HomeArchiveमहाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी...

महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

Details
महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो असा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय वने व पर्यावरण खात्याकडून संबंधित प्रकल्पांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य नमूद करताना कीर्तिकर यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर निधी व अडचणी नमूद केल्या. त्यामध्ये २०१५ ते २०१७ मध्ये राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांसाठी रू. ६,४९६ कोटी मंजूर झाले. परंतु वने व पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना उपरोक्त प्रकल्प मार्गी लागण्यास अडथळा येत असल्याचे संगितले. राज्यशासनाने ६ विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रू. १३३२ कोटींचा निधीदेखील पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना वापरात आणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकल्पांना केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश पाणीप्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...
Skip to content