HomeArchiveवक्त्यांचा महाराष्ट्र!

वक्त्यांचा महाराष्ट्र!

Details
वक्त्यांचा महाराष्ट्र!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
परवाचे राज ठाकरे यांचे भाषण तडाखेबंद होते. लोकसभेची एकही जागा मनसे लढवित नाही. तरीही मोदीमुक्त भारत करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे आपले चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राजकारणी नाहीत. ते कलाकार आहेत. त्यामुळे राजकारण्यांच्या ठायी असलेले छक्केपंजे राज यांच्याकडे नाहीत. मनात एक आणि ओठात एक असे त्यांचे नसते. जे काही बोलायचे ते राज स्पष्टपणे बोलतात. राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हेदेखील असेच आक्रमक आणि जहाल वक्ते होते. ते राजकारणी नव्हते तर समाजसुधारक होते. एकदा बाळासाहेब आमच्याशी बोलताना म्हणाले होते की ‘‘दादांच्या समाजसुधारकाच्या भूमिकेमुळे आम्हाला खूप भोगावे लागले आहे. दादा जिवंत असताना आमच्या घरावरून त्यांची अंत्ययात्रा जाताना आम्ही पाहिली आहे.’’ सारांश, निर्भिडपणे बोलणे ही ठाकरे घराण्याची तीन पिढ्यांची परंपरा आहे.

तो ऐतिहासिक वारसा राज ठाकरे आज पुढे चालवत आहेत. जनसमुहाला आपल्या वक्तृत्त्वाने मोहिनी घालणे ही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी उपजत नेतृत्त्व आणि वक्तृत्त्वगुण असावे लागतात. महाराष्ट्र त्यादृष्टीने भाग्यवान आहे. किंबहुना, महाराष्ट्र म्हणजे उत्तमोत्तम वक्त्यांची खाण आहे. या भूमीने अनेक चांगले वक्ते दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे काही फ़र्डे वक्ते नव्हते. पण ते विद्वान होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यामुळे ते बोलत तेव्हा सभेला मंत्रमुग्ध करत. संथपणे वाहणार्या. कृष्णा नदीच्या पात्रासारखे त्यांचे भाषण असे. साठ आणि सत्तरच्या दशकात यशवंतरावजी महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते होते.

आपल्या वाणीने आणि लेखणीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणार्यास आचार्य अत्रेंना कोण बरे विसरेल? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रेंच्या विराट सभा होत. आपल्या धारदार वक्तृत्त्वाने ते मैदान जिंकत. आचार्य अत्रे भाषणासाठी उभे राहिले तरी लोकांमध्ये हंशा पिकत असे. अत्रेसाहेब हजरजबाबी आणि विनोदी होते. त्यासंदर्भातील एक किस्सा नमूद करण्यासारखा आहे. गिरगावच्या गायवाडीत अत्रेंची सभा होती. अत्रेंना यायला उशीर झाला. अत्रे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा एक वात्रट श्रोता ओरडला, ‘‘अत्रे उशीर झाला.’’ त्यावर अत्रे पटकन म्हणाले, ‘‘मग गायवाडीत लवकर यायला मी काय बैल आहे?’’ (प्रचंड हंशा).
आचार्य अत्रेंनंतर महाराष्ट्राने पाहिलेले दुसरे प्रचंड लोकप्रिय वक्ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेबांची वाणी म्हणजे मुलुखमैदानी तोफ होती. निवडणुकीचे पारडे फिरविण्याची ताकद बाळासाहेबांच्या वक्तृत्त्वात होती. 1995 साली विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेने बाळा नांदगावकर हा नवखा उमेदवार उभा केला होता. तो पडणार असे चित्र दिसत होते. पण प्रचाराचा कालावधी संपण्यापूर्वी बाळासाहेबांची प्रचंड मोठी सभा काळाचौकी, अभ्युदयनगर येथे झाली. या एका सभेने भुजबळ यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. नांदगावकर विजयी झाले.

काँग्रेसचे विलासराव देशमुख हेदेखील फर्डे वक्ते होते. मिश्किलपणे विरोधकांना चिमटे काढीत त्यांची टोपी उडविण्यात ते वाकबगार होते. किंबहुना, विलासराव म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्रातील हुकमी एक्का होता. दुर्दैवाने ते लवकर गेले. ऐंशीच्या दशकात प्रमोद महाजन यांचे भाषण आम्ही प्रथम ऐकले. शिवतीर्थावरील त्या विराट सभेत त्यांनी हंशा आणि टाळ्या उकळताना आम्ही पाहिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेले महाजन यांचे ते प्रभावी भाषण आजही आमच्या नजरेसमोर जसेच्या तसे दिसत आहे. भाजपमध्ये आजही अनेक चांगले वक्ते आहेत. पण महाजन ते महाजन होते. भाजपाचे प्रवक्ते मधु चव्हाण हेदेखील उत्तम वक्ते आहेत. त्यांचा व्यसंग दांडगा आहे. म्हणूनच त्यांची भाषणे रंगतात. लोकांना ती आवडतात. सारांश, महाराष्ट्र ही वक्त्यांची खाण आहे. त्या खाणीतील एक चमकणारा हिरा म्हणजे राज ठाकरे होय. गुढी पाडव्याच्या त्या सभेत राज हे आक्रमक योध्द्याप्रमाणे मोदी-शाहंच्या विरोधात उभे ठाकले. त्यांचे आम्हाला कौतुक वाटते.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content