Homeन्यूज अँड व्ह्यूजआर्थिक सेवा क्षेत्रामध्ये...

आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये पदवीधर तरूणांना मिळणार रोजगाराची संधी!

केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारामार्फत पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंबंधी घोषणा नुकताच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली असून या करारांतर्गत महाराष्ट्रातील अनेक लहानमोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आर्थिक सेवा क्षेत्रामधील रोजगार संधींकरिता तरूण पदवीधर मुलं बॅकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्स सर्टिफ़िकेट प्रोग्राम अंतर्गत तयार होतील, या भागीदारीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये क्षमता निर्मीतीसह तरूणांना आर्थिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सहभागी होण्याकरता भक्कम पद्धतीने तयार केले जाणार आहे. 

याबाबत बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक, संजीव बजाज म्हणाले की, आमची एनएसडीसी आणि शिक्षण मंत्रालयाशी झालेली भागीदारी ही आम्हाला तरूण वर्गामध्ये बदल घडवून आणण्यात मदत करेल ज्याकरिता त्यांना उत्तम कौशल्यासह अगिणित असे यशाचे दरवाजे देखील खुले होतील. यामुळे आर्थिक लवचिकतेस एकत्रित कामाचा संधी भविष्यात उपलब्ध होतील आणि कौशल भारत, कुशल भारत हे वाक्य खरे करून दाखविले जाईल.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content