Homeकल्चर +बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरात आज, जय सुरेखाताईंना काय सांगणार?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. घरातील पाच सदस्य सेफ झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखाताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन.

आजदेखील जय त्याविषयीच सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. तो त्याचा मुद्दा मांडणार आहे. जयने विचारले, “सुरेखाताई तुम्ही का नाही आलात? तुम्ही येऊन जरी गेला असतातरी चाललं असतं. सुरेखाताईंच म्हणणं आहे, “मी तिथे यायचं, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं ना. जय त्यांना मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करणार आहे”.

“तुम्ही चुकीचचं बोलत आहात. सुरूवातीला येणं तुमचा भागच नव्हता. तुम्ही विकासला पण विचारा. तो जेव्हा आत आला तेव्हा आम्ही डील केलं होतं. याच्यानंतर दादुस येणार आणि नंतर तुम्ही येणार आणि हे डील झालं होतं. हवं तर त्याला आता विचारा आणि अजून एक होतं.. तुमच्यानंतर परत तो येणार”.

बघूया पुढे काय होतं? कोणाचं म्हणण खरं आहे, सुरेखाताई कोणावर विश्वास ठेवणार? तेव्हा बघा.. बिग बॉस मराठी.. आज रात्री.. कलर्स मराठीवर..

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content