Homeटॉप स्टोरीराज्यातील २२ हजार...

राज्यातील २२ हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेमुदत संपाचा आजचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर संप १००% यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी केला आहे.

राज्यातील जवळपास २२००० वर्ग ३ व वर्ग ४चे कर्मचारी संप करत असून त्यामुळे महसूल कार्यालयातील सेवा ठप्प झाल्या आहेत. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने या संपास पाठिंबा दिला आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून महसूल संघटनेस तातडीने चर्चेसाठी बोलवावे असे आवाहन बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर भोजन अवकाशात निदर्शने, एक दिवसाचे कामबंद आंदोलन, असे सर्व मार्ग निरूपयोगी ठरल्यानंतर आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारल्याचेही साळवी यांनी सांगितले.

महसूल सहायकांची रिक्तपदे तातडीने भरणे, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने तसेच इतर १४ प्रमुख मागण्याकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content