HomeArchiveकाँग्रेसचे ब्रह्मास्त्र!

काँग्रेसचे ब्रह्मास्त्र!

Details
काँग्रेसचे ब्रह्मास्त्र!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अखेर काँग्रेसने आपले ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. भावाच्या मदतीला बहीण धावून आली आहे. करिश्मा असलेली आणखी एक गांधी घराण्यातील रणरागिणी मैदानात उतरली आहे. प्रियांका गांधी-वडेरा यांच्या राजकारण प्रवेशामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली अनेक वर्षे प्रियांका यांनी राजकारणात यावे म्हणून काँग्रेसजन प्रयत्नशील होते. पण त्यांच्या मनासारखे घडत नव्हते. राहुल गांधी काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्यानंतर प्रियांका यांचा राजकारण प्रवेश अनेकांना अशक्य वाटत होता. विशेषत: प्रारंभीच्या काळात राहुल यांना अपयश आल्यानंतर अनेक काँग्रेसजनांना प्रियांका यांची निकड भासत होती. तथापि, त्यावेळी त्या राजकारणात सक्रीय झाल्या असत्या तर राहुल गांधी यांचे अपयश काँग्रेसने मान्य केल्यासारखे झाले असते. म्हणूनच पक्षातून मागणी होऊनदेखील प्रियांका यांना राजकारणापासून जाणिवपूर्वक दूर ठेवले गेले. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राजकारणात आणून काँग्रेसने आपले ब्रह्मास्त्रच जणू बाहेर काढले आहे.

यापूर्वी प्रियांका आपला बंधू राहुल आणि मातोश्री सोनियाजी यांचे अनुक्रमे अमेठी व रायबरेली हे मतदारसंघ पाहत होत्या. पण आता पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमून त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या उत्तर भागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. हा उत्तर भाग उत्तर प्रदेशच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण आहे. कारण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. सारांश, भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात काँग्रेसची नवी रणरागिणी संचार करणार आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे आता भाजपचा रडीचा डाव सुरू होईल. किंबहुना तो सुरू झालाच आहे. भाजपचे एक वाचाळ प्रवक्ते संभीत पात्रा यांनी म्हटले आहे की, `राहुल गांधी यांच्या अपयशामुळे प्रियांका गांधी राजकारणात आल्या आहेत’. भाजपची ही टीका बिनबुडाची आणि हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एक वर्षाच्या आत राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोंडाला फेस आणला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा कसाबसा विजय झाला. त्यानंतर पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यातील भाजपची सत्ता काँग्रेसने खेचून आणली. काँग्रेसच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या यशस्वी नेतृत्त्वाकडे पाहिले पाहिजे. विशेषत: भाजपच्या विरोधकांनी राहुल यांचे कर्तृत्त्व मान्य केले पाहिजे.

भाजपला विरोध करण्याच्या नावाखाली काही विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला सदैव मदत करीत असतात. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे त्यापैकी दोन महत्त्वाचे पक्ष होय. अखिलेश सिंह यादव आणि मायावती यांच्या नेतृत्त्वाखालील या प्रादेशिक पक्षांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला बाजूला ठेवून लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. भाजपला मदत करणे हाच या आघाडीचा हेतू आहे, हे निश्चित. तथापि, काँग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात आणून अखिलेश व मायावती यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

प्रियांका गांधी यांचा राजकारण प्रवेश एका वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. इंदिराजींचे एकेकाळचे विश्वासू सहकारी माखनलाल फोतेदार यांच्या आत्मचरित्रात त्यांनी प्रियांकाविषयी काहीसे अशा आशयाचे लिहिले आहे: `इंदिराजी लहानग्या प्रियांकाला पाहून कौतुकाने म्हणत की, ही माझी राजकीय वारसदार असेल.’ प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशाने इंदिराजींचे भाकित खरे होताना दिसत आहे. प्रियांका या इंदिराजीप्रमाणे दिसतात, बोलतात आणि चालतात. साहजिकच अनेकजण त्यांच्यात इंदिराजींना पाहतात. एकेकाळी `इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है’ अशी घोषणा काँग्रेसजन देत असत. आता प्रियांका गांधींच्या बाबतीतदेखील तशाच जोरदार घोषणा ऐकू आल्यास नवल नाही. राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून प्रियांका यांनी राजकारणात सक्रिय होणे हा काँग्रेससाठी शुभशकून आहे. देशासाठीदेखील तो शुभशकून ठरावा, ही अपेक्षा!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content