Homeबॅक पेज5000 शेतकरी उत्पादक...

5000 शेतकरी उत्पादक संस्था डिजिटल पोर्टलवर!

भारतातल्या एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांपैकी (एफपीओज) सुमारे 5,000 संस्थांनी त्यांच्या उत्पादनांची देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी डिजिटल व्यापारविषयक खुल्या नेटवर्कच्या (ओएनडीसी) पोर्टलवर नोंदणी केली आहे. देशाच्या कोणत्याही भागातील ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या हेतूने एफपीओजचा ओएनडीसी मंचावरील प्रवेश हा देशातील उत्पादकांना अधिक उत्तम बाजारपेठ प्रवेश उपलब्ध करून देण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून आहे. 

एफपीओजना डिजिटल विपणनाची थेट उपलब्धता, ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा, दोन व्यापारांदरम्यान तसेच व्यापार आणि ग्राहक यांच्या दरम्यान देवाणघेवाण इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. सुमारे 6,865 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह 2020मध्ये सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या “10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची (एफपीओज) स्थापना आणि प्रोत्साहन” नामक केंद्रीय क्षेत्रातील नव्या योजनेंतर्गत 10,000 एफपीओजच्या स्थापनेचे लक्ष्य सरकारने

शेतकरी

निश्चित केले होते. त्यापैकी 8,000 एफपीओजच्या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अल्पभूधारक, दुर्लक्षित तसेच भूमीहीन शेतकऱ्यांचे एफपीओजच्या छत्राखाली एकत्र येण्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक क्षमता तसेच बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी मदत मिळत आहे. अधिक दर्जेदार शेतमालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने सदस्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एफपीओज त्यांना सुधारित तंत्रज्ञान, कर्ज सुविधा, चांगले साहित्य आणि जास्त बाजारपेठा सुलभतेने उपलब्ध करून देतात.

प्रत्येक एफपीओला तीन वर्षांच्या कालावधीसाठी 18 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्याखेरीज, एफपीओजच्या प्रत्येक शेतकरी सदस्यामागे 2,000 रुपयांची इक्विटी मदत देण्यासाठी तरतूद करण्यात आली असून प्रत्येक एफपीओला जास्तीतजास्त 15 लाख रुपयांची इक्विटी मदत मिळू शकते. तसेच एफपीओजना संस्थात्मक कर्ज सुविधा मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी पात्र वित्तपुरवठा संस्थेकडून प्रत्येक एफपीओला 2 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्प कर्जाला पतहमी सुविधा देण्यात येते. आतापर्यंत 1,101 एफपीओजना 246.0 कोटी रुपयांची पत हमी मंजूर करण्यात आली असून त्याचा लाभ 10.2 लाख शेतकऱ्यांना झाला आहे. पात्र 3,187 एफपीओजच्या बँक खात्यामध्ये 145.1 कोटी रुपयांची इक्विटी मदत थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content