HomeArchiveयति की हिम...

यति की हिम मानव, खरंच आहे का अस्तित्त्वात?

Details
“यति की हिम मानव, खरंच आहे का अस्तित्त्वात?”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
हिमालयात हिम मानवाच्या पावलाचे ठसे पाहिल्याच्या भारतीय लष्कराच्या दाव्याने देशभरात नाही तर विश्वात चर्चेला सुरूवात झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार नेपाळात या मानवाला पाहिल्याचा दावा करणारे असले तरी ठोस पुरावा कोणी देऊ शकलेला नाही. इतकेच नव्हे तर वैज्ञानिक आधारही मिळत नाहीये. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे तर जाणकारांचा एक गट ‘कुछ तो है’ म्हणतोय. सुमारे पावणे दोनशे वर्षांपासून याविषयी चर्चा सुरू झाली की असा कोणी तरी आहे. यति किंवा हिम मानव याच्या पाहण्याचे, आवाज ऐकण्याचे किस्से हिमालय रांगेतील भूतानपर्यंत ऐकायला मिळतात. खासकरून, नेपाळी,शेर्पा यांच्यातील काही वृद्ध यति अस्तित्त्वाचे दाखले देत यात नवीन काहीच नाही म्हणतात.

यति विषयावर बरीच कथानके, चित्रपट, पुस्तकं, कार्टून जगभरात आहेत. याला साधारणतः खलनायक किंवा नकारत्मक शक्ती म्हणूनच पहिले गेले. नेपाळ, तिबेट, भूतान परिसरात हिम मानवाला सांस्कृतिक प्रतिक मानले जात असले तरी कोडं सुटलेलं नाही. नेपाळात यतीला राक्षसही म्हणतात. तर काही ग्रंथ नि नेपाळी – हिमालय खोऱ्यात राम-सितेसंदर्भातील प्रचलित लोक कविता-गीतांमध्ये काही ठिकाणी यतीचा उल्लेख सापडतो. विदेशात अनेक चित्रपट आदी, डॉक्टर हु, द्याट्स शो घोस्ट, द एबोमीनेबल शोमेन, द मायटी बुश, अशा दूरचित्र कार्यक्रमात यति शैतानी ताकद म्हणून दिसतो. तर देशी अजुबा कुदरत का चित्रपटात यतीवर प्रेम करणाऱ्या मुलीची कहाणी सांगितली आहे.
यतीला बघितल्याचे शेकड्याच्या घरात दावे असले तरी नेमके पुरावे समोर नाही येत आणि विज्ञान त्याशिवाय यतीच्या असण्यावर मोहोर उमटवत नाही. काहींच्या मते इतके भक्कम पुरावे नाहीत की यतीच्या अस्तित्त्वाची घोषणा करावी. मात्र, मागे काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पोकटलोतील इदहो विश्व विद्यालयातील प्रा. जेफ मेल्डरम यांच्यानुसार सर्व पुराव्यांचा अभ्यास करता हा निष्कर्ष निश्चित काढू शकतो की निसर्गात कोणी प्राणी जरूर आहे, ज्याची अद्याप ओळख पटवायची, पटायची आहे.

हिमालयात गिर्यारोहण करणाऱ्या १९६० मधील एव्हरेस्ट विजेता एडमंड हिलरी यांनी यतीची खोपडी मिळाल्याचा दावा केला. त्याची खातरजमा करण्यास ती युरोपीय देशात पाठवली गेली. मात्र, बर्फाच्छादित प्रदेशात असलेल्या बकरीसारख्या प्राण्याची ती असल्याचं सांगितलं गेलं. तथापि, त्यावर फार कोणाचा विश्वास बसला नाही. १९७० च्या दरम्यान ब्रिटीश गिर्यारोहक डॉन विलान्सनुसार त्यांनी कोणी ओरडत असल्याचा आवाज ऐकला. त्याबाबत विचारता त्यांच्या शेर्पा मार्गदर्शकाने सांगितले की यतीच्या ओरडण्याचा आवाज आहे.

या यतीला निरनिराळ्या देशात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. भारतात हिम मानव, नेपाळात यती, ऑस्ट्रेलियात योवेई, इंडोनेशियात साजरांग गिगी, अमेरिकेत बिगफूट, ब्राझीलमध्ये मॅपिंगुरे नावाने बोललं जातं. तथापि, दुसरीकडे त्याच्या असण्याविषयीच शंका उपस्थित केली जाते. हा विशालकाय वानरासारखा दिसतो नि बर्फाळ प्रदेशात दिसतो. साधारणतः १८७२ च्या सुमारास याचा पहिला उल्लेख गिर्यारोहक बी. एच. होजसन यांनी केला. आपल्या हिमालयीन मोहिमेबाबत लिहिताना, उत्तर नेपाळ भागात पर्वतीय प्रदेशात त्यांच्या गाईडने लांब केसाच्या विशालकाय प्राण्यास बघितल्याचे सांगितलं. मात्र, मी काही बघितलं नसल्याचं ते सांगतात. पण, या घटनेचा उल्लेख करीत त्या प्राण्याला त्यांनी यती नाव दिलं. यानंतर यतीला पाहिल्याचे नि पाऊलखुणा दिसल्याचे अनेकदा सांगितलं गेलं. केवळ हिमालय क्षेत्रचं नव्हे तर विश्वाच्या अनेक भागातून तशा बातम्या येत राहिल्या. बऱ्याच पर्वत चढाईखोरांनी आपल्या पुस्तकातून याचा उल्लेख केला. पण, पुरावे कोणी देऊ शकलं नाही.

अगदी अलीकडे २००७ च्या काळात अमेरिकन व्हिडिओ निर्माता जोशुआ गेट्स नि त्याच्या गटाने यतीची पदचिन्ह बघितल्याचा दावा करीत ती ३३ सेंमी लांब असल्याचं स्पष्ट केलं. इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलनुसार १९ मार्च १९५४ ला प्रकाशित बातमीत याविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्यात आला. इंग्लंडच्या प्रा. फ्रेडरिक वूड जोन्स यांनी उपलब्ध केसांचा ‘मायक्रो फोटोग्राफीक’ अभ्यास केला. त्याची तुलना अस्वल नि इतर पर्वतीय प्राण्यांशी करून पाहिली. पण, हे केस नेमके कोणाचे याचा निष्कर्ष निघाला नाही. पुढे १९५७ साली एका मळाच्या चाचणीतही तपासणी करून नेमका कोणत्या प्राण्याचा तो आहे, हे कळू शकलं नाही. डीएनए विश्लेषण अहवाल प्रतीक्षेत असल्याचं त्यावेळी सांगितलं गेलं. पुढे काय ते कळू शकलं नाही.

रॉयल जियोग्राफीकल सोसायटीचे सदस्य, व्यावसयिक प्रकाशचित्रकार एम. ए. टॉमबाजी यांनी कंचनगंगा पर्वत रांगेत १५ हजार फूट उंचीवर पूर्णतः केसाळ असा प्राणी पाहिला. तो त्यांनी जेमतेम दोनशे मीटर जवळून बघितल्याचे नमूद केलंय. त्याची शारीरिक बनावट माणसासारखी होती. पण, मोठया प्रमाणात अंगावर केस होते. एक दोन मिनिटं त्याला न्याहाळून निरखून बघितलं. त्याच्या अंगावर कपड्यासारखं काहीही नव्हतं. भारतीय लष्कराच्या दाव्यानुसार त्यांच्या गिर्यारोहक चमूने मकालू बेसजवळ रहस्यमय यतीच्या पाऊल खुणा पाहिल्या. ३२×१५ इंचाच्या या खुणा ९ एप्रिल२०१९ रोजी दिसल्याचे ट्विट करीत म्हंटलं आहे. त्यापुष्टयर्थ त्याचे काही प्रकाशचित्रंही दिली आहेत. यापूर्वी हिम मानवाचे अस्तित्त्व केवळ मकालू बरून अभयारण्यात दिसल्याचे सांगितलं जातं. याआधी काही वर्षांपूर्वी लद्दाखच्या परिसरात हिम मानव पाहिल्याचा बौद्ध बिक्खुनी केला होता. पर्वतीय क्षेत्रात आढळणाऱ्या अस्वलांची ही विशेष प्रजाती आहे, असं वैज्ञानिक म्हणतात. हा उंच धिप्पाड जीव असून माकडसारखं तोंड आहे नि दोन पायांवर चालतो असंही बोललं जातं. पुढील काळात यावर अधिक भाष्य कोण करतंय नि काही नवे दावे समोर येतात का याकडे अभ्यासकाचे लक्ष लागलं आहे. पाहू ही रहस्यमय कथा की अस्तित्त्वाची लढाई, काय समोर येतं ते!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content