HomeArchiveलाभले आम्हास भाग्य.....

लाभले आम्हास भाग्य.. बोलतो हिंदी!

Details
लाभले आम्हास भाग्य.. बोलतो हिंदी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुंबईत मराठी टक्का घसरला आणि हिंदी भाषिकांची संख्या वाढली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, उत्तरेकडून येणाऱ्या रेल्वे नेहमी भरून येतात आणि त्याच गाड्या रिकाम्या उत्तरेकडे जातात, अशी जोरदार टीका केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून ‘राष्ट्रद्रोही’ असल्यासारखी टीका होऊ लागली. महाराष्ट्रात रेल्वे भरती आणि त्यासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी युपी, बिहारचे तरुण मुंबईत आले होते. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारपीट करून हाकलून दिले होते. मात्र त्यानंतर, तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या राज्यात रेल्वेत भरती करायची असेल तेते त्याच राज्यातील वृत्तपत्रांत जाहिराती देऊन स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आदेश काढले. याचा अर्थ असा की युपी व बिहारी आधिकाऱ्यांची एक स्ट्राँग लॉबी होती आणि त्या लॉबीला राजकीय वरदहस्त होता, असे बोलण्याचे धाडस त्यावेळी मनसेने केले होते.

शिवसेना स्थापन होण्यापूर्वी दाक्षिणात्य तरुण उमेदवार बँक, खाजगी कंपन्यात मोठ्या हुद्यावर तर मराठी माणूस शिपाई म्हणून काम करत होता. मराठी माणसावर पर्यायाने मुंबईवर दाक्षिणात्यांचे छुपे आक्रमण होतेय हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मार्मिक साप्ताहिकात बँक व खाजगी कंपन्यात दाक्षिणात्य उमेदवारांची नावेच छापली आणि सुस्तावलेल्या, झोपलेल्या मराठी माणसाला जागे केले.

आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. मोठमोठे टॉवर्स, मॉल्स, गोंधळलेली वाहतूक, चेहरा हरवलेली माणसं, दिवसरात्र देहावर आणि मनावर जखमा घेत, पावलोपावली अपराजित असणारी मराठी माणसं ‘ऐश्वर्य’ भोगत असल्यासारखी जगत आहेत. या ऐश्वर्यात रमलेला मराठी माणूस स्वकेंद्रित झाला. त्याला ना स्वतःची, ना मुंबईची चिंता, मग अस्मितेचा प्रश्न येतोच कुठे? अस्मिता चेतवण्याचे महान कार्य एका पत्रकाराने, एका व्यंगचित्रकाराने बाळासाहेब ठाकरे यांनीच केले. बाकीच्यांनी त्यांच्या जीवावर इमले बांधले, मोठ्या व्यवसायात गुंतून राहिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी अस्मिता विषय पायाखाली तुडवला गेला. भाजी विकणारे छगन भुजबळ, इन्कम टॅक्स कार्यालयात फाईली उचलणारे नारायण राणे लंडनपर्यंत पोहोचले, वार लावून दिवस काढणारे मनोहर जोशी बिल्डिंग आणि हॉटेल्स व्यवसायात रमलेत. काही शाळा, महाविद्यालय काढून शिक्षण सम्राट झालेत. त्यांनी स्वतःच्या व्यवसायात समृद्धी आणली त्याबद्दल त्यांना दोष द्यायचा नाही. त्यांनी केले ते योग्यच केले. शिवसेनेचा मराठी अस्मितेचा प्रश्न बाजूला पडला हे सेनेच्या लक्षातच आले नाही.

झोपडपट्टीत राहणाऱ्यांना मोफत घरे देण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आणि हिंदी भाषिक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल, रायगड याठिकाणी हातपाय पसरू लागले. सरकारी, पालिका, म्हाडा, रेल्वेच्या रिकाम्या जागांवर झोपडया बांधल्या. प्रथम युपी, बिहारी हिंदी भाषिकांनी मुंबईत झोपडया बांधून कोट्यवधी रुपये कमावले. मिळालेल्या रकमेत त्यांनी ठाणे, कल्याण, पनवेल, रायगड जिल्ह्यातील रिकाम्या जागेवर झोपडया बांधून व्यवसाय सुरू केले. स्वतःच्या गावी बंगले बांधले. त्याच गावातील त्यांच्या श्रीमंतीचे इंगित कळल्यानंतर तेही मुंबईकडे धावू लागले. एकाची श्रीमंती पाहून इतरही महाराष्ट्रात हातपाय पसरू लागलेत आणि मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली.

महाराष्ट्राच्या अन्य भागातून होणाऱ्या स्थलांतरांचे प्रमाण ४१.६ टक्के होते. तेच प्रमाण २००१ साली ३७.४ टक्के झाले. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतरांचे प्रमाण वाढले. १९६१ मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईत १० टक्के लोक येत होते आता त्यांची संख्या ४० टक्के झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांची तयारी सुरू असताना हिंदी भाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली. म्हणजे २००१ मध्ये सुमारे २६ लाख संख्या होती, तीच दहा वर्षांत ३६ लाख झाली. याचा अर्थ दहा वर्षांत तब्बल १० लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली असे दिसत असले तरी २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत ५० टक्क्यांहून अधिक संख्या वाढली असेल अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्राच्या छाताडावर येऊन धडकणार आहे.

झोपडपट्टीधारकाना मोफत घरे हा सरकारी कार्यक्रम मराठी माणसाला उद्ध्वस्त करीत आहे. हिंदी भाषिक प्रसंगी स्वतःची नावे बदलून झोपडया उभारत आहेत. वांद्रे येथील झोपड्यांना दरवर्षी आगी लावल्या जात आहेत. अशावेळी राज्य सरकारची माणुसकी उफाळून येते. आगी लागलेल्या झोपडया नव्या रुपात उभ्या राहतात. आगीत खाक झालेल्या झोपडीधारकांना नव्याने रेशनकार्ड, आधार कार्ड घरपोच दिले जाते. त्याच झोपडया विकून ‘नीचे दुकान, उपर मकान’ करत काहीही काम न करता या झोपडीधारकांना घरबसल्या पैसा मिळत असतो.

हे का घडते? फक्त राजकीय पक्षांची ‘वोटबँक’. काँग्रेसचे दिवंगत खासदार व अभिनेते सुनील दत्त व नर्गिस दत्त यांनी वांद्रे येथील झोपडया वाढविल्या आणि या वासाहतीला नर्गिस दत्त नगर असे नावही देण्यात आले. अशी माणसं असल्यावर काँग्रेसचे नेतेही माजले. त्यांनी वांद्रेनंतर धारावी, कुर्ला अशा अनेक ठिकाणी झोपडयांच्या माध्यमातून पैसा कमावला आणि वोटबँक तयार केली. झोपडीचा हा महाभयंकर कॅन्सर महाराष्ट्रात पसरत आहे. कोणाला त्याचे सोयरसूतक नाही. मराठी माणसाच्या ओठावर महाराष्ट्र धर्म वाढवावा हे शब्द होते. आता ‘हिंदी धर्म वाढवावा’ याकडे तो वळला आहे.

सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांना मराठीचा अभिमान म्हणून त्यांनी..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सुरेश भटांनी केलेले मराठीचे कौतुक, आता सरणावर आहे. काही वर्षांत षंढ मराठी माणूस असंही बोलेल..
“लाभले आम्हास भाग्य बोलतो हिंदी
जाहलो खरेच धन्य ऐकतो हिंदी””
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content