Homeन्यूज अँड व्ह्यूजया दशकाअखेरपर्यंत 42...

या दशकाअखेरपर्यंत 42 कोटी प्रवासी करणार भारतात प्रवास?

स्वातंत्र्यापासूनच्या 65 वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या 74 होती. मात्र आता 149 विमानतळ /हेलिपोर्ट/वॉटर एरोड्रोम कार्यरत आहेत. उडान योजनेसाठी प्रदान केलेल्या व्यवहार्यता अंतर निधीमुळे 1.3 कोटी लोकांना विमानाने प्रवास करणे शक्य झाले आहे. वर्ष 2030पर्यंत भारतात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 42 कोटी असावी, यासाठी  सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल राज्यसभेत एका तारांकित प्रश्नाच्या पुरवणी प्रश्नादरम्यान सांगितले.

प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) सर्व विमानतळांवर जागरुकता ठेवते, तर सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) जारी केल्या आहेत.

मंत्रालयाला कोणत्याही प्रवाशाच्या संदर्भात नियमांमधील उल्लंघनाची कोणतीही माहिती मिळताच, संबंधित विमान कंपनी किंवा विमानतळाकडे याबाबत विचारणा केली जाते. विमानतळ किंवा विमान कंपन्यांनी चुकीचे केल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रालय त्यांच्याविरुद्ध दंड आकारते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content