकाळपासूनच जमा झाले. एकूणच मुंबईत अभूतपूर्व स्थिती तयार झाली. त्याआधी दोन दिवस बारामतीपासून परळीपर्यंत आणि ठाण्यापासून नाशिकपर्यंत अनेक शहरांतून मोर्चांचे पेव फुटले होते. राष्ट्रवादीमध्ये रणराग संचारला होता व ते चित्र सत्ताधारी भाजपाला अस्वस्थ करणारे होते. पवारांवर या प्रकरणात अन्याय होत आहे असे सर्वसामान्य जनतेलाही वाटत होते. कोणताही थेट संबंध बँकेशी नसताना पवारांचे नाव का येते? शिवसेनेनेही पवारांवर अन्याय होत आहे असा सूर लावल्यामुळे तर भाजपाची अधिकच पंचाईत झाली. ”
 
 

 
 
“पोलिसांनी बरीच धडपड केली. निरोप दिले. संपर्क साधले. शेवटी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे स्वतः साहेबांच्या घरी गेले. ईडीनेही आदल्या दिवशीच स्पष्ट केले होते की, सध्या या गुन्ह्यात शरद पवारांना कोणतेही प्रश्न विचारण्याचे कारण दिसत नाही. त्यांना बोलावलेलेही नाही. त्यामुळे त्यांनी इथे येऊ नये. जरी ते आले तरी त्यांना वरिष्ठ अधिकारी भेटू शकणार नाहीत. पवारांना द्यायचे असल्यास एखादे पत्र खालच्या अधिकाऱ्यांकडे देता येईल, असा मेल शरद पवारांकडे पाठवण्यात आला होता. तसेच मुंबई पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेवर ताण येतो हे साहेबांच्या ध्यानी आणून दिले. या विनंतीला मान देऊन ईडीच्या कार्यलयात जाणे स्थगित करण्याचा निर्णय पवारांनी घेतला व आंदोलनाच्या परजलेल्या तलवारी म्यान करून टाकल्या आणि ते मुंबई सोडून पुण्याकडे रवाना झाले. जणु शरद पवारांची पाठ वळण्याचीच वाट त्यांचे पुतणे पाहत होते. राष्ट्रवादीमधील महाराष्ट्रासंदर्भातील सर्वोच्च नेते, विधिमंडळातील पक्षाचे नेते, अजित पवार यांनी पक्षावर बाँब टाकला.”
 
 
“पाच वाजण्याच्या सुमारास शरदरावांनी पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला तेव्हा दक्षिण मुंबईच्या विधान भवनात नवे नाटक सुरू झाले. अजित पवारांनी स्वहस्ताक्षरात आमदारकीचा राजीनामा दिला. तो अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी ईमेलवरून पाहिला व स्वीकारल्याचे कळवून टाकले. दोन दिवस आधीच म्हणे बागडेंचे व अजितदादांचे बोलणे झाले होते. दादांनी स्वतःच भावूक पत्रकार परिषदेत सांगितले की, मी तीन दिवसांपूर्वी बागडे साहेबांना फोन केला होता व म्हटले होते की, ‘मला कुणाला तरी तुमच्याकडे घेऊन यायचे आहे, तुम्ही मुंबईत कधी असाल.’ तेव्हाच माझ्या डोक्यात राजीनामा घोळत होता. पण, मी बागडेंना माझ्या स्वतःसाठीच भेटायचे आहे हे काही बोललो नाही. नाहीतर तेव्हाच बातम्या सुरु झाल्या असत्या. हा राजीनामा का झाला, त्याचे काय परिणाम होणार, हा वार नेमका कुणावर आहे, याचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा येणाऱ्या काही दिवसांत होणारच आहे. राजीनामा देऊन अजितदादा निघून गेले ते वीस तासांपर्यंत कुणालाच भेटले नाहीत. त्यांनी मुलगा पार्थला म्हणे सांगितले की, तू राजकारणात येऊ नकोस. इथली पातळी घसरलेली आहे. तू शेती कर, वा उद्योग-व्यवसाय कर. याचा अर्थ ते राजकारण सोडू शकतात. किमान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतून ते स्वतःला बाजूला ठेवू इच्छितात असा अर्थ जर कोणी लावला असेल तर तो अजितदादंनीच चूक ठरवला! शरद पवारांसह कुटुंबातील मंडळींबरोबर सिल्वर ओक बंगल्यावर अजितदादांनी सविस्तर चर्चा केली. नंतर यशवंतराव चव्हाण केंद्रात पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले. पण, तरीही त्यांच्या या कृतीचे दूरगामी परिणाम जाणवणारच आहेत. अजित पवार हे तडकफडक व कडक नसून अत्यंत भावनाशील व्यक्तिमत्व आहे असा एक नवाच पैलू यानिमित्ताने पुढे आला आहे. दुसरे, ते कुणालाच काही न सांगता एखादी महत्त्वाची कृती करत असतील तर त्यांच्यावर काहीही जबाबदारी सोपवताना पक्षालाही भविष्यात विचारच करावा लागणार आहे.”
 
 
“अजितदादा काका शरद पवारांवर अनेकदा चिडलेले आहेत. काकांना न विचारता त्यांनी याहीआधी अनेकदा मोठे राजकीय निर्णय केले आहेत. मागे एकदा शरद पवारांवरील पुस्तकाचे प्रकाशन दादांनी केले. सुनील तटकरे त्या पुस्तकाचे लेखक होते. दोघे सत्तेत होते. तेव्हा अजितदादांनी जाहीर सांगितले होते की सुनीलजी आता सर्व गोष्टी पक्षातील वरिष्ठांना विचारून करण्याची गरज नाही. आपणही आता वरिष्ठच आहोत. आपण करायचे व नंतर सांगायचे असा या त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. पृथ्वीराज चव्हाणांनी बँक बरखास्त केल्यानंतर काही दिवसांतच पाटबंधारे खात्याची चौकशीदेखील सुरू केली तेव्हा दादांनी असाच तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला होता. तो परत घेण्याचा व पुन्हा मंत्री होण्याचाही निर्णय त्यांनी पवारांचा सल्ला न घेता स्वतःच घेतला व नंतर त्यांना कळवले होते. शरद पवारांनी दादांच्या अचानक कृतीविषयी बोलताना म्हटले होते की, मी दादांना समजावीन. कुटूंबप्रमुख म्हणून व पक्षप्रमुख म्हणूनही सांगेन व ते माझे म्हणणे टाळणार नाहीत याची मला खात्री आहे. पवार कुटुंबामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही पळ काढणारे लोक नाही. एकदा लढाईला उतरलो की जिंकणारच. शुक्रवारी रात्री पवारसाहेबांनी पुण्यात घेतलेली पत्रकार परिषद व शनिवारी त्याला दादांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील पत्रकार परिषदेत दिलेला दुजोरा हाही महाराष्ट्राला बरेच काही शिकवून जाणारा आहे. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. जरी वाद असले तरी पवारसाहेब जो निर्णय देतात तो सारेच मान्य करतात हेही स्पष्ट झाले.”
 
 
“शरद पवारांनी आणखी असेही सांगितले की, “काकांचे नाव ईडीमध्ये आले. माझ्याशी संबंधित बँकेतील असणाऱ्या नसणाऱ्या घोटाळ्यात काकांची पन्नास वर्षांची संसदीय कारकीर्द मलीन होते म्हणून दादा अस्वस्थ झाले व म्हणून ते राजीनामा देऊन निघून गेले..” दादांनी त्यालाही पूर्ण दुजोरा दिला आणि राजीनाम्याचे कारण तेच असल्याचे स्पष्ट केले हेही बरेच झाले. पण त्याचबरोबर कुटूंबात कलह नसला तरी वाद नक्कीच आहेत हेही सर्वांना जाणवलेच. शरदराव बोलण्याची चलाखी करून पवार कुटंबातील टोकाचे वाद लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजीनामा नाट्याला उदात्त स्तरावर नेण्याचाही हा प्रयत्न दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दादांनी दिलेली अनेक उमेदवारांची नावे सीनिअर पवारांनी नाकारली व म्हणून दादा व्यथित झाले. पार्थची उमेदवारी बारामतीला द्यावी की नाही आणि पार्थ आमदार, खासदार नसेल होत, तर काकांचा दुसरा नातू रोहित पवारांचा प्रवेश भावी नेते म्हणून पक्षात व्हावा की होऊ नये याच वादाची ठिणगी पडलेली असावी. त्याचाच भडका शुक्रवारी सायंकाळी उडाला असावा, असे मानण्यास जागा आहे. अजितदादा स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्धच आहेत. ते निर्णयही पटकन करतात व घेतला निर्णय की मागे हटत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. दादाही जिंकण्यासाठीच लढत आहेत. फक्त या लढाईत पराभव कुणाचा होणार?”

शरद पवारईडीअजितदादाराज्य शिखर बँकअनियमितता व घोटाळाठाणेनवी मुंबईदहिसरबारामती

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content