HomeArchive`मातोश्री’कडून `राजभवना’ची अवहेलना?

`मातोश्री’कडून `राजभवना’ची अवहेलना?

Details

 
किरण हेगडे
Kiranhegde17@gmail.com
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीला आपल्याऐवजी आपले वर्षानुवर्षांचे स्वीय सहाय्यक तसेच सध्या शिवसेनेत सचिव म्हणून पद भूषविणारे मिलींद नार्वेकर यांना राजभवनावर पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची अवहेलना केल्याचा मुद्दा आता जोर धरत असून याप्रकरणाची गंभीर दखल येत्या काळात घेतली जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
 
“गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची महामारी बोकाळली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत चार वेळा लॉकडाऊन घोषित केला. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन पुकारला गेला असला आणि नागरिकांवर विविध बंधने लादली गेली असली तरी प्रत्यक्षात ते नियम कागदावरच राहिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या नियमांची नागरिकांकडून पायमल्ली केली गेली व केली जात आहे. स्थलांतरीत मजुरांचा मुद्दाही हाताळण्यात सरकारी यंत्रणा अत्यंत अकार्यक्षम ठरली. किंबहुना उपासमारीने कंटाळलेल्या या मजुरांचे जत्थे एकत्रित बाहेर पडताना त्यांना रोखून, सामाजिक अंतर पाळण्यास सांगण्याऐवजी पोलीसच त्यांना पीटाळत असल्याचे काही मजुरांनी सांगितले. परिणामी राज्यात लॉकडाऊन चालू असताना कोरोनाबाधितांची संख्या रोज दोन-दोन हजारांनी वाढतच आहे. सरकारकडून खंबीर पावले उचलली जात नसल्याच्या कारणाने प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी राज्यपालांना साकडे घातले आहे आणि केंद्र सरकारलाही कळवले आहे. याचाच परिणाम केंद्राच्या सूचनेनुसार राज्यपाल वेळोवेळी कोरोनाविरूद्धच्या लढाईच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे तसेच प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावतात. त्यामुळे राज्य सराकरमधले काही पक्षनेते कमालीचे नाराज झाले आहेत. परिणामी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केलेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल राज्यात दुहेरी सत्ताकेंद्र निर्माण करत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content