HomeArchiveचांदोबा चांदोबा भागलास...

चांदोबा चांदोबा भागलास का?

Details
चांदोबा चांदोबा भागलास का?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
ज्याने बालपणी ‘चांदोबा’ वाचला नसेल असा आमच्या पिढीतील वाचक विरळाच! किंबहुना, त्याही आधीच्या पिढ्यांतील आबालवृद्धांना ‘चांदोबा’ मासिकाने वेड लावले होते. १९४७ सालीभारत स्वतंत्र झाला आणि त्याच वर्षी ‘चांदोबा’चा जन्म झाला. दर महिन्याला प्रसिद्ध होणारेहे मुलांचे मासिक मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातील ‘विक्रम आणि वेताळ’ ही कथामाला तर कमालीची गाजू लागली. प्रत्येक कथेत विक्रम वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागतो. मग वेताळ त्याला एक कथा सांगतो. कथा संपल्यावर वेताळ त्या कथेवर आधारीत काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाची उत्तरे विक्रम देऊ शकला नाही, तर त्याच्या शिराची शंभर शकले होऊन त्याच्या पायावर लोळतील अशी धमकीदेखील देतो. चतूर विक्रम सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देतो. मग वेताळ पुन्हा झाडाला जाऊन लटकतो.

‘विक्रम आणि वेताळ’ची ही प्रत्येक कथा काल्पनिक होती. पण त्याचबरोबर बाल वाचकांचे प्रबोधन करणारीदेखील होती. जीवनात काही अकल्पित घटना घडतात. त्याची उत्तरे माणसाला शोधूनदेखील सापडत नाहीत. मात्र ‘विक्रम आणि वेताळा’च्या गोष्टीच्या शेवटी ही उत्तरे सापडल्याने वाचकांना चांगले काहीतरी शिकण्याचा एक वेगळाच अनुभव येत असे. ‘चांदोबा’त जशा काल्पनिक लघुकथा असत, तशा फक्त अध्र्या पानावरील चौकटीतील मिनी कथादेखील असत.

अनेक कथांमध्ये गोपाळ नावाचा एक परोपकारी नायक आवर्जून वाचकांना भेटत असे. हा गोपाळ म्हणजे अत्यंत साधा-सरळ माणूस. पण इतरांना मदत करण्याचे त्याला भारी वेड. हा परोपकारी गोपाळ आपल्या कृतीने बालकांच्या कोवळ्या मनावर परोपकाराचे धडे रुजवित असे. त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडवीत असे. अनेकदा छोट्यातील छोटी कथा माणसाच्या सवयीवर अथवा गुणांवर आणिदोषांवर प्रकाश टाकीत असे. उदा. आम्ही आमच्या लहानपणी वाचलेली ही मासे विकणाऱ्या एका महिलेची कथा पाहा-एके दिवशी शहरात दिवसभर मासे विकल्यानंतर आपली रिकामी टोपली घेऊन ती मच्छी विक्रेती महिला आपल्या गावी निघाली होती. वाटेत तिला उशीर झाला म्हणून एका अनोळखी गावात ती मुक्कामासाठीथांबली. तिने एका माळिणीचे दार ठोठावले. तिला एका रात्रीसाठी आपल्याला आसरा देण्याची विनंती केली. माळिणीने तिला प्रेमाने घरात घेतले. चांगले खाऊ-पिऊ घातले. मग एका खोलीत तिची निजण्याची व्यवस्था केली. ते घर माळ्याचे असल्यामुळे घरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. त्या मासळी विक्रेत्या महिलेने आपली रिकामी टोपली घराच्या अंगणात ठेवली. पण उशिरापर्यंत त्या फुलांच्या सुगंधात तिला झोप काही लागत नव्हती. शेवटी मध्यरात्री ती उठली. आपले अंथरुण घेऊन घराच्या अंगणात आली. मग आपली रिकामी पाटी उशाशी घेऊन झोपली. पाटीतील त्या मासळीच्या दुर्गंधीने तिला खूप बरे वाटले. तो वास नाकात जाताच तिला कधी झोप लागली हे तिचे तिलाच कळलेदेखील नाही. सारांश, माणसाच्या अंगवळणी जे पडते तेच त्याचे जीवन बनते. त्यामासळी विक्रेत्या महिलेला त्या रात्री फुलांचा सुगंध नकोसा झाला होता. तिची झोप उडाली होती. पण मासळीच्या वासाने मात्रती शांतपणे झोपी गेली होती.

‘चांदोबा’मध्ये अशा अनेक कथा आम्ही वाचल्या. त्याचा आनंद लुटला. आज हे सारे आठवण्याचे कारण असे की, १९४७ सालच्या जुलै महिन्यात ‘चांदोबा’ प्रथम तेलगू आणि तामीळ भाषेत प्रसिद्ध झाला. नंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, सिंधी आदी १४ भाषांतून तो प्रसिद्ध होऊ लागला. बी. नागीरेड्डी आणि चक्रपाणी यांनी तो सुरू केला होता. मात्र एकविसाव्या शतकात डिजीटल क्रांतीचा प्रारंभ होताच सर्वच मुद्रित माध्यमांवर संकट कोसळले. ‘चांदोबा’देखील त्याला अपवाद नव्हता. ‘चांदोबा’चा खप घसरला आणि जाहिरातीचे उत्पन्नदेखील कमी झाले. परिणामी, २००७ मध्ये हे मासिक १०.२ कोटी रुपयांना जिओडेसीक या कंपनीने विकत घेतले. पण या कंपनीचे संचालक किरण प्रकाश कुलकर्णी, प्रशांत मुळेकर आणि पंकज श्रीवास्तव यांनी मनीलॉण्डरिंगच्या आरोपाखाली त्यांना अलिकडेच अटक झाली. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने ‘चांदोबा’चे बौद्धिक मालमत्ता हक्क विकण्याची परवानगी दिली आहे. वाचकांच्या अनेक पिढ्या ज्याने घडविल्या तो ‘चांदोबा’आज संकटात आहे. ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ असा प्रश्न उद्याची पिढी या ‘चांदोबा’ला विचारील तेव्हा तो कदाचित इतिहासजमा झालेला असेल.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content