HomeArchiveबायको सोडून जाईल!

बायको सोडून जाईल!

Details
बायको सोडून जाईल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राजकारणात येण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्ष आग्रह करीत आहेत. त्यांना अर्थमंत्रीपद देण्याची ऑफर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात त्यांना मोदी सरकारची काही धोरणे विशेषतः नोटाबंदीच्या निर्णयावर त्यांचे मतभेद होते. राजन सध्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या बूथ स्कुल ऑफ बिझनेसमध्ये शिकवत असून आपण जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असे ते वारंवार सांगत आहेत. राजकारणात प्रवेश करायचं नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आपल्या ‘द थर्ड पिलर’ पुस्तकात मांडली आहे. पण राजकारणी वस्ताद, स्वतःच्या स्वार्थापोटी कोणालाही बकरा करतील हे काय राजन यांना माहीत नाही का? ते शिकागोला असूनही त्यांना वारंवार विचारणा केली जात आहे. सरतेशेवटी त्यांनी ‘आपण राजकारणात आलो तर बायको सोडून जाईल’! असे कारण देऊन राजकरणापासून दूर राहण्याचा इरादा पक्का केला आहे हे निश्चित झाले आहे.

रघुराम राजन हे श्रीराम प्रभुचे निस्सीम भक्त असावेत. सीतामाईवर रामाचे जे प्रेम होते त्याची आठवण यावेळी राजन यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. आयोध्येतील राम मंदिराबाबत वचन देऊनही भाजपा सरकारने राम भक्तांची निराशा केली. त्याचा राग राजन महाशयांना आलाही असेल किंवा एवढ्या मोठ्या पदावर माजी गव्हर्नर सी. डी. देशमुख यांचा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अपमान करून कशी वाट लावली, तो अनुभव लक्षात घेऊन राजन यांच्या विद्यमान पत्नीने विरोधही केला असेल. पती वनवासात गेले तर पत्नी म्हणून २४ तास सोबत राहू शकते. पण राजकारणात ते बिझी राहिल्यास ‘ना घरका, ना घाटका’ अशी अवस्था होऊन घरापासून ताटातूट होईल, असा त्या माऊलीने विचार केला असेल. राजकारणात राजनसाहेब कार्यरत राहिल्यास सोनिया गांधी, बहेन मायावती, ममता बॅनर्जी या तीन देविंया त्यांचे काय हाल करतील हे सांगता येत नाही. हाही विचार करून त्यांनी कदाचित राजन यांना निर्वाणीचा इशारा दिला असेल. ‘राजकारण करायचं असेल तर मी घर सोडून जाते.

बिचारे विद्याविभूषित राजन यांनी आपली पत्नी सीतासमान असल्याने तिला दुखवायचे नाही हा कायमचा पण करून ‘द थर्ड पिलर’मधून भूमिका मांडून फोर्थ पिलरला (चौथा स्थंभ) सडेतोड सांगून टाकले. रघुराम राजन यांनी माजी गव्हर्नर व पंतप्रधान मनमोहन सिंह यांचाही सल्ला घेतला असेल. दहा वर्षे पंतप्रधानपदी राहून मौनव्रत का धारण करावे लागले? टू-जी, फोर-जी, कोळसाखाण लिलाव घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा, बोफोर्स यासाठी काय काय सहन करावे लागले? या जटील समस्यांची सखोल माहिती राजन यांनी घेतली असेल. अमेरिकेत असताना पप्पूने विधेयकाची चिरफाड करून जागतिक स्तरावर कसा अपमान केला याचं ‘रामायण’ मौनात गेलेल्या मनमोहन सिंह यांनी मोठ्या सुरात रामन यांना सांगितले असेल. आज ‘गीत रामायण’चे जन्मदाते ग. दि. माडगूळकर असते तर त्यांनी अगतिक होऊन हिंदू समर्थक भाजपाला साष्टांग नमस्कार करून सांगितले असते की, मी स्वर्गात सुखी आहे, मला पुन्हा वनवासात जायाचे नाही.. संगीतकार सुधीर फडके यांनी तर वाटल्यास शाहिस्तेखानासारखी माझी हाताची बोटे उडवा म्हणजे तुमच्या राजकीय रामायणास मला बोटेच काय, हातही लावता येणार नाही, असे सांगितले असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता बॅनर्जी अगदी न विसरता बहीण या नात्याने वर्षाला दोन कुर्ते व बंगाली मिठाई पाठवतात. पण नरेंद्र मोदी याचं राजकीय भांडवल करतात हे लक्षात आल्यावर ममताबाईंची तळपायाची आग मस्तकात गेली. बाईचं केव्हा डोकं सटकेल, हे सांगता येत नाही. मग काय? बाईंनी महिषासुराच्या सुरात गर्जना केली, ‘मी नरेंद्र मोदींना मातीचे लाडू पाठविणार’ हा त्यांचा निर्धार रामन यांच्या लक्षात आला असेल, पण दैनिकात आलेल्या बातमीतून त्यांच्या एकनिष्ठ पत्नीला ही वर्तणूक सहन होईल का? नवऱ्याच्या तोंडात ही बया माती घालू शकते, असा विचार त्यांनी केला असेल. जनता पक्षाच्या राजवटीतील राजनारायण यांचे डमी लालूप्रसाद यादव तुरूंगातून बिहारला विशेष दर्जा देण्याचा आग्रह करून दहा हजार कोटी मागून घेईल, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांचाही तोच आग्रह राहील. बहेन मायावती स्वतःचे व हत्तीचे पुतळे उभारण्यासाठी राजन यांच्याकडे जंगजंग पछाडतील. राजन यांच्यासमोर पोरगेला पप्पू राहुल खुर्चीत न बसता राजन यांच्या टेबलावर बसून रिझर्व्ह बँकेची लूटमार करेल. शरद पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गोंडस मागणी करून साखर कारखानदार व सहकारी बँकांना ताकद देतील.. असे अनेक तर्कवितर्क राजन यांच्या मनात आले असतील. आपण, आपली एकनिष्ठ पत्नी आणि शिकागो हे आपले विश्व आहे, बाकी सबकुछ “आभास”.. भासमान आहे ती एकनिष्ठ पत्नीच.”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content