Details
“या, अपघाती मृत्यूंना ‘तूच’ जबाबदार!”
01-Jul-2019
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
चूक हा माणूसच करतो गाढव नाही! पण, हल्ली नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे की काय याचा धागादोरा अनेक अपघातांच्या घटनांत सापडतो. डोक्यावर किंवा पाठीवर ओझं नसलं तरी रस्त्याने गाढव नीट चालेल. पण, वेग आणि मस्तीचा किडा डोक्यात वळवळणारा कार आणि बाईकवाला उंगली करून दुसर्याच्या जीविताशी खेळणारचं, हा अपघाती मृत्यूंचा दरसाल वाढत जाणारा आलेख दर्शवतो आहे. आपल्या महाराष्ट्रात सरत्या वर्षात 2018मध्ये रस्ते अपघातांत सुमारे 13,059 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. उर बडवून नि अभिमानाने सांगायचं तर यातील 80 टक्के अपघात माणसांच्याच चुकांमुळेच घडल्याचे हा अहवाल सांगतो. यावरून पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी असलेला माणूस माणसांच्या जीवावर कसा उठला आहे, याची सप्रमाण आकडेवारी आपल्या डोळ्यांपुढे येते. पण, हातात कारचं स्टेअरिंग किंवा बाईकचं हँडल आल्यावर गड्या, जराबी थांबायचं नाय! वाहतूककोंडीतून मार्ग काढताना शिस्तीला फाटा देत गाडी कुठेही, कशीही घुसवायची. रस्त्याने चालणार्या पादचार्यांना बेफाम वेगाने कार, बाईक धडकावून त्यांना कायमचं पंगू बनवायचं वा त्यांचा जीवही घ्यायचा.
सर्वात हुश्शार म्हणजे आपली वाहतूक पोलीस यंत्रणा. जिथे कायम वाहतूककोंडी होते. जिथे अपघातप्रवण भाग आहे व त्याहीपुढे जिथे शाळकरी मुले दररोज ये-जा करणारा परिसर आहे तेथे हमखास पोलीस उभा करायचा नाही. पूर्व आणि पश्चिम पूर्व द्रूतगती महामार्गावर रात्रीच्या वेळी बेफाम बाईकसवारी करून फुकट जीवाला मुकणारी तरुणांची टोळकीही वाढली आहेत. ही टोळकी त्यांच्यासोबत दुसर्यांच्या जीवावर उठल्याने त्यांना रोखणार कोण? राज्याचे वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांच्या पुढाकाराने राज्यात 30वा वाहतूक सप्ताह साजरा सुरू आहे. हा सप्ताह साजरा करत असताना 2016 मध्ये 12,395, 2017मध्ये 12,511 आणि 2018मध्ये 13,059 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. चन्ने यांच्या म्हणण्यानुसार अपघातात मृत्यूमुखी पडणारे 66 टक्के लोक हे दुचाकीस्वार आणि पादचारी आहेत. त्यांचे वय 25 ते 44 च्या घरात आहे. यातील 80 टक्के अपघात मानवी चुकांमुळेच घडतात, हेही गर्वाने सांगण्यासारखंच नाही का? शहर, गावातील माणूस आज वाहनसंपन्न झाला आहे. शहरांत तर माणसांच्या लोकसंख्येला वाहनांची लोकसंख्या आव्हान ठरू लागली आहे. आपल्या महाराष्ट्रात 3.5 कोटी वाहनांची नोंदणी झाली असून त्यातील 2.8 कोटी दुचाकीच आहेत. मुंबईत तर दुचाकींची संख्या 20 लाखांच्या घरात आहे. हेल्मेट सक्तीला फाटा देणे अन् वाहतुकीची शिस्त कोणत्याही परिस्थितीत न पाळणे हा गुणधर्म बाईकस्वारांच्या सौजन्याने आपण रस्त्यावर उतरल्यावर पाळतोच.
नाशिकजवळ मनमाड-येवला रोडवर एकाच कुटुंबातील सहा जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात पती, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा कारचालक अन्य दोन महिला असं अख्खं कुटुंबच्या कुटुंबाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अशा अपघातांच्या बातम्या आपल्या मनावर काही क्षण आघात करतात. पण, ज्या घराने आपलं माणूस गमावलं तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल, हा विचार किती अस्वस्थ करतो. वाहतुकीची, लेनची शिस्त बाळगून, घाईगडबड न करता आपल्या महाराष्ट्रात शिस्तबद्ध वाहतूक कधीतरी सुरू राहिल्यास अपघातांमुळे होणारे मृत्यूचे तांडव थांबेल का, हा क्षणभर विचार स्टेअरिंगचं चाक आपल्या हाती असताना, डोक्यात वेगाची नशा चढलेल्यांनी केल्यास आपल्या व दुसर्याच्या जीवितावर बेतणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या म्हणण्यानुसार एसटीला ओव्हरटेक करणार्या मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एसटीचे 55 टक्के अपघात होतात. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण घसरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याहून गंभीर बाब मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मांडली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात रात्रीच्या वेळी वाहतूकोंडी नसतेवेळी घडतात. महामार्गावर होणारे हे अपघाती मृत्यूचे तांडव गेल्या काही वर्षांत 25 टक्क्यांवर आणण्यात आम्ही यशस्वी झाल्याचेही ते सांगतात. यावरून वेग आणि मस्तीच्या नशेचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
आपलं मरण आपण स्वत:हून ओढवून घेण्याचे आणि तांत्रिक कारण किंवा अन्य चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण किती आहे, हे लक्षात येतेच. महाराष्ट्रात वाहनांची संख्या वार्याच्या वेगाने वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवणारे पोलीस बळही अपुरे पडत आहे. अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्यांचं जाळं जे पोलिसांच्या रूपात वाहतुकीची शिस्त मोडणार्यांवर वॉच ठेवेल, ते राबवल्यास नक्कीच परिणामकारक ठरेल, असे वाहतूकज्ज्ञ ए. व्ही. शेणॉय यांना वाटते. दारू प्राशन करून गाडी चालवणारे, वेगाने गाडी हाकणारे, फोनवर बोलत गाडी चालवणारे आणि सीटबेल्ट न बांधता प्रवास करणार्या माणसांतील गाढवांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दोन महिन्यांत 13 हजारांहून अधिक जणांचे वाहन परवाने रद्द केले आहेत. मात्र दंड आकारून, कठोर कारवाई करून महाराष्ट्रभरातील अपघाती मृत्यूंचे तांडव थांबवता येईल का? माझ्या व इतरांच्या मृत्यूला मीच कारण..! ही जाणीवजागृती सर्वच वाहनचालकांनी ठेवल्यास निश्चित सकारात्मक परिणाम होतील, इतकचं.”
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान