Homeएनसर्कलस्वस्त होणार रेल्वेचा...

स्वस्त होणार रेल्वेचा गारेगार प्रवास?

रेल्वे गाड्यांमधील प्रवासी आसन क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने, रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेला वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी भाड्यात सवलत योजना लागू करण्याचा अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अटी आणि शर्तीं याप्रमाणे आहेत.

प्रवासी भाडे सवलत योजना यांना लागू करता येईल

  1. ही योजना अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या सर्व वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीकरता लागू असेल.
  2. ही सवलत मूळ भाड्याच्या 25% असेल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, वस्तू आणि सेवा कर, अशा प्रकारचे लागू असलेले इतर शुल्क , स्वतंत्रपणे आकारले जाईल. सवलत कोणत्याही किंवा सर्व वर्गांमध्ये प्रवासी संख्येच्या व्याप्ततेच्या आधारावर दिली जाऊ शकते.
  3. मागील 30 दिवसात ज्या रेल्वेगाड्यांमध्ये  50% टक्क्यांपेक्षा कमी जागा भरल्या गेल्या आहेत (एकतर आरंभापासून गंतव्यापर्यंत पर्यंत किंवा काही विशिष्ट थांबे /विभागांमध्ये) प्रवास करणारी रेल्वेगाडी या सवलतीकरता विचारात घेतली जाईल. सवलतीचे प्रमाण ठरवताना स्पर्धात्मक वाहतुकीचे भाडे हा निकष लक्षात घेतला जाईल.
  4. ही सवलत तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. मात्र आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे भाड्याचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  5. अशी सवलत सुरुवातीला ती गाडी ज्या स्थानकातून सुटते त्या स्थानकाच्या विभागीय मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांनी निश्चित केलेल्या काही कालावधीसाठी लागू केली जाईल आणि ती लागू केल्यापासूनच्या प्रवासाच्या तारखांसाठी कमाल सहा महिन्यांच्या अधीन असेल. सवलतीचे भाडे संपूर्ण कालावधीसाठी किंवा काही कालावधीसाठी किंवा महिन्यानुसार किंवा हंगामी किंवा आठवड्यातील दिवसांसाठी/ सप्ताहाअंती, वर नमूद केलेल्या कालावधीच्या मागणीनुसार दिले जाऊ शकते.
  6. आंतर-विभागीय गाड्यांसाठी, मूळ स्थानक ते गंतव्य स्थानक या दोन्हीला किंवा गंतव्यस्थानाकरता, इतर विभागीय रेल्वेचे पीसीसीएम/व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी सल्लामसलत करून किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन च्या बाबतीत सीओएम / सीसीएम बरोबर सल्लामसलत करून प्रवासी भाड्यात सवलत दिली जाऊ शकते.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content