HomeArchiveअलक..

अलक..

Details
अलक..

    04-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
 
सदानंद खोपकर
संपादक, सा. मावळमराठा
sadanandkhopkar@gmail.com
 
 
 
अलक. अलक म्हणजे अति लघु कथा. अलीकडेच विकसित झालेला एक साहित्य प्रकार.
 
 
बिस्कीटचे पुडे..
 
वर्तमानपत्र व्यवस्थित घडी करून त्यानं डाव्या हातात धरलं. समोर दिवसाचा पहिला वाफाळता चहा होता. डिशमध्ये चार बिस्कीटं. चहाचा एक घोट घेऊन ठेवला. मघाची बातमी पुढे वाचतच उजव्या हातानं बिस्कीट सावधपणे चहात बुडवलं. आता खरी कसोटी. तो मनात म्हणाला. बिस्कीट सहिसलामत तोंडात जाणे. फक्त एकाग्रता हवी.
 
 
त्याचा आटोकाट प्रयत्न फोल ठरवत बिस्किटानं चहात उडी घेतली. आसपास घरगुती गस्ती पथक नाही याचा कानोसा घेत त्यानं बिस्कीटाचा लगदा स्वाहा केला. पण रूखरूख होतीच. ऑफिसमधून येतानाच सायंकाळी चार वेगवेगळे बिस्कीटपुडे सौं.च्या समोर केले. मिश्किल हसत गस्ती पथक सदस्य उत्तरला. बिस्कीटसे जाती वो पुडोंसे नही आती..
 
 
ती जिन्स पँटवाली..
 
त्या अरूंद गल्लीतून जातानाच तिनं पाहिलं. रस्त्याकडेला गायवाली. स्कूटर थांबवून, बसूनच, ती जिन्स पॅन्टवाली म्हणाली.. ए गायवाली, तुला चपाती-भाजी हवी. ही घे! अन् ती, गच्च चाऱ्याची जुडी दे बघू. गायवालीकडून जुडी घेत तिनं गायीपुढे धरली. जेवण मिळाल्यानं भारावलेली गायवाली म्हणाली, चाऱ्यांचं दहा रूप्पयं झालं बाय!
 
 
तोवर सुशिक्षित धार्मिक जीन्सधारीचा डोळे मिटून जप सुरू. दहाचा आकडा ऐकताच जप थांबवून, आवासत ती गरजली, ‘इतक्याशा जुडीचे दहा रूपये? मग भाजी-चपाती कशाला दिलीय? दे ती परत, अन् तिने जुडी भिरकावली. तिचा स्वर रूक्ष पण चोख व्यवहारी होता. तिथे आता धार्मिकता औषधाला नव्हती..
 

केक भरवून परततोय..
 
पुलाखाली राहणाऱ्या मुलांसाठी मदत कार्य करणारा तो. आज त्यातीलच एकाचा वाढदिवस म्हणून केक घेऊन निघालेला. रस्त्यात पत्नीला अपघात झाल्यामुळे, हेल्प, हेल्प, ओरडणाऱ्या युवकाला पाहून त्यानं टॅक्सी थांबवली. गुरासारखं ओरडणाऱ्या त्या मुलीला टॅक्सीत घेतलं. ड्रायव्हरला म्हणाला, चलो. पहिले जनरल हॉस्पिटल!
 
 
टॅक्सीतं बील, तातडीचं प्रथमोचार साहित्य, व्हिलचेअर मिळविण्यापर्यंत.. तसंच त्या युवकाच्या घरी कळविण्यापर्यंत सारी धावपळ केली. आपला मोबाईल क्रमांक दिला. खिशातले सारे पैसे त्याच्या हातात देत तो देवदूत म्हणाला, तूर्त हे ठेव मित्रा. माझी पुलाखालची मुलं वाट पाहत असतील. त्यांना केक भरवून मी पुन्हा येईन!
 
 
आणि मांजर आडवं गेलं..
 
निघायला तसा उशीरच झालेला. बॅग उचलली न त्यानं जिना गाठला. दोन, दोन पायऱ्या उतरणं भाग होतं. पण दुसऱ्याच पायरीवर ते ठिपकेदार मांजर होतं. चाहूल लागताच हललं. त्यानं घाईतच त्या जिन्यावर पाय टाकला. पुढे झालं. त्यानं झेप घेतली. मांजराची दोन पायऱ्या खाली डावीकडे झेप. ते पवित्र्यात, त्यानं उजवीकडे वळत तीन पायऱ्या दमात पार केल्या.
 
 
मांजर चुळबुळलं. एकटक त्याच्याकडं पाहात राहिलं. आता एकच टप्पा की सुटलोच.. त्यानं सूरच मारला पुन्हा उजवीकडेच. सावध मांजरानं हवेत उसळी घेतली. निमीषभरच दोघं हवेत. शेवटची पायरी पार करीत म्याँव म्याँव विजयी चित्कारत मांजर उजवीकडेच पसार. बॅग सावरत तो तो हलकंच उद्गारला.. हँ, मांजर आडवं जाण्यानं काय होतंय.
 
मतलबी दुनिया
सकाळची वेळ. वैकुंठधामालगत शेडमध्ये विधींसाठी ही गर्दी. ज्यांचे विधी झाले त्यांना पलिकडे मोकळ्या जागी पान ठेवायची सूचना मिळत होती. तिथेच शेवाळ धरलेल्या, पडझड झालेल्या भिंतीवर तो बसला होता. पिंजारलेले केस, वाढत्या दाढीत फिरणारी बोटे, डोळ्यांत गूढ चमक. मध्येच पलिकडल्या विधींवर, इथे अंतराने ठेवलेल्या पानांवर, तर मध्येच वैकुंठभूमीवरून घिरट्या घालणाऱ्या मानी कावळ्यांवर दृष्टी फिरवणारा तो.
 
 
सोबतचा परिवार सोडून कुतूहलाने विचारलं.. कोण तुम्ही, इथं का बसलाय? विचित्र स्मित करीत तो म्हणाला, मानला तर देव नाहीतर दगड! एरव्ही तिरस्कार करतात आणि मतलबासाठी कावळ्याचीही कशी प्रार्थना करतात ते पाहयला येतो.
 ”

 
 
 
 
सदानंद खोपकर
“संपादक, सा. मावळमराठा”
sadanandkhopkar@gmail.com
 
 
 
अलक. अलक म्हणजे अति लघु कथा. अलीकडेच विकसित झालेला एक साहित्य प्रकार.
 
 
बिस्कीटचे पुडे..
 
वर्तमानपत्र व्यवस्थित घडी करून त्यानं डाव्या हातात धरलं. समोर दिवसाचा पहिला वाफाळता चहा होता. डिशमध्ये चार बिस्कीटं. चहाचा एक घोट घेऊन ठेवला. मघाची बातमी पुढे वाचतच उजव्या हातानं बिस्कीट सावधपणे चहात बुडवलं. आता खरी कसोटी. तो मनात म्हणाला. बिस्कीट सहिसलामत तोंडात जाणे. फक्त एकाग्रता हवी.
 
 
त्याचा आटोकाट प्रयत्न फोल ठरवत बिस्किटानं चहात उडी घेतली. आसपास घरगुती गस्ती पथक नाही याचा कानोसा घेत त्यानं बिस्कीटाचा लगदा स्वाहा केला. पण रूखरूख होतीच. ऑफिसमधून येतानाच सायंकाळी चार वेगवेगळे बिस्कीटपुडे सौं.च्या समोर केले. मिश्किल हसत गस्ती पथक सदस्य उत्तरला. बिस्कीटसे जाती वो पुडोंसे नही आती..
 
 
ती जिन्स पँटवाली..
 
“त्या अरूंद गल्लीतून जातानाच तिनं पाहिलं. रस्त्याकडेला गायवाली. स्कूटर थांबवून, बसूनच, ती जिन्स पॅन्टवाली म्हणाली.. ए गायवाली, तुला चपाती-भाजी हवी. ही घे! अन् ती, गच्च चाऱ्याची जुडी दे बघू. गायवालीकडून जुडी घेत तिनं गायीपुढे धरली. जेवण मिळाल्यानं भारावलेली गायवाली म्हणाली, चाऱ्यांचं दहा रूप्पयं झालं बाय!”
 
 
“तोवर सुशिक्षित धार्मिक जीन्सधारीचा डोळे मिटून जप सुरू. दहाचा आकडा ऐकताच जप थांबवून, आवासत ती गरजली, ‘इतक्याशा जुडीचे दहा रूपये? मग भाजी-चपाती कशाला दिलीय? दे ती परत, अन् तिने जुडी भिरकावली. तिचा स्वर रूक्ष पण चोख व्यवहारी होता. तिथे आता धार्मिकता औषधाला नव्हती..”
 

केक भरवून परततोय..
 
“पुलाखाली राहणाऱ्या मुलांसाठी मदत कार्य करणारा तो. आज त्यातीलच एकाचा वाढदिवस म्हणून केक घेऊन निघालेला. रस्त्यात पत्नीला अपघात झाल्यामुळे, हेल्प, हेल्प, ओरडणाऱ्या युवकाला पाहून त्यानं टॅक्सी थांबवली. गुरासारखं ओरडणाऱ्या त्या मुलीला टॅक्सीत घेतलं. ड्रायव्हरला म्हणाला, चलो. पहिले जनरल हॉस्पिटल!”
 
 
“टॅक्सीतं बील, तातडीचं प्रथमोचार साहित्य, व्हिलचेअर मिळविण्यापर्यंत.. तसंच त्या युवकाच्या घरी कळविण्यापर्यंत सारी धावपळ केली. आपला मोबाईल क्रमांक दिला. खिशातले सारे पैसे त्याच्या हातात देत तो देवदूत म्हणाला, तूर्त हे ठेव मित्रा. माझी पुलाखालची मुलं वाट पाहत असतील. त्यांना केक भरवून मी पुन्हा येईन!”
 
 
आणि मांजर आडवं गेलं..
 
“निघायला तसा उशीरच झालेला. बॅग उचलली न त्यानं जिना गाठला. दोन, दोन पायऱ्या उतरणं भाग होतं. पण दुसऱ्याच पायरीवर ते ठिपकेदार मांजर होतं. चाहूल लागताच हललं. त्यानं घाईतच त्या जिन्यावर पाय टाकला. पुढे झालं. त्यानं झेप घेतली. मांजराची दोन पायऱ्या खाली डावीकडे झेप. ते पवित्र्यात, त्यानं उजवीकडे वळत तीन पायऱ्या दमात पार केल्या.”
 
 
“मांजर चुळबुळलं. एकटक त्याच्याकडं पाहात राहिलं. आता एकच टप्पा की सुटलोच.. त्यानं सूरच मारला पुन्हा उजवीकडेच. सावध मांजरानं हवेत उसळी घेतली. निमीषभरच दोघं हवेत. शेवटची पायरी पार करीत म्याँव म्याँव विजयी चित्कारत मांजर उजवीकडेच पसार. बॅग सावरत तो तो हलकंच उद्गारला.. हँ, मांजर आडवं जाण्यानं काय होतंय.”
 
मतलबी दुनिया
“सकाळची वेळ. वैकुंठधामालगत शेडमध्ये विधींसाठी ही गर्दी. ज्यांचे विधी झाले त्यांना पलिकडे मोकळ्या जागी पान ठेवायची सूचना मिळत होती. तिथेच शेवाळ धरलेल्या, पडझड झालेल्या भिंतीवर तो बसला होता. पिंजारलेले केस, वाढत्या दाढीत फिरणारी बोटे, डोळ्यांत गूढ चमक. मध्येच पलिकडल्या विधींवर, इथे अंतराने ठेवलेल्या पानांवर, तर मध्येच वैकुंठभूमीवरून घिरट्या घालणाऱ्या मानी कावळ्यांवर दृष्टी फिरवणारा तो.”
 
 
“सोबतचा परिवार सोडून कुतूहलाने विचारलं.. कोण तुम्ही, इथं का बसलाय? विचित्र स्मित करीत तो म्हणाला, मानला तर देव नाहीतर दगड! एरव्ही तिरस्कार करतात आणि मतलबासाठी कावळ्याचीही कशी प्रार्थना करतात ते पाहयला येतो.”

 

अलकअति लघु कथाबिस्कीटचे पुडे..ती जिन्स पँटवाली..केक भरवून परततोय..आणि मांजर आडवं गेलं..मतलबी दुनिया

Continue reading

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा...
Skip to content