Homeब्लॅक अँड व्हाईटऑनलाईन गेमिंगवर लागणार...

ऑनलाईन गेमिंगवर लागणार 28% कर?

मोठमोठ्या दिग्गज अभिनेत्यांना जाहिरातीत घेऊन चालणारे ऑनलाईन गेम्स आता जीएसटीच्या फेऱ्यात येणार असून त्यावर 28 टक्के कर लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीद्वारे 51व्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे (विधीमंडळासह) अर्थमंत्री आणि वित्त आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेश मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यात यादृष्टीने चर्चा झाल्याचे कळते.

जीएसटी परिषदेने 11.07.2023 रोजी झालेल्या 50व्या बैठकीत कॅसिनो, रेसकोर्स आणि ऑनलाईन गेमिंगवरील मंत्र्यांच्या गटाच्या (GoM) दुसऱ्या अहवालावर चर्चा केली आणि कॅसिनो, अश्व शर्यती आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये पुरवले जाणारे कृतीयोग्य दावे निकाली काढताना उपक्रम हा कौशल्याचा किंवा संधीचा खेळ असला तरीही पूर्ण दर्शनी मूल्यावर 28% दराने कर आकारला जाण्याची शिफारस केली होती. या प्रकरणात स्पष्टता येण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची शिफारसही परिषदेने केली होती.

जीएसटी परिषदेच्या 51 व्या बैठकीत, सीजीएसटी कायदा 2017 आणि आयजीएसटी कायदा, 2017, मध्ये काही बदल करण्याची शिफारस करण्यात आली होती. यात, सीजीएसटी कायदा, 2017 च्या परिशिष्ट III मध्येही सुधारणा अपेक्षित आहे. ज्याद्वारे, कॅसिनो, घोड्यांची शर्यत आणि ऑनलाईन गेमिंग च्या पुरवठ्यावरील कराबाबत स्पष्टता येऊ शकेल.

या परिषदेने, IGST कायदा, 2017 मध्ये एक विशिष्ट तरतूद समाविष्ट करण्याची शिफारसदेखील केली आहे. त्यानुसार, भारताबाहेरील एखाद्या पुरवठादाराद्वारे भारतातील एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन मनी गेमिंगच्या पुरवठ्यावर जीएसटी भरण्याची जबाबदारी देणे अपेक्षित आहे. त्यासाठी, या पुरवठादाराला भारतात एकल नोंदणी करता येईल, अशी एक सुलभ नोंदणी योजना आणि नोंदणी आणि समजा पुरवठादार, नोंदणी आणि करविषयक तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी झाला तर, पुरवठादाराद्वारे ऑनलाईन मनी गेमिंगच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोणत्याही संगणकातील माहिती ब्लॉक करणे, अशी तरतूदही असेल.

जीएसटी परिषदेने, ऑनलाईन गेमिंगच्या पुरवठ्याचे किंवा कॅसिनोमध्ये कारवाई करण्यायोग्य दाव्यांचे मूल्यांकन करण्याची शिफारस केली असून, पुरवठादाराकडे जमा करण्यात आलेली अथवा देय किंवा खात्यात जमा रकमेच्या आधारावर, हे मूल्यांकन केले जाऊ शकते, मात्र (मागील गेम/बेट्सवर जिंकलेली आणि नंतरच्या गेम/बेट आउटमध्ये टाकण्यात केलेली रक्कम वगळून) प्रत्येक पैजेच्या एकूण मूल्यावर नाही, असेही म्हटले आहे.

सीजीएसटी नियम, 2017 अंतर्गत ऑनलाईन गेमिंगच्या पुरवठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यानुसार कॅसिनोमध्ये कारवाई करण्यायोग्य दाव्यांचा पुरवठा करण्यासाठी विशिष्ट तरतुदी समाविष्ट केल्या जाऊ शकतात, अशी शिफारसदेखील परिषदेने केली आहे. त्याशिवाय, या संबंधित प्रकरणांबाबत, काही विशिष्ट अधिसूचना किंवा अधिसूचनेत सुधारणा केल्या जाव्यात, अशीही शिफारस जीएसटी परिषदेने केली आहे.

या कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असा निर्णयही परिषदेने घेतला असून, या सुधारणा, 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू केल्या जाणार आहेत.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content