HomeArchiveमुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं...

मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

Details
मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईसह राज्यातील लोकांना संरक्षण दलाविषयी माहिती होऊन सैनिकांप्रती जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून मुंबईत शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .येत्या गुरुवारी सायंकाळी वांद्रा कुर्ला संकुल, एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संभाजी पाटील-निलंगेकर, खा. विनय सहस्त्रबुद्धे, ले. जन. एस. के. पराशर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, इंडियन ऑइलचे परिन्दू भगत आदी उपस्थित राहणार आहेत.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन यांनी राज्याच्या गृह मंत्रालयासह हे संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केलं आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी सोबत ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. सुमारे चार एकर परिसरात विविध प्रकारची शस्त्रे नि दारुगोळा पाहण्याचा अनुभव व माहिती घेता येईल. सकाळी दहा ते रात्री आठ, या वेळेत प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते ८ राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित केली आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत ते चालेल. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षितता आणि संरक्षण दल नि केंद्रीय पोलिसांची भूमिका, दुसऱ्या दिवशी २०१४आधीपेक्षा आज आम्ही अधिक सुरक्षित आहोत का? हा विषय आहे. तिसऱ्या दिवशी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं नि धोके, बाह्य धोके यावर चर्चा होईल. लष्करी नि इतर क्षेत्रातील जाणकार मान्यवर यात सहभागी होतील. वीर सेनानीचे कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर, स्वर निनादचे भारत बलवल्ली, ज्ञानेश परांजपे यासह इतर सर्वजण यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने जास्तीतजास्त लोकांनीं याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जातंय.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content