HomeArchiveतरूण उत्साह की...

तरूण उत्साह की म्हातारा अनुभव?

Details
तरूण उत्साह की म्हातारा अनुभव?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील मुख्यमंत्र्यांची निवड काँग्रेसने केली आहे. भारतीय जनता पार्टीकडे असलेली ही दोन्ही महत्त्वाची राज्ये काँग्रेसला मिळाल्यानंतर येथे मुख्यमंत्री कोण होणार, हा चर्चेचा विषय होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही राज्यांत मुख्यमंत्री पदासाठी एक सत्तरीतील तर दुसरा चाळीशीतील उमेदवार सज्ज होता. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा होती तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. या संदर्भातील दुसरा योगायोग असा की, शिंदे आणि पायलट या दोघांच्याही पिताश्रींनी अनुक्रमे कमलनाथ आणि गेहलोत यांच्याबरोबर संघटनेत काम केले होते. दुर्दैवाने, ते दोघेही आज हयात नाहीत. त्यांचा वारसा त्यांचे तरूण सुपूत्र यशस्वीपणे चालवीत आहेत.

या दोन राज्यांत निवडणुका झाल्या असता काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एक दिलाने लढले. काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे काँग्रेस विजयी होताच दोन तरूणतुर्क आणि दोन म्हातारे अर्क मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: तरूण आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्या वयाचे आहेत. तेव्हा त्यांचा कौल या दोघांच्या बाजूने लागेल, असा काहींचा अंदाज होता. पण राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत यांची निवड करून आपली राजकारणातील परिपक्वता दाखवून दिली आहे.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला एक किस्सा आठवला. काकासाहेब गाडगीळ आणि बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे पिता-पुत्र एकेकाळी दोन वेगवेगळ्या पक्षांत होते. काकासाहेब हे कट्टर काँग्रेसजन होते तर विठ्ठलराव प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते. एक दिवस एका राजकीय वादविवादात व्यासपीठावर ते आमने सामने आले. विठ्ठलराव आपल्या भाषणात काँग्रेसविरोधात जोरजोरात बरेच काही बोलले. त्यांचा सूर फारच आक्रमक होता. त्यांचे भाषण संपल्यावर काकासाहेब बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी पहिल्याच वाक्यात हंशा पिकविला आणि सभा जिंकली. काकासाहेब म्हणाले, `नुकताच तुमच्यासमोर तरूण उत्साह बोलला. आता म्हातारा अनुभव बोलणार आहे.’ या पार्श्वभूमीवर दोन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीकडे पाहता असे म्हणता येईल की, दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री निवडताना काँग्रेसने तरूण उत्साहाला बाजूला ठेवून म्हाताऱ्या अनुभवाची निवड केली आहे. दोन्ही राज्यांच्या दृष्टीने ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. शेवटी राज्यकारभार करताना केवळ तरूण वय आणि उत्साह चालत नसतो तर राजकारण कोळून प्यायलेल्या म्हाताऱ्या अनुभवाची गरज असते. राहुल गांधी यांनी दोन्ही राज्यासाठी मुख्यमंत्री पदाचे अचूक उमेदवार निवडून चांगली सुरूवात केली आहे.

कमलनाथ आणि अशोक गेहलोत हे मुरब्बी राजकारणी आणि चांगले प्रशासक आहेत. दोघेही संयमी आहेत. दोघांच्याही चारित्र्यावर कोणताही डाग नाही. विशेष म्हणजे, कमलनाथ हे एके काळचे संजय गांधी यांचे मित्र. पण संजय गेल्यावर त्यांनी आधी राजीवजींशी नंतर सोनियाजींशी आणि आता राहुलजींशी जुळवून घेतले आहे. संजय गांधी यांचे अनेक मित्र वादग्रस्त ठरले. ते पुढे राजकारणाबाहेर फेकले गेले. पण कमलनाथ कधीही कोणत्याही वादात अडकले नाहीत. केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना देखील ते वादापासून दूर राहिले. अशा दोन अनुभव संपन्न आणि काँग्रेसनिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन राज्यांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागणार आहे. त्यावेळी या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची भूमिका देखील महत्त्वाची असेल.”
 
“नरेंद्र वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content