Homeमुंबई स्पेशलसांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला अडथळा...

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला अडथळा ठरणारी ५ बांधकामे पाडली

मुंबईतल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पअंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावर एका मार्गिकेचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. या जोडरस्त्याच्या कामात एल विभागाच्या हद्दीतील पाच बांधकामे अडथळा ठरत होती. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलीस यांनी एकत्रित कार्यवाही करून या पाच बांधकामांचे नुकतेच निष्कासन करण्यात आले. त्यामुळे या जोडरस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागअंतर्गत लाल बहादूर शास्त्री मार्गावर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याची एक मार्गिका घाटकोपरच्या दिशेने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मार्गिका उपलब्ध करून दिल्याने सांताक्रूझच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना घाटकोपरला जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत अडथळा ठरणाऱ्या पाच बांधकामाच्या निष्कासनाची कारवाई करण्यासाठीचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेचे अभियंते, १५ कामगार, दोन जेसीबी आणि पोलीस दलाच्या मदतीने ही निष्कासन कारवाई करण्यात आली. आज (दिनांक १९ डिसेंबर २०२३) पार पडली. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content