HomeArchiveकोकणातील पर्यटनासाठी १०...

कोकणातील पर्यटनासाठी १० वर्षांचा परवाना द्या – निरंजन डावखरे

Details
कोकणातील पर्यटनासाठी १० वर्षांचा परवाना द्या – निरंजन डावखरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून दहा वर्षांसाठी परवाने देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. कोकणातील पर्यटन विकासाच्या आराखड्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी मान्य करण्यात आली.

कोकणातील साहसी क्रीडा प्रकारांसंदर्भातील धोरण, पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आमदार डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेद्वारे मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना सुरक्षेअभावी एका १५ वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर मंत्री येरावार यांनी उत्तर दिले.

पर्यटनाला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण साहसी खेळांबाबत तरूणांना प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याला जावे लागते. या व्यवसायासाठी केवळ एक वर्षाचा परवाना दिला जातो. त्यामुळे दर ११ महिन्यांनी नूतनीकरणासाठी धाव घ्यावी लागते. त्याचबरोबर वर्षभराच्या परवानगीमुळे बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर दहा वर्षांसाठी परवाने द्यावेत, अशी आग्रही मागणी डावखरे यांनी केली. पर्यटनाबाबत वेगवेगळ्या यंत्रणांकडून परवानगी दिली जाते. या पार्श्वभूमीवर परवाने देण्यासाठी एकच यंत्रणा उभारण्याचाही आग्रहही त्यांनी केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.

पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी

रायगड जिल्ह्यातील मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव, मुरूड-एकदरा, मुरूड जंजिरा जलदूर्ग, काशीद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, दिवेआगार व किहिंम किनाऱ्यावर पर्यटकांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी ७८ लाख ६ हजार १००, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, भाट्ये, मुरूड, कर्दे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, दाभोळ, मुसाकाजी किनाऱ्यावर सुरक्षेसाठी तीन लाख ५९ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर, तारकर्ली, कुणकेश्वर, मालवण, देवगडसाठी ४३ लाख ८५ हजार ९५० रुपये, पालघर जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहिम, शिरगाव, सातपाटी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी, सुरूची बाग किनाऱ्यासाठी ४१ लाख ६ हजार ५० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर किनाऱ्यावर प्रत्येकी २५ जीवरक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देण्यात आला आहे, असेही येरावार यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content