Homeबॅक पेजयुथ कलेक्टिव्ह कौन्सिलमुळे...

युथ कलेक्टिव्ह कौन्सिलमुळे तरुणांना मिळणार एक नवे व्यासपीठ!

कॉर्पोरेट निर्णय प्रक्रियेत तरुण आवाजांचे अधिक प्रतिनिधीत्व आणि विविधतेच्या गरजेला प्रतिसाद देत द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय पर्सनल-केअर ब्रॅण्‍डने इंटरनॅशनल युथ डेनिमित्त भारतात त्‍यांचे युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिल लाँच केले आहे. युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिल, हा द बॉडी शॉपचा उपक्रम आहे, जो तरूणांना त्‍यांच्‍या बोर्डरूममध्‍ये सामील करण्‍यासोबत व्‍यवसाय निर्णयांमध्‍ये त्‍यांचे मत मांडण्‍याची मुभा देतो.

द बॉडी शॉप एशिया साऊथच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुश्री श्रुती मल्‍होत्रा म्‍हणाल्‍या, आमच्‍या युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिलसह आम्‍ही द बॉडी शॉपमधील तरूणांसाठी प्रबळ व्‍यासपीठ निर्माण करण्‍याकरिता अत्‍यंत महत्त्वाचा प्रवास सुरू करत आहोत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही बोर्डरूममध्‍ये तरूणांच्‍या मतांचा समावेश करण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे त्‍यांच्‍या विचारांमधून सर्वजण प्रेरित होऊ शकतील आणि त्‍यांच्‍या कृतींमधून तरूण भारतीय समाजावर सकारात्‍मक प्रभाव पडू शकतो. द बॉडी शॉप तरूणांना सक्षम करण्‍याप्रती आणि अर्थपूर्ण परिवर्तनासाठी उत्‍प्रेरक म्‍हणून त्‍यांच्‍या व्‍यापक क्षमतांना चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

याप्रसंगी ब्रॅण्‍डने त्‍यांचे सल्‍लागार मंडळ सदस्‍य देखील सादर केले आहेत, ज्‍यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे आणि उल्‍लेखनीय तरूणांचा समावेश आहे, जे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रांमध्‍ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक परिणाम निर्माण करत आहेत. द बॉडी शॉपच्‍या युथ इंडिया कलेक्टिव्‍ह अॅडवायजरी बोर्डमध्‍ये एलजीबीटीक्‍यूए+ समुदायासाठी प्रेरणादायी समर्थक अंकिता मेहरा, उत्कट पर्यावरणीय समर्थक ऋषभ सिन्‍हा, क्लायमेट कार्यकर्ता आकाश रानिसन, यंग इंडिया फाऊंडेशनचे संस्‍थापक सुधांशू कौशिक यांचा समावेश आहे.

हे युथ कलेक्टिव्‍ह पॅनेल द बॉडी शॉपला त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये अभिप्राय, विचार व धोरणात्‍मक मार्गदर्शन प्रदान करेल. मान्‍यताकृत तरूण विचारवंतांचा हा वैविध्‍यपूर्ण समूह द बॉडी शॉपच्‍या लैंगिक संवेदनशीलतेच्‍या अजेंडाला पाठिंबा देईल, कचऱ्याचे व्‍यवस्‍थापन करेल, हवामान बदलाप्रती योगदान देईल आणि तरूणांना विकासामध्‍ये अधिक मार्गदर्शन करेल. त्‍यांच्‍यापैकी प्रत्‍येकजण सल्‍लागार म्‍हणून सेवा देण्‍यासोबत द बॉडी शॉप इंडियामधील धोरणाला साह्य करण्‍यासाठी सहयोगाने काम करतील, ज्‍यामुळे तरूणांच्‍या दृष्टिकोनाला आणि ते प्रगती करू पाहणाऱ्या विश्‍वाला चालना मिळेल.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content