HomeArchiveसरकारने शेतकऱ्यांना दिले...

सरकारने शेतकऱ्यांना दिले दिवसाकाठी फक्त १६ रूपये ६६ पैसे!

Details
सरकारने शेतकऱ्यांना दिले दिवसाकाठी फक्त १६ रूपये ६६ पैसे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]

सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये, म्हणजेच महिन्याला पाचशे तर दिवसाला 16 रूपये 66 पैसे देण्याची घोषणा केली खरी. पण राज्यातल्या अनेक शहरांत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम, दोन हजार रूपये आली आणि लगेचच परत गेली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गरिब शेतकऱ्याची वेशभूषा करत विधानभवनात प्रवेश केला आणि सर्वांसाठीच ते आकर्षण ठरले.

त्यानंतर विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले,
लाभले आम्हांस भाग्य, मुख्यमंत्री मराठी
विष घ्यावे लागते, कर्जमाफीसाठी
मंत्रालय झाले स्थळ, धर्माच्या आत्महत्त्येसाठी
जाहलो खरेच धन्य, आमचे भाग्य
रूपये 16 मिळणार, एक दिवसाकाठी
भाजप-सेना, तुम्ही खाता, तूप-लोणी
आम्हाला हवी चाराछावणी, नको लावणी
कर्जमाफी, कर्जमाफी द्या हो, मला
देवा देवेंद्रा, देवा उद्धवा, नका मारू मला..

या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये देण्यात आले. मात्र ही रक्कम लगेचच त्यांच्या खात्यातून परत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे पुन्हा एकदा झाले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. मात्र राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देऊन निव्वळ चेष्टाच केली असल्याचा आरोपही गजभिये यांनी यावेळी केला.

सन 2015 व 16 च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र नंतर जनगणनेत ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद झाली त्यांना वंचित राहवे लागणार आहे. राज्यात साधी पाण्याची बाटली 20 रूपयांना मिळते. चहासुद्धा 20 रूपयांना मिळतो. वडापावसुद्धा 15 रूपयाला मिळतो तर शेतकरी १६ रूपये ६६ पैश्यात काय घेणार? एका कुटूंबात जर पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला साडेतीन रूपये मिळतील. त्यात त्याने काय करावे, असा सवालही त्यांनी केला.”
 
“शेतकऱ्याच्या वेषभूषेत विधानभवनात अवतरले आमदार प्रकाश गजभिये

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content