HomeArchiveमेलबर्नच्या विजयाने आठवणी...

मेलबर्नच्या विजयाने आठवणी दाटल्या!

Details
मेलबर्नच्या विजयाने आठवणी दाटल्या!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 137 धावांनी जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील 150वा विजय ठरला. मेलबर्नवरील या विजयामुळे 1981 सालच्या गोड आठवणी ताज्या झाल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्या सामन्यात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 143 धावांचे आव्हान होते. ग्रेग चॅपल, किंम ह्युजेस यांच्यासारखे तगडे फलंदाज असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ही धावसंख्या काहीच नव्हती. पण खेळपट्टी मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडे पाहून खदखदा हसत होती. चौथ्या डावात ती आपली करामत दाखविणार होती. खेळपट्टीवरची माती गडद होती. खेळपट्टीवर अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. सारांश, खेळपट्टी खेळण्यालायक उरली नव्हती.

ऑस्ट्रेलियन संघाचे पहिले काही फलंदाज पटापट बाद करणे हेच भारताचे प्रथम लक्ष्य होते. जॉन डायसनला वेगवान करसन घावरीने यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून चांगला शुभारंभ केला. त्यानंतर ग्रेग चॅपल मैदानात उतरला. गावसकर घावरीला म्हणाला, ‘कडूभाई, त्याला बाऊंसर टाक.’ ग्रेगने गार्ड घेतला. घावरीने गावसकरच्या सूचनेनुसार जोरदार बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू उसळलाच नाही. तो एका भेगेवर पडला. बाऊंसरची अपेक्षा करणारा चॅपल बॅकफूटवर गेला होता. तथापि, चेंडू खाली राहिला. तो क्षणार्धात चॅपलचा लेगस्टम्प उखडून शांत झाला. अशाप्रकारे चॅपल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर तिसरा हादरा दिलीप दोशीने दिला. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 18 अशी केविलवाणी झाली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दुखापतीमुळे कपिल देव मैदानावर उतरला नव्हता. पाचव्या दिवशी मात्र कपिल ताजातवाना होऊन गोलंदाजीसाठी आला. त्याने अप्रतिम गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. भारताने त्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताचा ऑफस्पिनर शिवलाल यादव दुखापतीमुळे चौथ्या डावात गोलंदाजी टाकू शकला नाही. त्यामुळे भारताला एक गोलंदाज कमी पडला. पण त्याची उणीव दिलीप दोशीने भरून काढली. विशेष म्हणजे दोशीची डावी टाच दुखावलेली होती. तो खेळण्यास फिट नव्हता. पण आपली दुखापत लपवून ठेवत तो जिद्दीने खेळला. भारताचे दोन आधारस्तंभ सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी नेमका आपला फॉर्म गमावला होता. पण, या सामन्यात त्यांना सूर गवसला. विश्वनाथचे पहिल्या डावातील शतक आणि गावसकरच्या दुसर्‍या डावातील महत्त्वपूर्ण 70 धावा भारतासाठी वरदान ठरल्या. दुसर्‍या डावात गावसकर आणि चेतन चौहान या सलामीच्या जोडीनेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजी ठोकून काढली. चौहानने तडाखेबंद 85 धावा करीत ऑस्ट्रोलियन क्षेत्ररक्षकांना चौफेर पळविले. त्या सामन्याचे समालोचन करताना रिची बेनॉर्ड चॅनल 9 वर वारंवार सांगत होता की, ‘दिलीप दोशीने आपल्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली तर भारताचा विजय अशक्य नाही.’ दोशीने बेनॉर्डचा विश्वास खरा करुन दाखविला. बलाढ्य ऑस्ट्रोलियन संघाला भारताने धूळ चारली. कालच्या भारताच्या विजयामुळे या सर्व आठवणी दाटून आल्या. आपल्याही असतील…”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content