HomeArchiveस्वातंत्र्यवीर दौड 2019...

स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे आयोजन

Details
स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार कृतीशील कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला सैन्यदलातील शूरवीरांना अभिवादन करणारी स्वातंत्र्यवीर दौड 2019 26 मे 2019 यादिवशी सकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 28 मे या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी गेली अनेक वर्षे सैन्यदलातील शूरवीरांना शौर्य पुरस्कार दिला जातो. स्वातंत्र्यवीर दौड मधून होणाऱ्या निधी संकलातून सैन्यदलातील शूरवीरांच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यात येईल. ही दौड 16 ते 80 या वयोगटातील सर्वांसाठी असून त्याची नावनोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख विज्ञानेश मासावकर यांनी दिली आहे.

स्पर्धेत 2.5 लाख रूपये किंमतीची वेगवेगळ्या गटात एकूण 64 पारितोषिके दिली जातील. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील दिले जाईल. नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9220070386, 022-4459197 तसेच संकेतस्थळ www.savarkarsmarak.com वर संपर्क साधावा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क येथेही स्पर्धेची नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाईनद्वारेही नोंदणी करता येणार असून त्याच्या लिंक अशा.
https://events.indiarunning.com/Event/Details/SwatantryaveerRun2019/2799, Townscript – https://www.townscript.com/e/swatantryaveer-run-2019-302433, Bazabuzz – https://bazabuzz.com/events/2/m.swatantryaveer-run-2019.html

स्पर्धेचे स्वरूप असे– 5 किमी धाव – वयोगट 16 ते 25 वर्षे, 26 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 55 वर्षे, 56 वर्षांवरील व्यक्ती. 10 किमी धावः वयोगट 18 ते 27वर्षे, 28 ते 37 वर्षे, 38 ते 47 वर्षे, 48 ते 57 वर्षे, 58 वर्षांवरील व्यक्ती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला अभिवादन करणारी ही दौड असून त्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जवानांचे शौर्य तसेच कामगिरीदेखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेला समाज तसेच राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे, असेही मासावकर यांनी म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content