Details
hegdekiran17@gmail.com
“वाईस ऍडमिरल बिस्वजीत दासगुप्ता एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम यांनी शुक्रवारी भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम येथील पूर्व कमांडची धुरा स्वीकारली. मावळते पूर्व कमांड प्रमुख वाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे नौदलाच्या नवी दिल्ली येथील एकात्मिक मुख्यालयात कार्मिक सेवा नियंत्रक म्हणून बदलीवर रवाना झाले आहेत.”
“वाईस ऍडमिरल दासगुप्ता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. भारतीय नौदलाच्या सेवेत ते 1985 साली दाखल झाले आणि ते दिशादर्शन आणि संचालन तज्ज्ञ आहेत. त्यांनी क्षेपणास्त्रसज्ज आयएनएस निशंक, आयएनएस कर्मुकसह स्टेल्थ विनाशिका आयएनएस तबर आणि विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट, या चार महत्त्वाच्या जहाजांची जबाबदारी सांभाळली असून त्यांनी परिचालन, प्रशिक्षण आणि कर्मचारी नियुक्तीचे कामही पाहिले आहे.”
“या नियुक्तींमध्ये भारतीय नौदलाच्या कोची येथील वर्क अप टीमच्या मुख्यालयात कमांडर वर्क अप, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील (वेलिंग्टन) डायरेक्टिंग स्टाफ, नौदलाच्या नेव्हीगेशन अँड डायरेक्शन स्कूलचे प्रमुख, नौदलप्रमुखांचे नौदल सहाय्यक आणि वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर यांचा समावेश आहे.”
त्यांची फ्लॅग रँकमध्ये पदोन्नती होऊन मुंबई येथील नौदलाच्या पश्चिम कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ऑपरेशन्स) म्हणून नियुक्ती झाली होती. 2017-18मध्ये त्यांनी विशाखापट्टणम येथील प्रतिष्ठेच्या इस्टर्न फ्लीटचे नेतृत्त्व केले होते आणि त्यानंतर त्यांची नवी दिल्ली येथील एनसीसी मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. वाईस ऍडमिरल श्रेणीत पदोन्नती झाल्यावर आणि विशाखापट्टणम येथील नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते नवी दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) एकात्मिक मुख्यालयात कार्मिक सेवा नियंत्रक म्हणून कार्यरत होते.