Details
पोकळ शपथनामा!
09-Oct-2019
”
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
शब्द बापुडे पोकळ वारा.. अशा प्रकारची पुस्तिका प्रकाशित करून सेना-भाजपाला आव्हान देणाऱ्या काँग्रेसप्रणित आघाडीने निवडणूक प्रचाराची सुरूवात तर केली आहे. कोणत्याही निवडणुकीच्या आधी राजकीय पक्ष आम्ही सत्तेवर आल्यानंतर जनतेसाठी काय करणार हे सांगण्याचा प्रयत्न करतात. करावयाच्या कामांची, नव्या योजनांची जंत्री प्रसिद्ध केली जाते. त्याला जाहीरनामा अशी सुटसुटीत संज्ञा आहे. पण शिवसेना-भारतीय जनता पक्षांनी जाहीरनामा शब्द नाकारला आणि वचननामा म्हणायला सुरूवात केली. तो शब्द सर्वमान्य झाला. ९०च्या दशकापासून देशात आघाड्यांचेच राजकारण सुरू आहे. दोन सलग निवडणुकांमध्ये अभूतपूर्व असे संपूर्ण बहुमत मिळवूनही भाजपानेही सरकार स्थापन करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सत्तेसोबत ठेवणे श्रेयस्कर मानले.
महाराष्ट्रातही १९९०च्या विधानसभा निवडणुकीत वा नंतर कधीही कोणत्याच पक्षाला एकट्याला सत्ता लाभलेली नाही. युतीचे सरकार पराभूत झाल्यानंतर काँग्रेस व त्यांच्यामधूनच फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पंधरा वर्षे राज्य केले. कधी निवडणुकीनंतरची आघाडी तर कधी निवडणूकपूर्व आघाडी करून ते सत्ता घेत राहिले. विविध पक्षांच्या काँग्रेसप्रणित पुरोगामी लोकशाही आघाडी हे प्रचलित नाव असले तरी २००४मध्ये केंद्रात सत्ता घेताना काँग्रेसने संयुक्त पुरगामी आघाडी यूपीए स्थापन केली. आता महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभा निवडणुका लढतानाही आघाडीच्या नावातील लोकशाही शब्द वगळून संपुआच्या धर्तीवर पुरोगामी महाआघाडी घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी लढत आहेत.
मागील म्हणजे २०१४ची विधानसभेची निवडणूक आणि २०१९ची विधानसभा निवडणूक यात एक महत्त्वाचा फरक हा आहे की यंदा सारेच पक्ष आघाडी वा युती करून लढत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा विरूद्ध शिवसेना विरूद्ध काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी अशी सर्वांनीच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्याही वेळी लहान पक्षांनी या चार मोठ्या पक्षांसोबत राहून थोड्याफार जागा लढवल्या होत्या. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आघाडी मजबूत केली आहे, तर थोडी बाजूला गेलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजपानेही महायुती साकारली आहे. या दोन्ही आघाड्या, युत्या यावेळी अधिक एकसंघपणे एकमेकांच्या समोर ठाकल्या आहेत. सेना-भाजपाच्या वचननाम्याच्या धर्तीवर जाहीरनाम्यासाठी काँग्रेस आघाडीने यावेळी शपथनामा असा नवा शब्द पुढे केला आहे.
रोहिडेश्वराची शपथ थेऊन शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या लढाईची सुरूवात केली ती वयाच्या चौदाव्या वर्षी, असा ऐतिहासिक संदर्भ सुरूवातीलाच देत या पुस्तिकेत अनेक नव्या योजना मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिवछत्रपतींचा आशिर्वाद आपल्याच मागे आहेत असे सांगणाऱ्या भाजपाला आव्हान देताना या निवडणुकीत राष्ट्रवादीने थेट शिवरायांनाच सोबत घेण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर शिवाजी व संभाजी म्हणून गाजणारे अभिनेते कोल्हे सध्या राष्ट्रवादीचे खासदार बनले आहेत. त्यांच्यासोबत स्वतः शरद पवारांनी शिवस्वराज्य यात्रा म्हणून अनेक जिल्हयात प्रचाराची पहिली फेरी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच आटोपून घेतली होती. आता रोहिडेश्वराची साद घालत ते शपथनामा घेऊन आले आहेत. राष्ट्रवादीनेच कितीतरी आधी हा जाहीरनामा तयार केला होता. पुस्तिका लिहिणाऱ्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासह जयंत पाटील अजितदादा पवार हे त्याचे प्रकाशन आठ-दहा दिवसांपूर्वीच करणार होते. पण ऐनवेळी एकत्र जाहीरनामा काढण्याची टूम काँग्रेसने पुढे रेटली. म्हणून राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा थांबवला. म्हणूनच या प्रकाशनात फोटो जरी सर्वपक्षीय नेत्यांचे चमकले असले तरी मजकुरावर छाप आहे ती राष्ट्रवादीचीच.
काँग्रेसकडे तशीही राज्यस्तरीय नेतृवाची वानवाच आहे. त्यामुळे ते पवारांच्या लोकप्रियतेवरच अवलंबून आहेत हेही यातून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून हा शपथनामा नामक जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रमही राष्ट्रवादीच्याच यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे अविनाश पांडे, सचिन सावंत हे हजर होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना आव्हान देणारे महाआघाडीतील घटक, रिपब्लिकन समाजवादी पक्षाचे सुरेश माने हे व्यासपीठावर होतेच. पवारकन्या सुप्रिया सुळे या पहिल्या रांगेत बसल्या होत्या. मात्र शपथनामा प्रकाशनावेळी त्या व्यासपीठावर गेल्या व फोटोत चमकल्या.
आणखी दोन माध्यमांचे कुतूहल विषय असणारे नेते यावेळी हजर राहतील असे पाहिले गेले. धुळ्याचे भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि नागपूरमधून मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारे दुसरे भाजपा बंडखोर आशिष देशमुख. या दोघांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम रंगतदार बनला होता. यातील गोटेंचे खरेतर शरद पवार आणि त्यातही छगन भुजबळ यांच्याशी कडवे भांडण आहे. वैरही म्हणता येईल असे त्यांचे संबंध आहेत. विधानसभेत त्यांनी तेलगीच्या कथित टेपवरून प्रकरणावरून शरद पवार आणि भुजबळांवर कडवट टीका अनेकदा केली होती. ते आता राष्ट्रवादी नेत्यांसोबत फोटोत चमकत आहेत. गोटे अनेक दशकांपासून संघ व भाजपाचे आहेत, पण आशिष देशमुख हे काँग्रेसचेच होते. ते २०१४मध्ये नागपूरच्या काटोलमधून काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा पराभव करून भाजपाचे आमदार बनले होते. ते पुन्हा काँग्रेसवासी झाले. पण त्यांचा आधीचा मतदारसंघ यावेळी काका अनिल देशमुखांसाठी त्यांना सोडावा लागला. म्हणून ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान देत नागपुरातून लढत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अर्जच बाद व्हावा, अशा तीव्र हरकती काढून त्यांनी आपण निवडणूक तीव्रतर लढणार हे दाखवलेच आहे. या दोघांचा वापर भाजपाविरोधी प्रचारात प्रामुख्याने केला जाईल असे दिसते. पुरोगामी महाआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टींची शेतकरी स्वाभिमान संघटना, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी आणि आरपीआयचे अनेक गट सहभागी आहेत. आता गोटेंचा लोकसंग्राम पक्षही यात आला आहे.
या शपथनाम्यात प्रामुख्याने बेरोजगार तरूणांना दरमहा पाच हजार रूपये बेरोजगार भत्ता देण्याचे वचन स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान आणि शेतकऱ्यांची सरसकट व तत्काळ कर्जमाफी ही ठळक वचने देण्यात आली आहे. आशा सेविकांना सरकारी नोकऱ्या हे आणखी एक महत्त्वाचे वचन यात आहे. आपली वचने किंवा या शपथपत्रातील कलमे म्हणजे छपाईतील चुका नसून या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रशासकीय कसब केवळ आमच्याकडे आहे म्हणून आघाडीला मते द्या असे त्यांचे आवाहन आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, सामाजिक न्याय, नागरी विकास, मुंबईचा विकास, ग्रामीण विकास, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, पाणीपुरवठा–सांडपाणी, ऊर्जा, दळणवळण, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामगार, रोजगार निर्मिती, अल्पसंख्यांक, पर्यावरण व हवामानातील बदल, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विकास, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विधि, न्याय आणि पोलीस दल, वकील असे सर्व क्षेत्रातील विषय शपथनामा हाताळतो. पण यासाठी लागणारा प्रचंड पैसा कसा उभा करणार? आशा व आंगणवाडी सेविकांना शासकीय नोकऱ्यांत कसे सामावणार हे काही शपथनाम्याने उलगडून सांगितलेले नाही.”
अनिकेत जोशी..
“संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com ”
“संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com
“शब्द बापुडे पोकळ वारा.. अशा प्रकारची पुस्तिका प्रकाशित करून सेना-भाजपाला आव्हान देणाऱ्या काँग्रेसप्रणित आघाडीने निवडणूक प्रचाराची सुरूवात तर केली आहे. कोणत्याही निवडणुकीच्या आधी राजकीय पक्ष आम्ही सत्तेवर आल्यानंतर जनतेसाठी काय करणार हे सांगण्याचा प्रयत्न करतात. करावयाच्या कामांची, नव्या योजनांची जंत्री प्रसिद्ध केली जाते. त्याला जाहीरनामा अशी सुटसुटीत संज्ञा आहे. पण शिवसेना-भारतीय जनता पक्षांनी जाहीरनामा शब्द नाकारला आणि वचननामा म्हणायला सुरूवात केली. तो शब्द सर्वमान्य झाला. ९०च्या दशकापासून देशात आघाड्यांचेच राजकारण सुरू आहे. दोन सलग निवडणुकांमध्ये अभूतपूर्व असे संपूर्ण बहुमत मिळवूनही भाजपानेही सरकार स्थापन करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सत्तेसोबत ठेवणे श्रेयस्कर मानले.”
महाराष्ट्रातही १९९०च्या विधानसभा निवडणुकीत वा नंतर कधीही कोणत्याच पक्षाला एकट्याला सत्ता लाभलेली नाही. युतीचे सरकार पराभूत झाल्यानंतर काँग्रेस व त्यांच्यामधूनच फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पंधरा वर्षे राज्य केले. कधी निवडणुकीनंतरची आघाडी तर कधी निवडणूकपूर्व आघाडी करून ते सत्ता घेत राहिले. विविध पक्षांच्या काँग्रेसप्रणित पुरोगामी लोकशाही आघाडी हे प्रचलित नाव असले तरी २००४मध्ये केंद्रात सत्ता घेताना काँग्रेसने संयुक्त पुरगामी आघाडी यूपीए स्थापन केली. आता महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभा निवडणुका लढतानाही आघाडीच्या नावातील लोकशाही शब्द वगळून संपुआच्या धर्तीवर पुरोगामी महाआघाडी घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी लढत आहेत.
“मागील म्हणजे २०१४ची विधानसभेची निवडणूक आणि २०१९ची विधानसभा निवडणूक यात एक महत्त्वाचा फरक हा आहे की यंदा सारेच पक्ष आघाडी वा युती करून लढत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा विरूद्ध शिवसेना विरूद्ध काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी अशी सर्वांनीच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्याही वेळी लहान पक्षांनी या चार मोठ्या पक्षांसोबत राहून थोड्याफार जागा लढवल्या होत्या. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आघाडी मजबूत केली आहे, तर थोडी बाजूला गेलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजपानेही महायुती साकारली आहे. या दोन्ही आघाड्या, युत्या यावेळी अधिक एकसंघपणे एकमेकांच्या समोर ठाकल्या आहेत. सेना-भाजपाच्या वचननाम्याच्या धर्तीवर जाहीरनाम्यासाठी काँग्रेस आघाडीने यावेळी शपथनामा असा नवा शब्द पुढे केला आहे.”
“रोहिडेश्वराची शपथ थेऊन शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या लढाईची सुरूवात केली ती वयाच्या चौदाव्या वर्षी, असा ऐतिहासिक संदर्भ सुरूवातीलाच देत या पुस्तिकेत अनेक नव्या योजना मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिवछत्रपतींचा आशिर्वाद आपल्याच मागे आहेत असे सांगणाऱ्या भाजपाला आव्हान देताना या निवडणुकीत राष्ट्रवादीने थेट शिवरायांनाच सोबत घेण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर शिवाजी व संभाजी म्हणून गाजणारे अभिनेते कोल्हे सध्या राष्ट्रवादीचे खासदार बनले आहेत. त्यांच्यासोबत स्वतः शरद पवारांनी शिवस्वराज्य यात्रा म्हणून अनेक जिल्हयात प्रचाराची पहिली फेरी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच आटोपून घेतली होती. आता रोहिडेश्वराची साद घालत ते शपथनामा घेऊन आले आहेत. राष्ट्रवादीनेच कितीतरी आधी हा जाहीरनामा तयार केला होता. पुस्तिका लिहिणाऱ्या खासदार वंदना चव्हाण यांच्यासह जयंत पाटील अजितदादा पवार हे त्याचे प्रकाशन आठ-दहा दिवसांपूर्वीच करणार होते. पण ऐनवेळी एकत्र जाहीरनामा काढण्याची टूम काँग्रेसने पुढे रेटली. म्हणून राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा थांबवला. म्हणूनच या प्रकाशनात फोटो जरी सर्वपक्षीय नेत्यांचे चमकले असले तरी मजकुरावर छाप आहे ती राष्ट्रवादीचीच.”
“काँग्रेसकडे तशीही राज्यस्तरीय नेतृवाची वानवाच आहे. त्यामुळे ते पवारांच्या लोकप्रियतेवरच अवलंबून आहेत हेही यातून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून हा शपथनामा नामक जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रमही राष्ट्रवादीच्याच यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे अविनाश पांडे, सचिन सावंत हे हजर होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना आव्हान देणारे महाआघाडीतील घटक, रिपब्लिकन समाजवादी पक्षाचे सुरेश माने हे व्यासपीठावर होतेच. पवारकन्या सुप्रिया सुळे या पहिल्या रांगेत बसल्या होत्या. मात्र शपथनामा प्रकाशनावेळी त्या व्यासपीठावर गेल्या व फोटोत चमकल्या.”
“आणखी दोन माध्यमांचे कुतूहल विषय असणारे नेते यावेळी हजर राहतील असे पाहिले गेले. धुळ्याचे भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि नागपूरमधून मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारे दुसरे भाजपा बंडखोर आशिष देशमुख. या दोघांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम रंगतदार बनला होता. यातील गोटेंचे खरेतर शरद पवार आणि त्यातही छगन भुजबळ यांच्याशी कडवे भांडण आहे. वैरही म्हणता येईल असे त्यांचे संबंध आहेत. विधानसभेत त्यांनी तेलगीच्या कथित टेपवरून प्रकरणावरून शरद पवार आणि भुजबळांवर कडवट टीका अनेकदा केली होती. ते आता राष्ट्रवादी नेत्यांसोबत फोटोत चमकत आहेत. गोटे अनेक दशकांपासून संघ व भाजपाचे आहेत, पण आशिष देशमुख हे काँग्रेसचेच होते. ते २०१४मध्ये नागपूरच्या काटोलमधून काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा पराभव करून भाजपाचे आमदार बनले होते. ते पुन्हा काँग्रेसवासी झाले. पण त्यांचा आधीचा मतदारसंघ यावेळी काका अनिल देशमुखांसाठी त्यांना सोडावा लागला. म्हणून ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान देत नागपुरातून लढत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अर्जच बाद व्हावा, अशा तीव्र हरकती काढून त्यांनी आपण निवडणूक तीव्रतर लढणार हे दाखवलेच आहे. या दोघांचा वापर भाजपाविरोधी प्रचारात प्रामुख्याने केला जाईल असे दिसते. पुरोगामी महाआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टींची शेतकरी स्वाभिमान संघटना, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी आणि आरपीआयचे अनेक गट सहभागी आहेत. आता गोटेंचा लोकसंग्राम पक्षही यात आला आहे.”
“या शपथनाम्यात प्रामुख्याने बेरोजगार तरूणांना दरमहा पाच हजार रूपये बेरोजगार भत्ता देण्याचे वचन स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान आणि शेतकऱ्यांची सरसकट व तत्काळ कर्जमाफी ही ठळक वचने देण्यात आली आहे. आशा सेविकांना सरकारी नोकऱ्या हे आणखी एक महत्त्वाचे वचन यात आहे. आपली वचने किंवा या शपथपत्रातील कलमे म्हणजे छपाईतील चुका नसून या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रशासकीय कसब केवळ आमच्याकडे आहे म्हणून आघाडीला मते द्या असे त्यांचे आवाहन आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, सामाजिक न्याय, नागरी विकास, मुंबईचा विकास, ग्रामीण विकास, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, पाणीपुरवठा–सांडपाणी, ऊर्जा, दळणवळण, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामगार, रोजगार निर्मिती, अल्पसंख्यांक, पर्यावरण व हवामानातील बदल, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विकास, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विधि, न्याय आणि पोलीस दल, वकील असे सर्व क्षेत्रातील विषय शपथनामा हाताळतो. पण यासाठी लागणारा प्रचंड पैसा कसा उभा करणार? आशा व आंगणवाडी सेविकांना शासकीय नोकऱ्यांत कसे सामावणार हे काही शपथनाम्याने उलगडून सांगितलेले नाही.”
काँग्रेसप्रणित आघाडीशिवसेना-भारतीय जनता पक्षजाहीरनामावचननामाराष्ट्रवादीविधानसभा निवडणुकाशरद पवारशिवस्वराज्य यात्रासुप्रिया सुळेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशपथनामाबाळासाहेब थोरात

