Homeपब्लिक फिगरनिर्भया निधीतली 17...

निर्भया निधीतली 17 वाहने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात!

केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून महिलांसाठी वापरात यावयाचा गाड्यांपैकी 17 गाड्या तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आल्याचा गोप्यस्फोट भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्या खासदार सुप्रिया सुळे तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निर्भया निधीतील गाड्यांचा शिंदे-फडणवीस सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपाचे खंडन करताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या सरकारकडूनच महिलांसाठी देण्यात आलेल्या गाड्यांचा गैरवापर केला गेल्याचे सांगितले. याच निधीतील एक गाडी तर दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षाताफ्यातच होती असे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या गाड्या वापरताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र तत्काळ थांबवण्यास सांगितले.

निर्भया निधीतून 4 फेब्रुवारी 2022 रोजी 220 गाड्या खरेदी करण्यात आल्या. यातील 121 वाहने मुंबईतल्या 94 पोलीसठाण्याला देण्यात आली. उरलेल्या 99 गाड्या फक्त महिलांविषयक कामाशी संबंध नसलेल्या पोलीस खात्याच्या इतर विभागांना देण्यात आल्या.  यात जलदगती कृती दल, संरक्षण विभाग, सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हेविषयक विभाग, श्वान पथक, लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय, मोटर परिवहन अशा विविध विभागांचा यात समावेश आहे. या सर्व विभागांमध्ये तसेच इतरत्र वापरण्यात येत असलेली वाहने पुन्हा एकत्र आणून ती महिलांसाठीच वापरण्याचे काम आमचे सरकार करेल. साधारण आठवड्याभरात ही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली.

निर्भया निधीतून निर्भया पथकांसाठी वापरात यावयाच्या इतर विभागांना देण्यात आलेल्या 99 वाहनांपैकी 12 वाहने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि अदिती तटकरे या मंत्र्यांच्या सुरक्षाताफ्यात होत्या. एक वाहन खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षाताफ्यात होते. तब्बल 17 वाहने तेव्हाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात वापरात होत्या, असेही त्यांनी सांगितले. निर्लज्जपणे निर्भया वाहनांचा गैरवापर करायचा आणि शिंदे-फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, असे कृत्य आम्हाला सुप्रियाताईंकडूनतरी अपेक्षित नाही, असेही त्या म्हणाल्या.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content