Homeटॉप स्टोरीमहापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही...

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळावर?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतानाच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने चालवली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.

या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. मात्र, मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याविषयी त्यांनी मौन पाळले.

याच बैठकीत पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार, जितेंद्र आव्हाडांवर ठाणे-पालघरची, धनंजय मुंडेंवर नाशिक, नगरसह मराठवाड्याची, अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणाची, तर अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र शिंगणेंवर विदर्भातल्या अमरावती विभागाची, शशिकांत शिंदेंवर सांगली, सातारा आणि कोल्हापूरची जबाबदारी, तर सुनील शेळकेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपावण्यात आली असल्याचे कळते.

राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिबिरांमध्ये राज्यातील प्रश्नांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी, म्हणजेच येत्या १० जूनला राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचे  आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आणि छत्रपती राज्याभिषेक दिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content