HomeArchiveमोदीस्थान!

मोदीस्थान!

Details
मोदीस्थान!

    14-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com 
 
 
पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावाने देशभरात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. राजीव गांधींचेही नाव अनेक ठिकाणांना मिळाले आहे. संजय गांधींच्या नावाने केंद्र सरकारच्या मदत योजना सुरू असतात तर मग मोदींचे नाव कोणत्याच योजनेला, प्रकल्पाला संस्थेला का नको, असा प्रश्न काहींच्या मनात उभा राहिला आणि त्यातील एका उत्साही वीराने प्रस्ताव पुढे ठेवला की, नेहरू विद्यापीठाचे नाव बदला आणि मोदी विद्यापीठ ठेवा. जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ही केंद्र सरकार चालवत असणारी एक प्रख्यात शैक्षणिक संस्था. मात्र अशैक्षणिक गोष्टींसाठीच ती अधिक चर्चेत येते. तिथे कन्हैय्या कुमार शिकत होता. गेली आठ-दहा वर्षे तो तिथे विद्यार्थी नेता म्हणून वावरत होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कार्यक्रमात जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. म्हणून त्याच्यासह काही मूळ काश्मिरी तरूणांवर देशद्रोहाचे खटले भरले गेले. त्यावरून डाव्या विचारवंतांनी मोठे वादळ देशभरात निर्माण केले. सेडीशन अर्थात देशद्रोहाचा कायदाच कसा चुकीचा आहे, असेही रान उठवले गेले. तो खटला बारगळला तरी कन्हैय्या कुमार देशभरातील विद्रोही तरूणांचा हिरो बनला.
 
विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारच्या विरोधात एक हत्यार म्हणून कन्हैयाचा उपयोग होऊ शकेल का याची चाचपणी विरोधकांनी केली. त्याच्या सभा देशभर केल्या गेल्या. तो मुळातच डाव्या विचारसरणीचा पाईक होताच. कम्युनिस्ट पक्षाने त्याला बिहारमधून लोकसभेसाठी उभे केले. देशभरातून अनेक डाव्या व पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते त्याच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले होते. ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड हेही तिकडे जाऊन कन्हैय्याचा प्रचार करून आले. पण साऱ्या कथित डाव्या व पुरोगामींच्या प्रेमाचा व सदिच्छेचा काहीच उपयोग त्याला झाला नाही. तो तिथे पडलाच. जसे देशात अनेक बुजूर्ग व दिग्गज मोदींच्या दुसऱ्या झंझावातापुढे उडून गेले तसाच तोही गेला. या कन्हैय्याच्या उद्योगांमुळे अधिक प्रकाशझोतात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव नरेंद्र मोदी विद्यापीठ असे का बदलू नये, असा एक सवाल घेऊन भाजपाचे दिल्लीचे एक खासदार हंसराज हंस उभे राहिले आहेत.
 
 
 
हंसराज हंस हे एक लोकप्रिय पंजाबी गायक आहेत. पॉप संगीत हा त्यांचा प्रांत. पंजाबी व सुफी संगिताचे कार्यक्रम ते करतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जेएनयूमध्ये हुतात्म्यांना वंदन असा एक कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्ताने घेतला होता. खरे तर अभाविपला जेएनयूच्या विद्यापीठ स्तरावरच्या निवडणुकांमध्ये सपशेल अपयश आले आहे. देशभरात भाजपाचा झेंडा जोरात फडकत आहे, पण ऐन दिल्ली शहरातील या डाव्यांच्या गडामध्ये त्यांना शिरकाव करता येत नाही, अशी स्थिती आहे. कन्हैय्यानंतर तिथे पुन्हा कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थी नेत्यांनाच विद्यापीठस्तरीय परिषदेत स्थान मिळाले आहे. पण तरीही अभाविपला मानणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही काही कमी नाही. कन्हैय्याच्या विरोधात पहिली तक्रार करणारे अभाविपचेच सदस्य होते.
 
 
या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात दुसरे एक दिल्ली भाजपाचे नेते व खासदार मनोज तिवारी हेही सहभागी झाले होते. हे दोघेही तुफान लोकप्रिय कलावंत आहेत. जेएनयूमध्ये एक शाम शहिदोंके नाम हा कार्यक्रम सादर करताना हंस यांनी नेहरू गांधी घराण्यावर टीका केली. नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीरचे वाटोळे झाले आहे असे सांगून ते म्हणाले की, “मोदींनी देशात अनेक चांगले बदल घडवले. तसेच बदल ते या विद्यापीठातही घडवत आहेत. खरेतर मोदींच्या नावाने एखादी संस्था असायला काय हरकत आहे? देशासाठी इतके चांगले काम ते करत आहेत तर त्यांचेच नाव या विद्यापीठाला द्या. जेएनयूऐवजी एनएमयू म्हणा!” मुळात हे केंद्रीय विद्यापीठ केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याच्या अंतर्गत काम करते. पण विद्यापीठाचा कायदा संसदेने संमत केलेला आहे. नाव बदलण्याचा निर्णय संसदेच्या अखत्यारीत येईल, विभागाच्या नाही.
 
 

 
  
 
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावाचा आग्रह अजिबातच धरलेला नाही. त्यांनी ज्या काही योजना सुरू केल्या त्या सर्वांना पंतप्रधान असे पदाचे नाव दिले आहे. व्यक्तीगत नाव नाही. त्यामुळे उद्या पुन्हा मनमोहन सिंग पंतप्रधान जरी झाले तरी रस्तेबांधणी, गरिबांची घरे आदी विविध पीएम नावाने सुरू होणाऱ्या योजना तशाच सुरू राहतील. मोदींची वाढती लोकप्रियता अनेक स्तरावर जाणवतेच, पण विख्यात इंग्रजी नियकालिक इंडिया टुडेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या नियकालिकाने तर हंसराज हंस यांच्यापुढे झेप घेतली आहे. हंस यांनी केवळ एका विद्यापीठाला मोदींचे नाव द्या असे म्हटले. पण या लोकप्रिय नियतकालिकाने आपल्या अंकाच्या मुखपृष्ठावर, “मोदीस्थान!” असा शब्दप्रयोग करून मोदी विरोधकांना जबर धक्का दिला आहे. मोदींचे समर्थक अर्थातच खूष झालेच असतील. हंसराज हंस तर म्हणतील की, बघा मी फक्त एका विद्यापीठाचे नाव बदलायला सांगतो आहे. इथे तर लोक देशाचेच नाव हिंदुस्थानऐवजी मोदीस्थान म्हणू लागले आहेत.. मोदिस्थान या विशेषणाचा हा जो प्रयोग या नियतकालिकाने केला आहे त्यामागचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मूड ऑफ दी नेशन या नावाने एक सर्वेक्षण केले. असे सर्वोक्षण फक्त निवडणुकांच्याच काळात जनमताची चाचणी घेणाऱ्या विविध संस्था करतात. पण इंडिया टुडेचे वैशिष्ट्य असे की, ते अशा पाहणीसाठी निवडणुकीची वाट पाहत नाहीत. तर दर सहा महिन्यांनी ते जनमताचा कौल घेतात. त्यामधून देशाच्या नागरिकांसाठी कोणते विषय महत्त्वाचे आहेत, याचा एक अंदाज राज्यकर्त्यांना व विरोधकांनाही येऊ शकतो.
 
 
लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळात, जुलैमध्ये ही पाहणी करण्यात आली आहे. काश्मीरचा विशेष दर्जा उडवून लावण्याच्या आधीही मोदींची लोकप्रियता तुफानी होतीच, ती आता आणखीनच वाढलेली असेल असेही मत सर्वेक्षणात नोंदण्यात आले आहे. ७१ टक्के लोकांना असे वाटते की, मोदी हेच देशाचे प्रश्न सोडवू शकतात. पं. नेहरू व इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून जितकी लोकप्रियता होती त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकप्रियता आज मोदींकडे आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१९ मध्ये अशाच प्रकारच्या जनमत चाचणीमध्ये मोदींची पंतप्रधान म्हणून असणारी पसंती अन्य विरोधी नेत्यांपेक्षा अधिक असली तरी इंदिरा गांधींना पंतप्रधान म्हणून अधिक लोकांनी पसंती दिलेली होती. आजच्या पाहणीत इंदिरा गांधींपेक्षा १७ टक्के अधिक लोकप्रियता मोदींची आहे. मोदींना ३९ टक्के तर इंदिरा गांधींना १९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पं. नेहरू व वाजपेयी हेही मोदींच्या लोकप्रियतेच्या मानाने थोडे उणावले आहेत. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा की, आज पुन्हा जर मतदान घेतले तर भाजपाच्या स्वतःच्या जागा ३०९ होतील आणि भाजपाप्रणित रालोआची खासदार संख्या होईल ३५७. शरद पवार व ममतांपासून ते केजरीवाल व राहुल गांधीपर्यंत सर्वांनी अशा निरिक्षणांपासून योग्य तो धडा घ्यायला हवा.”

 
 
 
अनिकेत जोशी..
“संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com 

 
 
“पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावाने देशभरात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. राजीव गांधींचेही नाव अनेक ठिकाणांना मिळाले आहे. संजय गांधींच्या नावाने केंद्र सरकारच्या मदत योजना सुरू असतात तर मग मोदींचे नाव कोणत्याच योजनेला, प्रकल्पाला संस्थेला का नको, असा प्रश्न काहींच्या मनात उभा राहिला आणि त्यातील एका उत्साही वीराने प्रस्ताव पुढे ठेवला की, नेहरू विद्यापीठाचे नाव बदला आणि मोदी विद्यापीठ ठेवा. जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ही केंद्र सरकार चालवत असणारी एक प्रख्यात शैक्षणिक संस्था. मात्र अशैक्षणिक गोष्टींसाठीच ती अधिक चर्चेत येते. तिथे कन्हैय्या कुमार शिकत होता. गेली आठ-दहा वर्षे तो तिथे विद्यार्थी नेता म्हणून वावरत होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कार्यक्रमात जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. म्हणून त्याच्यासह काही मूळ काश्मिरी तरूणांवर देशद्रोहाचे खटले भरले गेले. त्यावरून डाव्या विचारवंतांनी मोठे वादळ देशभरात निर्माण केले. सेडीशन अर्थात देशद्रोहाचा कायदाच कसा चुकीचा आहे, असेही रान उठवले गेले. तो खटला बारगळला तरी कन्हैय्या कुमार देशभरातील विद्रोही तरूणांचा हिरो बनला.”

 
“विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारच्या विरोधात एक हत्यार म्हणून कन्हैयाचा उपयोग होऊ शकेल का याची चाचपणी विरोधकांनी केली. त्याच्या सभा देशभर केल्या गेल्या. तो मुळातच डाव्या विचारसरणीचा पाईक होताच. कम्युनिस्ट पक्षाने त्याला बिहारमधून लोकसभेसाठी उभे केले. देशभरातून अनेक डाव्या व पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते त्याच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले होते. ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड हेही तिकडे जाऊन कन्हैय्याचा प्रचार करून आले. पण साऱ्या कथित डाव्या व पुरोगामींच्या प्रेमाचा व सदिच्छेचा काहीच उपयोग त्याला झाला नाही. तो तिथे पडलाच. जसे देशात अनेक बुजूर्ग व दिग्गज मोदींच्या दुसऱ्या झंझावातापुढे उडून गेले तसाच तोही गेला. या कन्हैय्याच्या उद्योगांमुळे अधिक प्रकाशझोतात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव नरेंद्र मोदी विद्यापीठ असे का बदलू नये, असा एक सवाल घेऊन भाजपाचे दिल्लीचे एक खासदार हंसराज हंस उभे राहिले आहेत.”
 
 
 
“हंसराज हंस हे एक लोकप्रिय पंजाबी गायक आहेत. पॉप संगीत हा त्यांचा प्रांत. पंजाबी व सुफी संगिताचे कार्यक्रम ते करतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जेएनयूमध्ये हुतात्म्यांना वंदन असा एक कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्ताने घेतला होता. खरे तर अभाविपला जेएनयूच्या विद्यापीठ स्तरावरच्या निवडणुकांमध्ये सपशेल अपयश आले आहे. देशभरात भाजपाचा झेंडा जोरात फडकत आहे, पण ऐन दिल्ली शहरातील या डाव्यांच्या गडामध्ये त्यांना शिरकाव करता येत नाही, अशी स्थिती आहे. कन्हैय्यानंतर तिथे पुन्हा कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थी नेत्यांनाच विद्यापीठस्तरीय परिषदेत स्थान मिळाले आहे. पण तरीही अभाविपला मानणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही काही कमी नाही. कन्हैय्याच्या विरोधात पहिली तक्रार करणारे अभाविपचेच सदस्य होते.”
 
 
“या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात दुसरे एक दिल्ली भाजपाचे नेते व खासदार मनोज तिवारी हेही सहभागी झाले होते. हे दोघेही तुफान लोकप्रिय कलावंत आहेत. जेएनयूमध्ये एक शाम शहिदोंके नाम हा कार्यक्रम सादर करताना हंस यांनी नेहरू गांधी घराण्यावर टीका केली. नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीरचे वाटोळे झाले आहे असे सांगून ते म्हणाले की, “मोदींनी देशात अनेक चांगले बदल घडवले. तसेच बदल ते या विद्यापीठातही घडवत आहेत. खरेतर मोदींच्या नावाने एखादी संस्था असायला काय हरकत आहे? देशासाठी इतके चांगले काम ते करत आहेत तर त्यांचेच नाव या विद्यापीठाला द्या. जेएनयूऐवजी एनएमयू म्हणा!” मुळात हे केंद्रीय विद्यापीठ केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याच्या अंतर्गत काम करते. पण विद्यापीठाचा कायदा संसदेने संमत केलेला आहे. नाव बदलण्याचा निर्णय संसदेच्या अखत्यारीत येईल, विभागाच्या नाही.”
 
 

 
  
 
“स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावाचा आग्रह अजिबातच धरलेला नाही. त्यांनी ज्या काही योजना सुरू केल्या त्या सर्वांना पंतप्रधान असे पदाचे नाव दिले आहे. व्यक्तीगत नाव नाही. त्यामुळे उद्या पुन्हा मनमोहन सिंग पंतप्रधान जरी झाले तरी रस्तेबांधणी, गरिबांची घरे आदी विविध पीएम नावाने सुरू होणाऱ्या योजना तशाच सुरू राहतील. मोदींची वाढती लोकप्रियता अनेक स्तरावर जाणवतेच, पण विख्यात इंग्रजी नियकालिक इंडिया टुडेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या नियकालिकाने तर हंसराज हंस यांच्यापुढे झेप घेतली आहे. हंस यांनी केवळ एका विद्यापीठाला मोदींचे नाव द्या असे म्हटले. पण या लोकप्रिय नियतकालिकाने आपल्या अंकाच्या मुखपृष्ठावर, “मोदीस्थान!” असा शब्दप्रयोग करून मोदी विरोधकांना जबर धक्का दिला आहे. मोदींचे समर्थक अर्थातच खूष झालेच असतील. हंसराज हंस तर म्हणतील की, बघा मी फक्त एका विद्यापीठाचे नाव बदलायला सांगतो आहे. इथे तर लोक देशाचेच नाव हिंदुस्थानऐवजी मोदीस्थान म्हणू लागले आहेत.. मोदिस्थान या विशेषणाचा हा जो प्रयोग या नियतकालिकाने केला आहे त्यामागचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मूड ऑफ दी नेशन या नावाने एक सर्वेक्षण केले. असे सर्वोक्षण फक्त निवडणुकांच्याच काळात जनमताची चाचणी घेणाऱ्या विविध संस्था करतात. पण इंडिया टुडेचे वैशिष्ट्य असे की, ते अशा पाहणीसाठी निवडणुकीची वाट पाहत नाहीत. तर दर सहा महिन्यांनी ते जनमताचा कौल घेतात. त्यामधून देशाच्या नागरिकांसाठी कोणते विषय महत्त्वाचे आहेत, याचा एक अंदाज राज्यकर्त्यांना व विरोधकांनाही येऊ शकतो.”
 
 
“लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळात, जुलैमध्ये ही पाहणी करण्यात आली आहे. काश्मीरचा विशेष दर्जा उडवून लावण्याच्या आधीही मोदींची लोकप्रियता तुफानी होतीच, ती आता आणखीनच वाढलेली असेल असेही मत सर्वेक्षणात नोंदण्यात आले आहे. ७१ टक्के लोकांना असे वाटते की, मोदी हेच देशाचे प्रश्न सोडवू शकतात. पं. नेहरू व इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून जितकी लोकप्रियता होती त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकप्रियता आज मोदींकडे आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१९ मध्ये अशाच प्रकारच्या जनमत चाचणीमध्ये मोदींची पंतप्रधान म्हणून असणारी पसंती अन्य विरोधी नेत्यांपेक्षा अधिक असली तरी इंदिरा गांधींना पंतप्रधान म्हणून अधिक लोकांनी पसंती दिलेली होती. आजच्या पाहणीत इंदिरा गांधींपेक्षा १७ टक्के अधिक लोकप्रियता मोदींची आहे. मोदींना ३९ टक्के तर इंदिरा गांधींना १९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पं. नेहरू व वाजपेयी हेही मोदींच्या लोकप्रियतेच्या मानाने थोडे उणावले आहेत. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा की, आज पुन्हा जर मतदान घेतले तर भाजपाच्या स्वतःच्या जागा ३०९ होतील आणि भाजपाप्रणित रालोआची खासदार संख्या होईल ३५७. शरद पवार व ममतांपासून ते केजरीवाल व राहुल गांधीपर्यंत सर्वांनी अशा निरिक्षणांपासून योग्य तो धडा घ्यायला हवा.”

Continue reading

येत्या १७ एप्रिलपासून बोरिवलीत रंगणार ‘अजिंक्यतारा’ मल्लखांब स्पर्धा

मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर (एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे मल्लखांबातील अनभिषिक्त...

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...
Skip to content